Tuesday, February 14, 2023

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या ; आत्महत्येचे कारण काय?

वेध माझा ऑनलाईन - वैभववाडी शहरात भाड्याने राहात असलेल्या खोलीत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांने गळफास घेऊन आत्महत्या केली. महेश अनिल गाडवे (मूळ रा. फलटण, जि. सातारा) असे या मयत तरुणाचे नाव आहे. ही घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच महाविद्यालयीन विद्यार्थी, प्राध्यापक व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

मयत महेश गाडवे हा वैभववाडीतील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होता. वैभववाडी शहरात मित्रांसमवेत तो भाड्याच्या खोलीत राहात होता. दोन दिवसांपूर्वी त्याचे मित्र गावी गेल्यामुळे तो खोलीत एकटाच होता. त्याच्या बाजूच्या खोलीत याच महाविद्यालयातील विद्यार्थी राहातात. सोमवारी त्यांना महेश याच्या खोलीचा दरवाजा बंद दिसला. हाक मारुनही प्रतिसाद न मिळालेले त्यांनी जोरदार धक्का मारून दरवाजा उघडला दरम्यान, पोलिसांना माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक प्रवीण देसाई, सूरज पाटील, पो.ना. मारुती साखरे, अभिजीत मोर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मयताच्या शर्टच्या खिशात चिठ्ठी सापडली असून त्या चिठ्ठीत मी घरच्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नसल्यामुळे स्वखुशीने आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले आहे. महाविद्यालयीन युवकाच्या आत्महत्येने वैभववाडीत खळबळ उडाली आहे.

No comments:

Post a Comment