Monday, February 27, 2023

कराड नगरपरिषदेचे तोडलेले जॅकवेलचे वीज कनेक्शन पुन्हा जोडण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे आदेश ; शिंदे गटाचे युवा नेते रणजित (नाना) पाटील यांनी पालकमंत्र्यांशी बोलून तातडीने केला पाठपुरावा ; पाठपुराव्याला यश ;

वेध माझा ऑनलाईन - कराड नगरपालिकेचे वीज बिल थकल्याने महावितरणने काल सोमवारी कराड नगरपालिकेच्या मुख्य वारूंजी जॅकवेलचा वीजपुरवठा तोडला होता.  त्यामुळे आज शहरातील  सकाळचा पाणीपुरवठा होण्याबाबत साशंकता निर्माण झाली होती मात्र प्रसंगावधान जाणून कराड शहरातील शिंदे गटाचे युवा नेते रणजित पाटील नाना यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री ना शंभूराज देसाई यांच्याशी तातडीने आज सकाळी याविषयी माहिती दिली त्यानंतर पालकमंत्री देसाई यांनी ताबडतोब महावितरणला तोडलेला वीजपुरवठा पुन्हा चालू करायला सांगितल्याचे स्वतः रणजित पाटील यांनी वेध-माझा शी बोलताना सांगितले आहे त्यामुळे शहरावरील पाण्याचे संकट आता टळले आहे 

कराड नगरपरिषदेच्या चोवीस तास पाणी पुरवठा योजनेसाठी वारुंजी येथील मुख्य जॅकवेलमधून पाणीपुरवठा केला जातो महावितरणची त्यासाठीची यावर्षीची बिले अद्याप नगरपालिकेने दिली नसून त्याची रक्कम लाखों रुपयात असल्याचे समजते दरम्यान महावितरणच्या अधिकाऱ्यांनी काल सोमवारी सायंकाळी वारुंजी जॅकवेलचे विद्युत कनेक्शन तोडले होते त्यानंतर  पाण्याच्या शुद्धीकरणासह सर्व प्रक्रिया ठप्प झाली होती. यामुळे आज मंगळवारी सकाळी पाणीपुरवठा होण्याबाबत साशंकता निर्माण झाली होती मात्र शहरातील युवा नेते रणजित पाटील यांनी याविषयीचे प्रसंगावधान जाणून  जिल्ह्याचे पालकमंत्री ना देसाई यांच्यामार्फत हा प्रश्न सोडवला आहे त्यामुळे शहरावरील पाण्याचे संकट दूर होण्यास मदत झाली आहे

No comments:

Post a Comment