वेध माझा ऑनलाईन ; राज्याचे मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे यांना आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कराडचे शिंदे गटाचे नेते राजेंद्रसिंह यादव यानी शुभेच्छा दिल्या
राजेंद्रसिह यादव हे मुख्यमंत्री शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात काही दिवसांपूर्वी शिंदे गटात प्रवेश केला त्याचवेळी यादव यांनी कराड शहराच्या विकासासाठी मोठया निधीची मागणी केली होती त्याला मुख्यमंत्री शिंदे यांनी हिरवा सिग्नल देत यादव यांच्या कार्याचे कौतुक केले होते
यादव यांनी शहराच्या अनेक प्रश्नासंबंधी स्वतः लक्ष घालून ते सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे कोविड काळात तसेच निर्माण झालेल्या पुरपरिस्थितीत देखील त्यांनी वाखाणण्याजोगे काम केले आहे नुकतेच त्यांनी शहराच्या वादग्रस्त पाणी बिलाबाबतच्या मुद्यावर देखील जिल्हाधिकारी जयवंशी याना भेटून स्थगिती आणण्यासाठी मोठे प्रयत्न केले आहेत याबाबतची माहिती त्यांनी स्वतः माध्यमाना दिली होती
मुख्यमंत्री शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी दिनांक रविवार 12 रोजी कार्वे फाटी याठिकाणी बैलगाडी शर्यती चे आयोजन केले असून अनेक जिल्ह्यांतील स्पर्धक यामधून सहभागी होणार आहेत दरम्यान, आज त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत
No comments:
Post a Comment