Saturday, February 25, 2023

ब्राह्मण समाज कधीच काही मागत नाही हेच त्यांचे वैशिष्ट्य ; देवेंद्र फडणवीस

वेध माझा ऑनलाईन - मागणाऱ्यांपेक्षा देणाऱ्यांची संख्या वाढली पाहिजे असे म्हणत ब्राह्मण समाज कधीच काही मागत नाही हेच त्यांचे वैशिष्ट्य असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच ब्राह्मण मंडळी समाजात गोडवा निर्माण करतात असेही ते म्हणाले. देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते. कसबा पेठ पोटनिवडणुकीला एक दिवस बाकी असताना फडणवीस यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे कसब्यातील ब्राह्मण मतांवर परिणाम होईल का हे आता बघावे लागणार आहे

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, मी अनेक कार्य़क्रमांमध्ये सहभागी होत असतो. अनेक संघटना काम करत असतात. परंतु या सगळ्यांमध्ये ब्राह्मण संघटनेत अधिक काम होत असल्याचे पाहायला मिळते. विशेष म्हणजे ही संघटना कोणतीच मागणी करत नसल्याचे ते म्हणाले.

ब्राह्मण समाजाने नेहमीच समाजाला देण्याचे काम केले आहे मात्र त्याबदल्यात काही मागण्याची त्यांची अपेक्षा कधीच नसते आम्ही केवळ देण्याचे काम करतो. ही जी देण्याची परंपरा कायम ठेवत मागण्याऐवजी देणारे कसे बनावे यासाठी  येणाऱ्या नवीन पिढिला तयार केले पाहिजे. हीच ब्रह्मोद्योगची अपेक्षा असून याच दृष्टीने याची सुरुवात करण्यात आल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले

.ते पुढे म्हणाले, देशाच्या लोकसंखेच्या तुलनेत ब्राह्मण कमी असतील. परंतु त्यांच्यामध्ये एक क्षमता आहे, असेही फडणवीसांनी यावेळी सांगितले.

No comments:

Post a Comment