Monday, February 20, 2023

माझा विनायक मेटे करण्याचा काही जणांचा डाव ; काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांचा गंभीर आरोप

वेध माझा ऑनलाइन - काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर काही दिवसांपूर्वी हल्ला झाला होता. त्यानंतर आता 'माझ्या लेटर पॅडचा दुरुपयोग होत असून माझ्यावर पाळत ठेवली जात आहे. माझा विनायक मेटे करण्याचा काही लोकांचा डाव असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे.

नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथील कारेगांव येथे महाविकास आघाडी तर्फे आयोजित कृतज्ञा सोहळा पार पडला. यावेळी अशोक चव्हाण यांनी मोठा खुलासा केला.

माजी मंत्री अशोक चव्हाण यांच्या मंत्रिपदाच्या लेटरहेडचा गैरवापर करून अज्ञात व्यक्तींनी बदनामीकारक बनावट पत्रे तयार केले असल्याची तक्रार माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पोलिसांत केली आहे. एवढेच नव्हे तर आपल्यावर पाळत ठेवली जात असून, घातपात घडविण्याचाही प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी केला. या प्रकारावर खुलासा करत अशोक चव्हाण म्हणाले की,माझ्या लेटर पॅडचा दुरुपयोग होत असून माझ्यावर पाळत ठेवली जात आहे. माझा विनायक मेटे करण्याचा काही लोकांचा डाव असल्याचा गंभीर आरोप चव्हाणांनी केला.

No comments:

Post a Comment