Friday, February 17, 2023

राज ठाकरेंची ट्विटर वरून उद्धव ठाकरेंना चपराक ; बाळासाहेबांचा फोटो असलेला व्हीडिओ केला शेअर ;

वेध माझा ऑनलाईन - शिवसेना हा पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंना मिळालं आहे. निवडणूक आयोगाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे, ज्याचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. तर या निकालानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांनी बाळासाहेबांचा फोटो असलेला एक व्हिडिओ ट्वीटरवर शेअर केला आहे. 

'बाळासाहेबांनी दिलेला ‘शिवसेना’ हा विचार किती अचूक होता ते आज पुन्हा एकदा कळलं....', असं कॅप्शन राज ठाकरे यांनी या ट्वीटला दिलं आहे. 'नाव आणि पैसा. पैसा येतो, पैसा जातो, पुन्हा येतो... पण एकदा नाव गेलं की परत येत नाही. ते येऊ शकत नाही, काळ्या बाजारात सुद्धा मिळायचं नाही. म्हणून नावाला जपा, नाव मोठं करा.' असा बाळासाहेब ठाकरेंच्या आवाजातला व्हिडिओ राज ठाकरेंनी शेअर केला आहे.

No comments:

Post a Comment