वेध माझा ऑनलाइन - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सातारा जिल्हा बाळासाहेबांची शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वतीने चेन्नई येथे मसाला उद्योग प्रशिक्षण शिबिर नुकतेच घेण्यात आले या शिबिरास महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला
सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेनेच्या महिला आघाडीच्या सातारा उपजिल्हाप्रमुख सुलोचनाताई पवार यांच्या नेतृत्वाखाली हे शिबिर उत्साहात पार पडले 1 ते 5 फेब्रुवारी दरम्यान हे शिबिर संपन्न झाले सदर शिबिरात महिलांनी त्याठिकाणी मोठया संख्येने सहभाग नोंदवला मसाला उद्योग करण्यासाठी आवश्यक ती माहितीही यावेळी देण्यात आली तसेच काही मसाले देखील यावेळी प्रत्यक्षरित्या महिलांना
तयार करून दाखवण्यात आले त्याचे पॅकिंग कसे करायचे याची माहिती देखील यावेळी देण्यात आली
कराड दक्षिण विधानसभा जिल्हाप्रमुख विद्याताई शिंदे, तसेच कल्पनाताई शामराव पवार (शाखाप्रमुख, गोटे), इरा रजपूत (शाखाप्रमुख गोटे) पुनम गव्हाणे, कमल दाईंगडे , सीमा खराडे, नाकुषा कचरे आदी महिला पदाधिकारी, व शिवसैनिक देखील त्याठिकाणी उपस्थित होते
No comments:
Post a Comment