वेध माझा ऑनलाईन - पुणे- बंगलोर महामार्गावरील कोल्हापूर नाका येथील उड्डाणपूल पाडण्याच्या पार्श्वभूमीवर आज कराड येथील शासकीय विश्रामगृहात संबधित विभाग यांची माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी आढावा बैठक घेतली. यानंतर कोल्हापूर नाका व ढेबेवाडी फाटा येथे दोन्ही पूलाची पाहणी करून संबधित कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चाही केली. कराडचा उड्डाणपूल हा आज मध्यरात्रीपासून बंद होणार असून उद्या दिवसाच पूल पाडण्याच्या कामाला सुरूवात होणार असल्याची माहिती डीपी जैन कंपनीचे सतेंद्रा कुमार वर्मा यांनी एका वाहिनीशी बोलताना दिली आहे
कोल्हापूर नाका येथील 2003 साली बांधलेला उड्डाणपूल जमीनदोस्त होणार आहे. त्याठिकाणी 550 कोटी रूपये खर्चून 3.2 किलोमीटर अतंराचा सहापदरीकरणचा उड्डाणपूल होणार आहे. या पूलाचे काम अदानी समूहाला दिले असून डीपी जैन ही कंपनी काम करणार आहे. शनिवारी मध्यरात्री उड्डाणपूलावरील वाहतूक बंद करण्याबाबत जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख यांनी अधिसूचना जारी केली होती. त्यामुळे गेल्या दोन दिवसापासून वाहतूक सुरू असल्याने नक्की पूल कधी पाडणार याबाबत चर्चांना उधाण आले होते आज त्याबद्दल अधिकृत माहिती देण्यात आली आहे
No comments:
Post a Comment