वेध माझा ऑनलाईन - औरंगाबादमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निष्ठावंत एकनिष्ठ मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये भाषण करत असताना शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांना अश्रू अनावर झाले. चंद्रकांत खैरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणी आणि शिवसेनेवर आलेल्या परिस्थितीवर भाष्य करत होते, तेव्हाच खैरे भावुक झाले आणि त्यांना रडू कोसळलं.
अश्रू अनावर झाल्यानंतर चंद्रकांत खैरे यांना व्यासपीठावरून उठून बाहेर जावं लागलं. निष्ठावंत एकनिष्ठ निर्धार मेळाव्यात चंद्रकांत खैरे शिवसैनिकांसमोर नतमस्तक झाले. शिवसैनिकांचे आभार मानण्यासाठी चंद्रकांत खैरे गुडघ्यावर बसून नतमस्तक झाले, यानंतर शिवसैनिकांकडूनही उभं राहून खैरेंना प्रतिसाद देण्यात आला.
उद्धव ठाकरे हे सध्या सगळ्यात मोठ्या राजकीय संकटातून जात आहेत. पहिले मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं, मग सत्ता गेली. आमदार-खासदार सोडून गेले. निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्हही एकनाथ शिंदेंना मिळालं. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर औरंगाबादमध्ये शिवसैनिकांचा निष्ठावंत एकनिष्ठ मेळावा पार पडला.
No comments:
Post a Comment