वेध माझा ऑनलाईन - श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकऱ्यांची शान असलेल्या भव्य बैलगाडा शर्यत
"एक आदत एक बैल" बुधवार दि. १ मार्च २०२३ रोजी सकाळी ९ वाजता हजारमाची ओगलेवाडी (कराड) येथे विजयसिंह यादव (भाऊ) मित्र परिवार यांच्यावतीने आयोजित करण्यात आले असल्याची माहिती संयोजकांनी दिली.
सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रक्रमावर असणारे विजयसिंह यादव (भाऊ) मित्र परिवारांने सदरच्या बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले असून यासाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते नियोजन करीत आहेत. दरम्यान या बैलगाडा शर्यत कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती विजयसिंह यादव यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना दिली.
विजेत्यांना : प्रथम क्रमांक ७१ हजार,१११, द्वीतीय क्रंमाक : ५१ हजार १११/- तृतीय क्रमांक: ३१ हजार १११/- चतुर्थ क्रंमाक २१ हजार १११/- पाचवा क्रमांक : १५ हजार १११/-सहावा क्रमांक : १० हजार १११/- सातवा क्रंमाक : ७ हजार १११/- बक्षीस विजयसिंह यादव (भाऊ) मित्र परिवाराच्यावतीने देण्यात येणार आहेत. तसेच पंचांचा नियम अंतिम राहील, गट, सेमी फायनल चिठ्यावर्ती काढल्या जातील, सामना उतरलेल्या गाड्या पुन्हा सोडल्या जाती, बैलास मारहाण केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, मैदान शासकीय नियमानुसार होईल, प्रेक्षकांनी मैदान आपापल्या जबाबदारीवर पहावे, निकालास स्क्रिनद्वारे रिप्लायनुसार दिला जाईल या नियम अटींचे पालन बैलगाडा शर्यतीत सहभागी होणाऱ्या चालक-मालक व प्रेक्षकांना पालन करावे लागेल असे विजयसिंह यादव यांनी सांगितले.
दरम्यान समालोचक म्हणून किरण भिसे, रणजीत बनसोडे तर झेंडापंच सोमनाथ जगदाळे(पेडगाव) काम पाहणार आहेत. बैलगाडा शर्यत चालक मालकांनी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी राजुभाऊ सुर्यवंशी (9665966594), सिद्धार्थ कांबळे (8390606606), योगेश पळसे (9975805050) यांच्याशी संपर्क करावा.बैलगाडा शर्यती मध्ये सहभागी होणाऱ्यांना एक हजार रुपये प्रवेश फ्री भरावी लागणार आहे.
No comments:
Post a Comment