Sunday, September 29, 2024

कराडमध्ये सौरभ तात्यांच्या संकल्पनेतून लवकरच साकारणार देखणा "वाकिंग ट्रैक'; शहराच्या लौकिकात पडणार भर ; आमदार बाळासाहेब पाटील यांनी केला कामाचा शुभारंभ ;

वेध माझा ऑनलाइन।
माजी नगरसेवक सौरभ पाटील यांच्या संकल्पनेतून कराड च्या कृष्णा पुलालगत असणाऱ्या परिसराचे  सुशोभीकरण होऊन  त्या परिसराला शहराच्या लौकिकात भर पडेल असा लूक मिळणार आहे...त्यासाठी तेथे वॉकिंग ट्रॅक तयार करुन लवकरच त्याचे लोकार्पण होणार आहे 

दरम्यान  या कामाचा शुभारंभ कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते नुकताच सम्पन्न झाला 
यावेळी डॉ सुभाष एरम माजी उपनगराध्यक्ष  सुभाष पाटील(काका), लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जयंत पाटील (काका),माजी नगरसेवक सौरभ पाटील(तात्या),प्रा एम आर दाभोळे, संजय बदीयानी, नगरसेवक सुहास पवार(भाऊ), श्री पानवळ सर,श्री बाजीराव माटेकर यांची उपस्थिति होती 
  
याबाबत सविस्तर माहिती देताना  सौरभ तात्यांनी सांगितले की  आमदार बाळासाहेब पाटील यांनी त्यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात 70 लाखाचा निधी याकामि मंजूर करून आणला होता. हा परिसर गेली अनेक वर्ष सार्वजनिक कचरा टाकण्याची जागा झाली होती त्यामुळे प्रथम पालिकेच्या माध्यमातून त्याठिकानी लाईट पोल उभारून तेथील परिसर स्वच्छ करून घेतला भविष्यात तेथे सुशोभीकरण होऊन वॉकिंग ट्रॅक तयार झाल्यानंतर त्यापरिसराचा कायापालट होऊन जेष्ठ नागरिक, महिला भगिनी व लहान मुलांना याचा फायदा होणार आहे.
  
यावेळी प्रताप पाटील,श्री बाबासो भोसले नंदकुमार बटाणे,  अजय सूर्यवंशी, शिवाजी पवार,  जयंत बेडेकर अमित शिंदे, श्री गंगाधर जाधव, मोहसीन अंबेकरी,कु विद्याराणी साळुंखे,  भारत वाघमारे, ऍड सतीश पाटील बाळ देवधर, ऍड धीरज जाधव, गणेश चव्हाण राहुल भोसले सुभाष तेली, अनिल दसवंत आशिष माने, सोमनाथ भोसले, उदय हिंगमीरे राजेंद्र पवार विवेक हिंगमिरे, शोहेब सुतार, शिवराज घाडगे,  चंद्रशेखर खेतमर(सर) सचिन चव्हाण गुलाब पाटील, ऍड पी एन पाटील व मंगळवार पेठ, रुख्मिणी नगर परिसरातील नागरिक उपस्थित होते.


इंद्रजीत गुजर "कराड दक्षिण' च्या मैदानात ! आ पृथ्वीराज चव्हाण यांची डोकेदुःखी वाढणार ?

वेध माझा ऑनलाइन। 
आ पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटातून बाहेर पडून उद्धव ठाकरेंचे नेतृत्व मान्य केलेले कराड चे नगरसेवक इंद्रजित गुजर यांनी आता मिशन विधानसभा असे शहरातून बोर्ड लावून पृथ्वीराज चव्हाण यांची डोकेदुखी वाढवली आहे महाविकास आघाडीचे घटक असूनही त्यांनी शिवसेनेसाठी या मतदारसंघात आपला क्लेम सांगितला आहे...त्यामुळे या मतदार संघात महा विकास आघाडित फुट पडली की क़ाय ?अशी चर्चा आहे... हा मतदार संघ काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे मात्र शिवसेनेचे दिवंगत अशोकराव भावके तसेच अजिंक्य डी वाय पाटील अशा उमेदवारांनी  याठिकाणी आपले नशीब आजमावले आहे... पाहूया आता इंद्रजित गुजर यांचे नशीब काय म्हणतय ते ...
नगरसेवक इंद्रजित गुजर हे अपक्ष म्हणून निवडून आले आहेत त्यानंतर ते आ पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाबरोबर दिसू लागले होते गेली पाच वर्षे त्यांनी चव्हाण गटात आपले स्थान निर्माण केले होते... त्यांच्या जोडीला नगरसेवक अप्पा माने हे देखील होते... नगरसेवक माने हे काँग्रेसचे शहर अध्यक्ष होते मात्र गेल्या वर्षी त्यांना या पदावरुन अचानक पाय उतार व्हावे लागले... त्यानंतर आ पृथ्वीराज चव्हाण गटाशी माने व गुजर यांची जवळीक कमी झाल्याचे जाणवले... सध्या अप्पा माने हे डॉ अतुल भोसले यांच्याशी जवळीक करून आहेत... तर इंद्रजित गुजर यांनी थेट मुंबई गाठत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे... सध्या सातारा जिल्ह्याचे समनव्यक म्हणून ते काम पाहतात... उद्धव ठाकरे व संजय राऊत यांचे विशेष प्रेम त्यांच्यावर आहे... त्या दोघांबरोबर गुजर प्रत्येक मुंबईतील कार्यक्रमात दिसतात...  गुजर सध्या कराड दक्षिण च्या होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी करिता इच्छुक आहेत... त्यांनी त्यासाठीची तयारी देखील चालू केली आहे... निवडणुकीला कमी कालावधी आहे त्यामध्ये गुजर हे या मतदारसंघातून संवाद यात्रा काढणार असल्याचे सांगतात...त्यांना शिवसेना म्हणून कितपत आणि कसा प्रतिसाद मिळतो ते पहावे लागेल... गुजर हे प्रसिद्ध क्रिकेट प्लेयर आहेत...त्यांना जिल्यात व राज्यात कॅप्टन म्हणून ओळखतात...क्रिकेट खेळाच्या माध्यमातून त्यांचा शहर व ग्रामीण भागात खूप मोठा संपर्क आहे...  शिवसेनेत प्रवेश केल्यापासून त्यांनी कराड शहर तसेच कराड उत्तर व दक्षिणमधे मिळून 70 ते 80 शाखा ओपन केल्याचे ते सांगतात... उद्धव ठाकरेंच्या हस्ते या शाखांचे लवकरच उद्घाटन घेण्याचा त्यांचा मानस आहे त्यादरम्यान आता ही निवडणूक जाहीर झाल्याने इंद्रजीत गुजर हे सगळे कार्यक्रम कसे मॅनेज करतात तेच पहावे लागेल...

दरम्यान या मतदार संघात आ पृथ्वीराज चव्हाण यांची सलग दोनदा आमदार म्हणून वर्णी लागली आहे... त्यांची ही आता तिसरी निवडणुकीची टर्म असेल... पण कराड च्या महाविकास आघाडीत फूट पडून जर इंद्रजित गुजर याठिकाणी बंडख़ोर म्हणून उभे राहिले... तर भाजपच्या उमेदवाराला ही निवडणूक सोपी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही... म्हणूनच खऱ्या अर्थाने आ चव्हाण यांची याठिकाणी डोकेदुखी वाढेल असे चित्र  निर्माण होऊ शकते...पाहूया पुढे काय होते ते...

Saturday, September 28, 2024

उद्या शरद पवारांच्या हस्ते राज्यातील सर्व खासदारांच्या सत्काराचे आयोजन ; सम्पूर्ण राज्याचे याच कार्यक्रमाकड़े लक्ष ;

वेध माझा ऑनलाइन।
देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या 84 व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतनाचा सोहळा अकलूज येथे  खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमात शरद पवारांच्या हस्ते राज्यातील सर्व खासदारांच्या सत्काराचे नियोजन करण्यात आले आहे. महायुतीचे कुठले खासदार या सोहळ्याला हजेरी लावणार? याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.   

दरम्यान राज्यात निवडून आलेल्या सर्व 48 खासदारांना सत्कारासाठी निमंत्रित केले आहे. मंत्री वगळता सर्व पक्षाचे नूतन खासदार येतील, असा विश्वास खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी व्यक्त केला आहे

दहशतवादी याकूब मेमनचं दफन करण्यासाठी जागा मिळते.पण अक्षयच्या दफनविधीसाठी जागा मिळत नाही ; अक्षयचे वकील अमित कटारनवरे यांची खदखद व्यक्त ;

वेध माझा ऑनलाइन।
बदलापूर लैंगिक अत्याचारप्रकरणी एन्काऊंटरमध्ये मारला गेलेल्या अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमी मिळेनासी झाली आहे. बदलापूर आणि अंबरनाथ नगरपरिषदांनी स्मशानभूमीत दफन करण्यास मनाई केली आहे. तर, कोर्टाने येत्या सोमवारपर्यंत अक्षयवर अंत्यसंस्कार करण्याचे आदेश दिले आहेत. पण स्मशानभूमीच मिळत नसल्याने पंचाईत झाली आहे. या पार्श्वभूमीवर अक्षयचे वकील अमित कटारनवरे यांनी खदखद व्यक्त केली आहे. या देशात दहशतवादी याकूब मेमनचं दफन करण्यासाठी जागा मिळते. पण गुन्हा सिद्ध झालेला नसतानाही अक्षयच्या दफनविधीसाठी जागा मिळत नाही, अशी खदखद कटारनवरे यांनी व्यक्त केली आहे.



एन्काऊंटर होऊन 5 दिवस झाले; अक्षय शिंदेचा अंत्यविधी नाहीच,स्मशानभूमीत देखील लागले विरोधाचे बॅनर;

वेध माझा ऑनलाइन।
बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा ठाणे पोलिसांनी 23 सप्टेंबर रोजी एन्काऊंटर केला. मात्र, अजूनही त्याचा अंत्यविधी करण्यात आलेला नाही. अनेक शहरांमधून त्यांच्या अंत्यविधीला विरोध सुरुच आहे. आता अंबरनाथच्या हिंदू स्मशानभूमीत अक्षय शिंदेच्या दफनविधीला विरोध करण्यात येतोय. स्मशानभूमीच्या बाजूला शिवसेनेच्या वतीने  जाहीर निषेधाचा बॅनर लावण्यात आला आहे. बदलापूर घटनेतील विकृत नराधम अक्षय शिंदेला अंबरनाथ हिंदूस्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात जाहीर निषेध असा मजकूर बॅनरवर लिहिण्यात आलाय.

कवठे महांकाळमध्ये संजयकाका पाटील आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यामध्ये झालेल्या वादात मोठा ट्विस्ट; संजयकाका पाटील यांच्या विरोधातील तक्रार मागे ;

वेध माझा ऑनलाइन ; सांगलीतील कवठे महांकाळमध्ये माजी खासदार संजयकाका पाटील  आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यामध्ये झालेल्या वादात मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय. राष्ट्रवादीचे माजी उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला यांनी एकप्रतिज्ञापत्र लिहून माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या विरोधातील तक्रार मागे घेतली आहे. प्रतिज्ञापत्रात अय्याज मुल्ला यांनी गैरसमजुतेतून आणि गोंधळलेल्या परिस्थितीत आपण संजयकाका  विरोधात तक्रार दिल्याचे म्हटले आहे. रोहित पाटील मात्र या प्रकरणात नौटंकी करत केविलवाणा प्रयत्न करून सहानभूती मिळवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्याचा हा डाव उघडा पडला असल्याचे अय्याज मुल्ली यांनी म्हटलं आहे. माजी खासदार संजयकाका पाटील यांचे स्वीय सहायक खंडू होवाळ यांनी देखील प्रतिज्ञापत्रातून तक्रार मागे घेतली आहे. 
कवठे महांकाळ येथे झालेल्या घटनेचा तपशील स्वत: अय्याज मुल्ला यांनी सांगितलेला आहे. आज त्यांनी केस मागे घेतली आहे. त्यांनी अॅफिडेविटमध्ये म्हटलं आहे की, संजकाकांचा कोणताही संबंध नाही. माझा गैरसमज झाला होता. तेव्हा रोहित पाटील राजकारणात नौटंकी करत आहेत. रोहित पाटील सहानूभुती मिळवण्याचा प्रयत्न करत होते. आता ते तोंडावर पडले आहेत. आज मोर्चासाठी गावागावात निरोप दिले होते. अतिशय थोडक्या माणसांमध्ये त्याला तो कार्यक्रम करावा लागला होता. मी बाहेरगावी आलेलो आहे, दोन दिवसांमध्ये मी त्यांना उत्तर देणार आहे. त्या सर्व गोष्टींचा मी खरपूस समाचार घेणार आहे. तासगाव-कवठे महांकाळमधील लोकांनी यांची नौटंकी ओळखलेली आहे. 

काय आहे प्रकरण? 
माजी नगराध्यक्ष अय्याज मुल्ला यांनी माजी खासदार संजयकाका पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले होते. संजयकाका पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी माझ्या घरात घूसून महिलांना आणि माझ्या आईला मारहाण केली, असा आरोप मुल्ला यांनी केला होता. मुल्ला यांनी फिर्याद दाखल केल्यानंतर संजयकाका पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर दुसरीकडे संजयकाका पाटील यांचे स्वीय सहाय्यक खंडू होवाळ यांनी अय्याज मुल्ला यांच्याविरोधात जातीवाचक शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला होता. मात्र, आता दोन्ही बाजूंनी तक्रारी मागे घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत, तर दुसरीकडे संजयकाका पाटील दोन दिवसांनी निषेध सभा घेणार आहेत.

बच्चू कडू म्हणाले.; आमचे 10 आमदार निवडून येऊ द्या... मग, मुख्यमंत्र्यांचा गणपतीच करतो;

वेध माझा ऑनलाइन।
तिसरी आघाडी स्थापन केल्यानंतर आमदार बच्चू कडू यांनी आता थेट महायुती आणि महाविकास आघाडीलाच इशारे द्यायला सुरुवात केली आहे. 288 आमदार नाही, फक्त 10 जरी आमदार निवडून आले तरी आम्ही मुख्यमंत्र्यांचा गणपती केल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराच बच्चू कडू यांनी दिला आहे. ही निवडणूक काही सोपी नाही. प्रचंड पैसा फेकला जाणार आहे. पण जेव्हा सर्वसामान्य माणूस पेटून उठतो तेव्हा माझ्यासारखे चार आमदार निर्माण होतात, त्यामुळे आपल्याला विधानसभेत सामान्यांचाच आवाज पोहोचवायचा आहे, असं बच्चू कडू म्हणाले.

या देशात जी काही क्रांती झाली ती सामान्य माणसांनी केली आहे. तुमच्यासमोर कधी कुणी उमेदवारांची यादी जाहीर करतो का? यांची यादी दिल्ली आणि मुंबईत बंद खोलीत जाहीर होते. इतना पैसा दो आणि उतना पैसा दो असा हा खेळ आहे, असं सांगतानाच सामान्य माणसांनी मला चारवेळा निवडून दिलं. आताही आपल्याला सामान्य माणसांनाच विजयी करायचं आहे, असं बच्चू कडू यांनी सांगितलं.
शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी तिसऱ्या आघाडीवर टीका केली होती. त्याला बच्चू कडू यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांच्यात दम राहिलेला नाही. त्यांना असं वाटत असेल की आम्ही वर आल्याने त्यांचं नुकसान होत असेल, यावरून तुमची कुवत काय ते माहीत पडते. त्यांची कुवतच नाही, एवढ्या ताकदीने तुम्हाला मतदान मिळाल्यावरही तुम्ही केंद्रात तुमची सत्ता आणू शकले नाही,मुस्लिम आणि बौद्ध समाजाने तुम्हाला मतदान केलं नसतं तर काँग्रेसचे डिपॉझिट जप्त झालं असतं अशी अवस्था होती, असा हल्लाच बच्चू कडू यांनी चढवला.

भाजीमंडई तत्काळ हटवावी अन्यथा आंदोलन करू,; कराड़च्या मुख्याधिकार्याना निवेदन ; क़ाय आहे बातमी ?

वेध माझा ऑनलाइन।
कराड शहरातील बुधवार पेठेतील जुना पटेल दवाखाना ते औंधकर हॉस्पिटलपर्यंतच्या भाजी मंडईवरून स्थानिक नागरिकांसह डॉक्टरांनी सोमवारी कराड नगर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना घेराव घातला.आक्रमक झालेल्या नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांना भाजीमंडई तत्काळ हटवावी अन्यथा येत्या काळात तीव्र स्वरूपात ठिय्या आंदोलन करू, अशा इशाराही यावेळी देण्यात आला.

कराड येथील बुधवार पेठेतील रस्त्याकडेला बसणाऱ्या मण्डईमुळे स्थानिक नागरिकांना तसेच येथे असणाऱ्या होस्पिटल व डॉक्टरांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत अनेकवेळा कारवाई करण्याची मागणी करून देखील पालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने आक्रमक झालेल्या स्थानिक नागरिकांसह डॉक्टरांनी आज मुख्याधिकाऱ्यांची पालिकेत जाऊन भेट घेतली. तसेच मागण्यांचे त्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा देखील दिला.

यावेळी मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बुधवार पेठ मधील वर नमूद केलेल्या रस्त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला आम्ही अर्जदार कायमचे रहिवासी आहोत.मण्डई ने या रस्त्यावर बसू नये. कारण या ठिकाणी डॉक्टर मोहोळकर हॉस्पिटल डॉक्टर पटेल  यादव हॉस्पिटल आणि औंधकर हॉस्पिटल आहेत. त्यामुळे या हॉस्पिटलमध्ये पेशंट येतात त्यांना हॉस्पिटलमध्ये येता जाता या ठिकाणी ट्राफिक जाम होत असते.याकडे नगरपरिषद कराड मधील संबंधित विभाग यांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे येथील रहिवासी नागरिकाना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. घरासमोर दरवाजामध्ये शेतकरी/व्यापारी बाजार घेऊन टेम्पो या सारख्या मोठ्या गाड्या घेऊन बसल्यामुळे तेथील रहवासि लोकांना त्याठिकानी ये जा करता येत नाही. तसेच त्या भागातील अर्धा भाग हा TP आणि गावठाण असल्यामुळे अडचणींचा रस्ता आहे. त्याभागात जर अचानक रुग्ण आला तर वरील अडचणीमुळे पेशंटचा जीव जाण्याची शक्यता असल्यामुळे आपण सदर प्रकरणी व्यक्तिशः लक्ष घालून गाभीर्यपूर्वक दखल घ्यावी. या अनुषंगाने बुधवारपेठ मधील सामाजिक कार्यक्रत्यांनी गेली एक वर्षाहून अधिक पाठपुरावा केलेला आहे तरी याची दखल घेतली नाहीतर  मुख्याधिकारी खंदारे यांच्या दालानाबाहेर ठिय्या आंदोलन करन्यात येईल अशा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

धर्मवीर - 2 चित्रपटातील "त्या' सीनवरुन वाद !; कोणता आहे तो सिन ? क़ाय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाइन।
धर्मवीर – 2 या चित्रपटातील एका सीनवरुन वाद निर्माण झाला आहे. या सीनमध्ये ठाण्याच्या हॉस्पीटलमधून आनंद दिघे यांची डेडबॉडी खांद्यावर घेऊन एकनाथ शिंदे यांचे पात्र धावताना दाखविले आहे. हा सीन खरंच घडला होता यावरुन वाद निर्माण झाला आहे. 

यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाठ यांनी आनंद दिघे यांना मारलं गेलं हे अख्ख्या ठाणे जिल्ह्याला माहिती आहे. चांगला ठणठणीत असलेला माणूस लगेच हार्टअटॅकने कसा काय मरु शकतो. या संदर्भातील गोष्टी हळूहळू बाहेर येतील. संजय राऊत हे त्यावेळी सामनात कारकूनगिरी करीत होते, त्यांना काय माहिती आहे. त्यावेळी ते प्रवक्ते काय व्यासपीठावर देखील नसायचे त्यांना जिथे तिथे आपणच होतो हे सांगायची सवय आहे. एकतरी आंदोलनातला त्यांचा फोटो दाखवा.
शिवसेना फोडण्यासाठी मात्र ते होते असा टोलाही संजय शिरसाठ यांनी यावेळी लगावला

Friday, September 27, 2024

कराड़च्या जय जवान जय किसान ’गणेश मंडळाचा प्रथम क्रमांक ; कृष्णा-कोयना मंडळ, अंजठा रिक्षा युनियन व बाल गणेश मंडळाने उत्कृष्ट मिरवणूक पुरस्कार मिळवला./ वाचा बातमी :

वेध माझा ऑनलाइन।
कराड शहरासह ग्रामीण भागातील सार्वजनिक गणेश मंडळांना ‘गणराया अवॉर्ड’चे गुरुवारी पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्या उपस्थितीत थाटात वितरण करण्यात आले. शहर हद्दीत शुक्रवार पेठेतील ‘जय जवान जय किसान’ने तर ग्रामीणं पोलिस ठाणे हद्दीत कापीलच्या श्रीरामनगर येथील बाल क्रीडा गणेश मंडळाने प्रथम कमांक पटकावला.

स्वतंत्रमध्ये खुशबू, देवकर बंधू, अलंकार, ब्रिजेश रावळ व विज़यकुमार भंडारे यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. कृष्णा-कोयना मंडळ, अंजठा रिक्षा युनियन व बाल गणेश मंडलाने उत्कृष्ट मिरवणूक पुरस्कार मिळवला.

कराड शहरात
1) प्रथम : जय जवान जय किसान मंडळ, शुक्रवार पेठ
2) द्वितीय : कमानी मारुती मंडळ, गुरुवार पेठ
3) तृतीय : हनुमान गणेश मंडळ तृतीय
4) उत्तेजनार्थ : हिंदुतेज मंडळ, शिंदेगल्ली व शहीद भगतसिंग मंडळ, मलकापूर
 ग्रामीण भागात…
1) प्रथम : बाल क्रीडा मंडळ, प्रथम
2) द्वितीय : सिद्धिविनायक मंडळ, सैदापूर
3) तृतीय : कोयना मंडळ, कोयना वसाहत
4) उत्तेजनार्थ : शिवतेज मंडळ, आगाशिवनगर व राधाकृष्ण मंडळ, सैदापूर

तसेच...
उत्कृष्ट सजावट विभागात कार्वे नाका येथील मार्केटचा राजा मंडळाने प्रथम, तसेच साथीदारने द्वितीय व हिंदुतेजने तृतीय क्रमांक मिळवला. उपक्रमशील मंडळात मंगलमूर्ती, राजसारथी, आगाशिवनगरच्या जिल्हा परिषद गणेश मंडळाने बाजी मारली. पर्यावरणपूरक मंडळात कहऱ्हाड पालिका, येरवळेच्या अष्टविनायक व कार्वे नाका येथील उदय मंडळाने क्रमांक मिळवले.

मुंबई विद्यापीठ सिनेटच्या निवडणुकीत युवासेनेची क्लीन स्वीप; दहाही जागांवर ठाकरेंच्या युवा सेनेचा दणदणीत विजय ;

वेध माझां ऑनलाइन।
आदित्य ठाकरे यांनी मुंबई विद्यापीठातील आपलं निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलं आहे. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील युवा सेनेने सिनेटच्या निवडणुकीत 10 पैकी 10 जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठातही डरकाळी ठाकरे गटाचीच असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.

मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुकीच्या दहाही जागांचे निकाल हाती आले आहेत. या दहाही जागांवर ठाकरेंच्या युवा सेनेने दणदणीत आणि खणखणीत विजय मिळवला आहे. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील युवा सेनेने सिनेट निवडणुकीत क्लीन स्वीप करून पुन्हा एकदा विद्यापीठावर आपलाच दबदबा असल्याचं दाखवून दिलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच ठाकरे गटाला अत्यंत प्रतिष्ठेच्या विद्यापीठाच्या निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाल्याने ठाकरेंच्या शिवसेनेत उत्साह संचारला आहे.

आज मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुकीची मतमोजणी झाली. पहिल्या निकालापासूनच ठाकरेंची युवा सेना आघाडीवर होती. दहाव्या जागेचा निकाल रात्री 11 वाजून 35 मिनिटांनी आला. युवा सेनेने 10 पैकी 9 जागा जिंकल्यानंतर दहावी जागा तरी आपल्या वाट्याला येते का? याकडे विरोधकांचं लक्ष होतं. पण व्यवस्थित नियोजन, विश्वासहार्यता आणि केलेल्या कामाची पोचपावती म्हणून पदवीधर मतदारांनी युवासेनेच्या बाजूनेच दहाव्या जागेचाही कौल दिला आणि विरोधकांचा सुपडा साफ झाला.
शेवटच्या दोन फेऱ्यानंतर युवासेनेने दहावी जागा जिंकली. युवा सेनेचे किसन सावंत हे विजयी झाले. ही दहावी जागा जिंकल्याने युवासेनेने 2018 च्या मुंबई सिनेट निवडणुकीची पुनरावृत्ती केली आहे. 2018मध्येही युवासेनेने आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात 10 पैकी 10 जागा जिंकल्या होत्या. या निवडणुकीतही पुन्हा एकदा मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीवर युवा सेनेने पूर्णपणे वर्चस्व दाखवेल आहे.

माजी खासदार संजय पाटिल यांच्यावर गुन्हा दाखल ! कवठे महाकाळच्या उपनगराध्यक्षाला घरात घुसुन मारले? क़ाय आहे बातमी?

वेध माझा  ऑनलाइन।
भाजपचे सांगलीतील माजी खासदार संजय पाटील यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कवठेमहांकाळचे माजी उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला यांना मारहाण केल्याबद्दल संजय पाटील आणि खंडू होवाळे यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कवठेमहांकाळ येथील राष्ट्रवादीचे नेते माजी उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला यांना माजी खासदार संजय पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी घरात घुसून मारहाण केल्याची घटना घडली. माजी खासदार आणि त्यांच्या समर्थकांनी मुल्ला यांच्या घरातील इतर महिला आणि मुलांनाही मारहाण केली असा आरोप आहे. यावेळी मुल्ला यांना वाचवायला आलेल्या त्यांच्या 76 वर्षीय आईलाही स्वतः माजी खासदारांनी ढकलून दिलं असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान या घटनेनंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आमदार सुमन पाटील आणि युवा नेते रोहित पाटील यांनी पोलीस ठाण्यात तळ ठोकला. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले. माजी खासदार संजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी यावेळी त्यांनी केली. 

Thursday, September 26, 2024

हौसाई विद्यालयात आकाश कंदील निर्मितीची कार्यशाळा सम्पन्न ;

वेध माझा ऑनलाइन।
हौसाई विद्यालय येथे आकाश कंदील निर्मिती कार्यशाळेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. शिवम प्रतिष्ठान चे सुहास प्रभावळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील १२५ विद्यार्थ्यांना आकाश कंदील स्वतः कसे तयार करावेत याचे प्रशिक्षण देण्यात आले विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश वेदपाठक यांचे हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. 

यावेळी बोलताना प्रभावळे म्हणाले कोणतीही कला मानवाच्या अंगी असणे अत्यंत गरजेचे आहे. कारण कला माणसाला सातत्याने आनंदी, कार्यमग्न, उत्साही ठेवण्याचा प्रयत्न करत असते. 
कलेच्या माध्यमातून माणूस विकसित होत जातो व त्याचे परिणाम सुरू त्याचे व्यक्तिमत्व विकसित होत जाते. 

आज संपूर्ण जगभर प्रदूषणाचा फार मोठा प्रश्न आहे त्यातच जर आपण पर्यावरण पूरक आकाश कंदीलाची निर्मिती केली तर प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी आपला हातभार लागेल. 

यावेळी कल्याण कुलकर्णी, वीरभद्र खुरपे, बालाजी मुंडे, पद्मावती पाटील, अंजली जानुगडे, धनाजी पाटील, प्रियांका बनसोडे, किरण कुंभार, विकास शिंगाडे इत्यादी कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार कलाशिक्षक ऋषिकेश पोटे यांनी मानले.

जयंत पाटील भाषण करत असताना...अजितदादा झिंदाबाद अशी घोषणा झाली ; मग पुढे क़ाय झाले ?वाचा बातमी;

वेध माझा ऑनलाइन।
राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पडून दोन गट निर्माण झाल्यानंतर दोन्ही गटातून विस्तव जात नाही. तरी कार्यकर्त्यांवरील दादांची भुरळ काही कमी झालेली नाही याचं प्रत्यंतर पुन्हा आले आहे. शिवस्वराज्य यात्रेच्या व्यासपीठावर जयंत पाटील यांचे भाषण सुरु असताना कार्यकर्त्यांपैकी एका अजितदादा झिंदाबाद अशी घोषणा अचानक झाली. त्यामुळे जयंत पाटील अवाक झाले. ते म्हणाले कोण आहे ते हातवर करा…असा पोरकटपणा करणार असेल तर सर्वांची भाषणे झाली आहेत,मी पुढच्या कार्यक्रमाला निघतो. मलाही वेळ नाही असेही जयंत पाटील यांनी म्हटले आणि चिडीचूप शांतता पसरली. 

अजितदादा यांना इंडिया टुडेच्या कार्यक्रमात पुन्हा शरद पवार यांच्याकडे परतणार का ? असा सवाल मुलाखतीत करण्यात आला तेव्हा ते म्हणाले की आता आम्ही खुप पुढे आलो आहोत. आता काहीही करुन सरकार स्थापन करायचं. पवार फॅमिली पुन्हा एकत्र येणार का ? या प्रश्नावर मात्र अजितदादांनी पुढचं कोणी पाहिलं आहे ? आम्ही काही भविष्य वर्तवणारे नाही अशी टिपण्णी केली होती

Sunday, September 22, 2024

वेध माझां ऑनलाइन।
खासदार शरद पवार आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. त्यानंतर दुपारी कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत. शरद पवार यांचा हा दौरा राजकीय दृष्टीने महत्वाचा मानला जात असून या दरम्यान, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातून माजी जिल्हा परिषद सदस्य व माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य सविनय कांबळे यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीवर पवार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सातारा जिल्ह्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्यांकडून अर्ज मागवले होते. त्यानुसार कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून पक्षाचे माजी जिल्हा परिषद सदस्य व माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य सविनय कांबळे यांनी उमेदवारी मिळण्याबाबत अर्ज दाखल केला आहे.
प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी अर्ज मागवले होते. १५ दिवसांच्या मुदतीत १७ जणांनी उमेदवारीची मागणी केली आहे.

Saturday, September 21, 2024

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवारांविरुद्ध उमेदवार देणार”, बच्चू कडू यांची मोठी घोषणा,


वेध माझा ऑनलाइन।
बच्चू कडू यांनी नुकतंच येत्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरुद्ध उमेदवार देणार असल्याची मोठी घोषणा केली आहे.

आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. सर्वच पक्ष जोरदार तयारी करत असून मतदारासंघांसह जागावाटपाची चाचपणीही केली जात आहे. त्यातच आता प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी महायुतीविरोधातच दंड थोपटले आहे. बच्चू कडू यांनी नुकतंच येत्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरुद्ध उमेदवार देणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड पाहायला मिळणार आहे.

राज्यातील सत्तासंघर्षानंतर शिवसेनेत फूट पडली. यावेळी बच्चू कडू हे एकनाथ शिंदेंसोबत गेले होते. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून बच्चू कडू आणि महायुती यांच्यात धुसफूस सुरु आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी बच्चू कडू यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. यावेळी बच्चू कडूंनी शेतकऱ्यांच्या मागण्या लवकरात लवकर सोडवाव्यात असे सांगत सरकारला 1 सप्टेंबरपर्यंतचा वेळ दिला होता. त्यानंतर आता बच्चू कडूंनी पत्रकार परिषद घेत एक मोठी घोषणा केली.

“आम्ही 18 मागण्या समोर ठेवल्या होत्या. मात्र त्यातील एकही मागणी पूर्ण झाली नाही. त्यामुळेच आता आम्हाला विरोधात लढावंच लागेल. आम्ही एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या विरोधातही उमेदवार देऊ. आमची महाशक्ती आघाडी पूर्ण देशात आदर्श ठरेल. आम्ही पूर्ण 288 जागांवर निवडणूक लढवणार आहोत”, असे बच्चू कडू म्हणाले.

“आम्हाला कोणीही पाठिंबा देण्याची गरज नाही. राज्यात महाशक्ती आघाडीचा मुख्यमंत्री दिसेल. महाराष्ट्रातील जनतेला तिसरा पर्याय मजबुतीने देऊ. तसेच आम्हाला कोणालाही पाठिंबा देण्याची गरज पडणार नाही, असा मोठा दावा बच्चू कडू यांनी केला. आमची महाशक्ती संपूर्ण देशात आदर्श ठरेल. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातही आम्ही उमेदवार देऊ. विशेष म्हणजे आम्ही पूर्ण 288 जागांवर उमेदवार देऊ”, असेही बच्चू कडू यांनी म्हटले.

Friday, September 20, 2024

डॉ अतुलबाबांच्या माध्यमातून कराड परिसरात उदयोग उभारणार ; कामगारांना बळकटी देण्यासाठी महायुती शासन खंबीर : ना सुरेश खाडे ;

वेध माझा ऑनलाइन।
 राज्याच्या विकासात सर्वस्तरातील कामगारांचे मोठे योगदान आहे. या कामगारांच्या कल्याणासाठी आणि त्यांना बळकटी मिळवून देण्यासाठी महायुती शासन खंबीर असल्याचे प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री ना. डॉ. सुरेश खाडे यांनी केले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची रक्कम दरमहा दीड हजारावरुन ३ हजार करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.  दरम्यान पत्रकारांशी बोलताना ना खाडे यांनी कराड़ परिसरामध्ये डॉ अतुलबाबांच्या माध्यमातून मोठे उद्योग उभे करणार असल्याचे यावेळी आश्वासन दिले

भाजपा कामगार मोर्चा कराड दक्षिणच्यावतीने शिंदेवाडी-विंग येथील समर्थ मल्टीपर्पज हॉलमध्ये भव्य बांधकाम कामगार संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रमात ना. खाडे यांच्या हस्ते कराड दक्षिणमधील सुमारे २,४९२ लाभार्थी बांधकाम कामगारांना साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच महिलांना भांडी वाटप व बांधकाम कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना ना. खाडे पुढे म्हणाले, महायुतीचे शासन सर्वस्तरातील लोकांसाठी विविध योजना राबवित आहे. बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी शासनाच्या माध्यमातून अनेक लाभ मिळवून दिले जात आहेत. याचा लाभ कामगारांनी मोठ्या प्रमाणावर घ्यावा. कामगारांची नोंदणी सुलभतेने होण्यासाठी तालुकास्तरावर विशेष सेतू केंद्र सुरु करण्यात येत आहेत. बांधकाम कामगारांबरोबरच सन्मानधन योजनेअंतर्गत वयाची ५५ वर्षे पूर्ण केलेल्या नोंदणीकृत पात्र घरेलू कामगारांच्या बँक खात्यात थेट १० हजार रुपये जमा केले जात आहेत. 

घरेलू कामगारांनाही गृहोपयोगी वस्तू संच देऊन, त्यांना मायेची ऊब देण्याचा महायुती शासनाचा प्रयत्न आहे. घरेलू कामगारांना देण्यात येणाऱ्या लाभासाठी शासनाने मोठी तरतूद केली आहे. तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची रक्कम दरमहा दीड हजारावरुन तीन हजार करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. 

डॉ. अतुल भोसले म्हणाले, सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यामध्ये सर्वाधिक बांधकाम कामगारांची नोंद झालेली आहे. अधिकाधिक पात्र लाभार्थींना याचा लाभ मिळवून देण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत. बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी महायुती शासन प्रयत्नशील असून, शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही घरोघरी जाऊन लोकांना याबाबतची माहिती देत आहोत. तसेच त्यांच्यासाठी विशेष नोंदणी अभियान राबविले जात आहे. 

यावेळी जिल्ह्याचे कामगार आयुक्त रेवणसिद्ध भिसले, कामगार आयुक्त नितीन पाटणकर, कृष्णा कारखान्याचे संचालक श्रीरंग देसाई, माजी नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, डॉ. सारिका गावडे, सौ. शामबाला घोडके, समृद्धी जाधव, भाजपा कामगार मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष दादाभाऊ उमराणी, तालुकाध्यक्ष रुपेश देसाई, योगेश पाटील, सागर पाटील, विकास साळुंखे यांच्यासह बांधकाम कामगार महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
 

बोगस मतदार नोंदणी रदद् करा; बोगस नोंदणी करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करा; कराड उत्तरच्या राष्ट्र्वादी शरदचन्द्र पवार गटाची मागणी ;

वेध माझा ऑनलाइन।
५९ कराड-उत्तर विधानसभा मतदार सघात मतदार यादी शुद्धीकरण कार्यक्रमांतर्गत झालेली बोगस मतदार नोंदणी रद्द झाली पाहिजे व बोगस नोंदणी करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई झाली पाहिजे यासाठी कराड उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षच्या वतीने मतदान नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडे निवेदन देण्यात आले.

२५९ कराड-उत्तर विधानसभा मतदार सघात मतदार यादी शुद्धीकरण कार्यक्रमांतर्गत कराड-उत्तर विधानसभा मतदार संघात दि. o५/०९/२०२४ते दि. १२/०९/२०२४ या कालावधीत वापरकर्ता 'सतीश सर' या एका नावाने मोबाईल क्र. ७८८७४८२११५ वरून हजारमाची येथील एका व्यक्तीच्या वीज बीलावर वारंवार खाडा-खोड करून पुराव्याचे कागदपत्र या सदराखाली वीज बिलाची प्रत ऑनलाईन अपलोड केलेली आहे. स्थलांतरीतांसाठी नमुना नं. ८ चे एकूण ४६२ ऑनलाईन अर्ज दाखल करून आयोगाच्या ऑनलाइन सुविधेचा गैरवापर करून नमुना नं. ८ या अर्जाव्दारे स्थलातर बेकायदेशीरपणे दाखवन मतदार नोंदणी केलेली आहे यामुळे आयोगाची फसवणूक झालेली आहे. ही बाब फार गंभीर स्वरूपाची असून लोकशाहीतील कायद्यातील तरतुदीचा भंग करणारी आहे. याप्रक्रियेसाठी आवश्यक ती कागदपत्रे घेणे गरजेचे असताना निव्वळ लाईटबीलाच्या आधारे नावनोंदणी करणे हे शंकास्पद आहे. अशा नोंदी विधानसभा मतदार संघात इतर ठिकाणी झाले असण्याची शक्यता आहे याबाबत सखोल चौकशी करुन बोगस नोंदी झालेल्या मतांच्या नोंदीबाबत योग्य ती कायदेशीर कार्यवाही करणेत यावी. त्याबाबत दि. o४/०८/२०२४ रोजी जिल्हाधिकारीसाो सातारा यांनी प्रसिध्दीस दिलेल्या बातमीनूसार बोगस मतदार नोंदणी करणे याबाबत कडक कारवाईचा इशारा देवून सुध्दा आपल्या सुचनांकडे दुलक्ष करून संबंधीत व्यक्तीने जाणूनबुजून वरील प्रमाणे गंभीर स्वरूपाचा गुन्हा केलेला आहे. त्याबाबत सदर व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात यावी, ही विनंती जर कारवाई झाली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांचे वतीने तीव्र आंदोलन करून उपोषणास पदाधिकारी बसतील याची नोंद घ्यावी. तरी संबंधीत व्यक्तींवर कायद्यातील तरतुदी नुसार कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष सुनील माने, कराड उत्तरचे अध्यक्ष देवराजदादा पाटील, मानसिंगराव जगदाळे, कांतीलाल पाटील, सौ.संगीता साळुंखे, प्रशांत यादव, भास्करराव गोरे, उध्दवराव फाळके, बाळासाहेब सुर्यवंशी, आनंदराव कोरे, पै.संजय थोरात, अविनाश माने, लालासाहेब पाटील, दिलीपराव थोरात, नंदकुमार बटाणे, ॲड.चंद्रकांत कदम, ॲड. प्रताप पाटील, जयहनुमान घाडगे, गंगाधर जाधव, दयानंद पवार, निवास चव्हाण, धनाजी माने, सुरेश पाटील, अजय सूर्यवंशी, पोपटराव साळुंखे  तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Wednesday, September 18, 2024

5 ऑक्टोबरपर्यंत आचारसंहिता आणि निवडणुकीची घोषणा होईल ; कोणी सांगितली आचारसंहिता आणि निवडणुकीची तारीख? वाचा बातमी ...

वेध माझां ऑनलाइन।
अडीच वर्षांपासून मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी कोट शिवून तयार असलेले शिंदेंचे आमदार भरत गोगावलेंनी, निवडणुकीची तारीख सांगितली. 5 ऑक्टोबरपर्यंत आचारसंहिता आणि निवडणुकीची घोषणा होईल आणि 10 ते 12 नोव्हेंबरपर्यंत मतदान असेल, असं गोगावले म्हणालेत. गिरीश महाजनांनीही 10 ते 15 दिवसांत घोषणा होणार असल्याचंम्हटलंय. 
महाराष्ट्र विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबरला संपतेय. त्याआधी निवडणुका आणि निकाल येवून नव्या सरकारचा शपथविधी होणं आवश्यक आहे.
त्यामुळं आता जागा वाटपावरुन मुंबईतल्या सॉफिटेल हॉटेलमध्ये महाविकास आघाडीची बैठक झाली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, संजय राऊत आणि अनिल देसाई उपस्थित होते. मुंबईतल्या 36 पैकी 30 जागांवर चर्चा झाली असून जवळपास जागा वाटप पूर्ण झालंय. 6-7 जागांवर लवकरच तोडगा काढण्यात येईल पुढचे 2 दिवस उर्वरित महाराष्ट्रातील जागांवर चर्चा होणार आहे. 2019मध्ये जिंकलेल्या जागा त्या त्या पक्षाकडेच राहणार आहेत. जिंकलेल्या जागा सोडून इतर जागांवर पक्षाची ताकद पाहून कोण उमेदवार असेल यावरही चर्चा झालीय. मेरिटनुसार जागा वाटप केलं जाणार असल्याचं महाविकास आघाडीकडून सांगण्यात आलंय.


रणजितनानाच्या दातृत्वाचे कौतुक ; विसर्जन दिवशी कृष्णा घाटावर ५० हजारावर गणेशभक्तांना सलग १५ तास अखंड महाप्रसाद ;

वेध माझा ऑनलाइन।
एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक व सामाजिक कार्यकर्ते रणजितनाना पाटील व मित्र परिवाराच्या वतीने अनंत चतुर्दशीला कृष्णा घाटावर गणेश भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सुमारे ५० हजारावर भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. सर्व भाविकांनी रणजितनाना पाटील यांच्या दातृत्वाचे कौतुक केले आहे.
रणजितनाना पाटील मित्र परिवारातर्फे गेली दहा वर्षे विसर्जन दिवशी या महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी सुमारे 50 हजार भाविकांना महाप्रसादाचा लाभ देण्याचे नियोजन करण्यात आले होते. सकाळी अकरा वाजता सुरू झालेला महाप्रसाद पहाटे तीन वाजेपर्यंत सुरू होता. शेवटच्या मंडळाच्या गणपतीचे विसर्जन होईपर्यंत महाप्रसाद सुरू होता.

सकाळी कृष्णा घाटावर घरगुती गणेश विसर्जनासाठी आलेल्या नागरिक व महिलांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. त्यानंतर सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांनी यांचा लाभ घेतला. बंदोबस्तासाठी असणारे पोलीस कर्मचारी, शासकीय कर्मचारी, नगरपालिका कर्मचारी यांनीही लाभ घेतला. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी भाविकांना फूड पॅकेटही देण्यात येत होते.
गरमागरम शाकाहारी पुलाव आणि दालचा सोबत पाण्याची बाटली असा मेनू होता. सकाळी माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले व माजी आमदार आनंदराव पाटील यांनी सदिच्छा भेट देऊन रणजितनाना पाटील यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार व  गिरीष सिहासने साहेब यांनीही शुभेच्छा दिल्या‌.
रणजितनाना पाटील यांचे बंधू सचिन पाटील हेही महाप्रसादाच्या नियोजनावर लक्ष ठेवून होते.

अखंड १५ ते २० तास सुरू असलेल्या या उपक्रमासाठी रणजीतनाना पाटील, सचिन पाटील, सरपंच चंद्रकांत काशिद.रवि भावके.सागर आमले अँड. दीपक थोरात, आशपाक मुल्ला(भैय्या) नितीन महाडीक कल्पेश मुळीक विशाल आचारी राहुल बर्गे महेश पाटील दिलीप पाटील राहुल टकले गुलाब पाटील सर्जेराव पानवळ स्वातीपिसाळ स्वप्नील यादव व  आपले कराड, गब्बर ग्रुप मित्र परिवार, जेष्ठ नागरीक छत्रपती शिवाजी संघाचे सर्व मंडळी उपस्थित होती

कोल्हापूर हादरले; ९ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार


वेध माझा ऑनलाइन ।
बदलापूर अन् कोलकाता येथील अत्याचाराचे प्रकरण ताजे असतानाच  कोल्हापुरात देखील एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. राधानगरी येथील खासगी क्लासमध्ये शिकत असणा-या नऊवर्षीय चिमुकलीवर ७३ वर्षीय नराधमाकडून लैंगिक अत्याचार करण्यात आले आहेत. या घटनेमुळे कोल्हापूर हादरून गेले असून, राज्यात महिला आणि चिमुकलींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राधानगरी तालुक्यातील नरतवडे इथल्या खासगी क्लासमध्ये ७३ वर्षीय श्रीपती भोसले याआरोपींने पिडीतेला क्लासमध्ये बोलवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी राधानगरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोक्सो कायदा अंतर्गत श्रीपती भोसले या ७३ वर्षीय नराधमावर हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, राधानगरी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

पश्चिम बंगालमधील महिला डॉक्टरवर लैंगीक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. हे प्रकरण जगभरात गाजत आहे. तर बदलापूरच्या घटनामुळे देखील मोठा जनआक्रोश पहावयास मिळाला होता. या घटनेमुळे राज्यातील जनता रस्त्यावर उतरली होती. त्यानंतर देखील राज्यातील विविध जिल्ह्यात लैंगीक अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. आता कोल्हापूरमधील मधील या घटनेमुळे चांगलीच खळबळ माजली असून, नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

बारामतीचे पाणी फलटणला आणल्यामुळेच आपली खासदारकी गेली ; रणजितसिंह नाईक निंबाळकर

वेध माझा ऑनलाइन।
सासवड, ता. फलटण येथील धोम बलकवडी मायनर 37 व 33 च्या उदघाटन रणजितसिंह नाईक निंबाळकर व ज्येष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी पराभवामागचे कारण बोलून दाखवले. बारामतीचे पाणी फलटणला आणल्यामुळेच आपली खासदारकी गेली आहे. परंतु, फलटण खासदारकी गेली, तरी फलटण तालुक्याच्या विकासाबाबत कसलीही तडजोड करणार नसल्याचे प्रतिपादन माजी खा. निंबाळकर यांनी म्हंटले.


यावेळी धोम बलकवडी लघुवितरिका, सासवड ते माळीबेंद रस्ता, माळी बेंद ते रासकर वस्ती रस्ता, लघुबंधारे, विद्युत पोल, महालक्ष्मी मंदिर संभामंडप व कंपाउंड आदी विकासकामांचे उदघाटन व लोकार्पण करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

रणजितसिंह निंबाळकर म्हणाले, 30 वर्षात रामराजेंनी फलटणचे पाणी बारामतीला विकले, लाल दिव्यासाठी फलटणच्या जनतेला बारामतीत गहाण ठेवले त्यांनी देवेंद्र फडणवीस व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या कामाचे श्रेय घेऊ नये. ज्या आमदाराला मतदार संघाला निधी किती आला हे माहित नसते हे तालुक्याचे दुर्दैव म्हणावे लागेल आणि असल्या नंदीबैलाला घरी पाठवण्याची वेळ आता आली आहे. येत्या विधानसभेत फलटण ची सुज्ञ जनता ते काम चोख करेल यात शंका वाटत नाही.

एक देश एक निवडणूक या प्रस्तावाला मोदी यांच्या मंत्रिमंडळाची मंजुरी ; मोठी बातमी...

वेध माझा ऑनलाइन।
केंद्रातील मोदी सरकारने आपल्या तिसऱ्या टर्म मध्ये मोठा निर्णय घेतला आहे. एक देश एक निवडणूक  या प्रस्तावाला मोदी यांच्या मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिल्याची माहिती समोर येत आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या अहवालानंतर मंत्रिमंडळात या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर आता संपूर्ण देशात विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकाच वेळी घेणे शक्य झालं आहे. यामुळे निवडणुकीत होणारा खर्च सुद्धा वाचण्यास मदत होणार आहे.

‘एक देश, एक निवडणूक’ धोरण कितपत शक्य आणि व्यवहार्य आहे, याचा अभ्यास करण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करण्यात आली होती. या समितीने ‘एक देश, एक निवडणूक’ धोरणबाबत एक अहवाल सादर केला होता. या अहवालाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याचे समजते. आता या धोरणाला संसदेत मंजुरी मिळणे आवश्यक आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात हा प्रस्ताव मंजूर करण्यात येईल. 5 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून दिलेल्या भाषणात वन नेशन-वन इलेक्शनचा उल्लेख केला होता. वारंवार होणाऱ्या निवडणुका देशाच्या प्रगतीत अडथळे आणत असल्याचे ते म्हणाले होते.
खरं तर एक देश एक निवडणूक हि संकल्पना अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. मोदी सरकारच्या मागच्या कार्यकाळापासूनच यावर गंभीर चर्चा सुरु होती. मात्र तेव्हा सरकारने असा कोणताही निर्णय घेतला नव्हता. मात्र नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भाजपकडून एक देश एक निवडणूक धोरणाचा पुनरुच्चार करण्यात आला होता. आता केंद्र सरकारने आपला शब्द खरा करून दाखवला आहे आणि या धोरणाला मान्यता दिली आहे. या प्रस्तावावरील विधेयक संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. मात्र विरोधक या धोरणाबाबत काय भूमिका घेतात हे सुद्धा पाहायला हवं.

Sunday, September 15, 2024

क्रराडचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे युवा नेते रणजीत नाना पाटिल यांचे यावर्षी सुमारे 50 हजार भाविकांना महाप्रसादाचा लाभ देण्याचे नियोजन ; यावेळी महाप्रसादांचे सलग दहावे वर्ष ;

वेध माझा ऑनलाइन।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक व सामाजिक कार्यकर्ते रणजितनाना पाटील व मित्र परिवाराच्या वतीने मंगळवारी १७ रोजी अनंत चतुर्दशीला कृष्णा घाटावर येणाऱ्या गणेश भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी सुमारे ५० हजार भाविकांना महाप्रसाद देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
रणजितनाना पाटील मित्र परिवारातर्फे गेली नऊ वर्षे विसर्जन दिवशी या महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. त्यामुळे विसर्जनाला आलेल्या भाविकांची मोठी सोय होते या यावर्षी सुमारे 50 हजार भाविकांना महाप्रसादाचा लाभ देण्याचे नियोजन करण्यात आले आहे त्यासोबत महाप्रसादासोबत पाण्याची बाटली ही देण्यात येणार आहे

मंगळवारी १७ रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी ११ वाजता महाप्रसाद कार्यक्रम सुरू होणार असून तो पहाटेचा शेवटचा गणपती विसर्जन होईपर्यंत सुरू राहणार आहे. 

कराड शहर व तालुक्यातील गणेश भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन  स्वराज्य रक्षक धर्मवीर श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीचे संस्थापक सचिव रणजित नाना पाटील यांनी केले आहे.

Friday, September 13, 2024

मोदी सरकारचा शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा निर्णय, देशभरातील बळीराजाला दिलासा

वेध माझा ऑनलाइन।
सरकारने कांदा आणि बासमती तांदळासाठी असलेले किमान निर्यात मूल्य काढून टाकलं आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचे निर्यातमार्ग खुल्या पद्धतीनं उपलब्ध होतील.
मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे, ज्यामुळे शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारने कांदा आणि बासमती तांदळासाठी असलेले किमान निर्यात मूल्य काढून टाकलं आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचे निर्यातमार्ग खुल्या पद्धतीनं उपलब्ध होतील, आणि त्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मागणीचा अधिक फायदा मिळू शकेल. कांद्याच्या किमान निर्यात मूल्याचा निर्णय मागे घेण्यात आला आहे, ज्यामुळे शेतकरी आता थेट परदेशात कांदा निर्यात करू शकतील. याआधी सरकारने कांद्याच्या दरातील अस्थिरतेला आळा घालण्यासाठी निर्यात मर्यादित केली होती, ज्यामुळे देशांतर्गत किंमती नियंत्रित राहतील. मात्र, यामुळे अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला चांगला भाव मिळत नव्हता.
आता मोदी सरकारच्या निर्णयामुळे कांदा निर्यात सोपी झाली आहे. आता, MEP हटवल्यामुळे कांद्याच्या निर्यातीचा मार्ग मोकळा झाला आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर लाभ होईल. विशेषतः कांद्याची मोठी मागणी असलेल्या खाडी आणि आशियाई देशांमध्ये याचा मोठा फायदा होणार आहे.

बासमती तांदळावरील किमान निर्यात मूल्य काढून टाकल्यामुळे तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांना देखील लाभ मिळेल. बासमती तांदूळ ही भारताची महत्त्वाची निर्यात वस्तू आहे आणि याची आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली मागणी आहे. यापूर्वी सरकारने बासमती तांदूळ निर्यातीवर मर्यादा घातली होती. आता ती हटविण्यात आली आहे.
मोदी सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकरी वर्गाला थेट आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संधी मिळतील, जे त्यांच्यासाठी आर्थिकदृष्ट्या मोठा लाभ ठरणार आहे. विशेषतः कांदा उत्पादक आणि बासमती तांदूळ उत्पादकांसाठी ही मोठी दिलासा देणारी बातमी आहे. यामुळे निर्यात वाढेल, आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल. या निर्णयाचे एकूण परिणाम म्हणून, भारतीय शेतकरी आता जागतिक स्तरावर स्पर्धा करू शकतील आणि त्यांना त्याच्या उत्पादनाची योग्य किंमत मिळेल. यामुळे भारताच्या कृषी निर्यातीला एक नवी चालना मिळण्याची शक्यता आहे.

Thursday, September 12, 2024

सरकारचा मोठा निर्णय ; ७० वर्षांवरील वृद्धांना 5 लाख रूपयापर्यंतचे उपचार मिळणार मोफत ;

वेध माझा ऑनलाइन
केंद्रातील मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता ७० वर्षांवरील सर्व वृद्धांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेअंतर्गत 5 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ७० वर्षाच्या वरील वृद्धांना उपचाराचा खर्च या योजनेच्या माध्यमातूनच केला जाईल. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भाजपने आश्वासन दिले होते की ते आयुष्मान भारत योजनेचा विस्तार करतील. आता सरकारने आपला शब्द पाळला आहे.

सरकारने सांगितल्यानुसार, आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत ७० वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या वृद्धांचा समावेश केला जाईल. यामुळे जवळपास 4.5 कोटी कुटुंबांना फायदा होईल आणि ६ कोटी वृद्ध नागरिकांना ५ लाखांपर्यंत फ्री उपचार मिळेल. यातील पात्र ज्येष्ठ नागरिकांना अंतर्गत नवीन स्वतंत्र कार्ड दिले जाईल. जी कुटुंबे आधीच आयुष्मान भारत योजनेचा भाग आहेत, त्यांच्या कुटुंबातील एक व्यक्ती ७० वर्षांपेक्षा जास्त वयाची असल्यास, त्यांना वर्षाला ५ लाख रुपयांपर्यंत अतिरिक्त टॉप-अप मिळेल. जी कुटुंबे सध्या आयुष्मान भारत योजनेत नाहीत. ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचा त्यात समावेश केला जाईल आणि त्यांना दरवर्षी ५ लाख रुपयांचे शेयर्ड कव्हर मिळेल.

७० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिक जे आधीच केंद्र सरकारच्या आरोग्य योजना माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना आयुष्मान केंद्रीय सशस्त्र पोलीस दल इत्यादी इतर सार्वजनिक आरोग्य विमा योजनांचा लाभ घेत आहेत. त्यांना एकतर त्यांची आधीची योजना निवडावी लागेल किंवा आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेची निवड करू शकता.


राज्यात टायफाईड ची साथ ! क़ाय आहेत लक्षणे ? क़ाय घ्याल काळजी?

वेध माझा ऑनलाइन।
 सध्या डेंग्यू, मलेरियासह सर्दी पडसं हे आजार डोकं वर काढतं आहेत. लहान मुलांना तर या संसर्गजन्य आजारांची भीती जास्त असते. अशातच आता डेंग्यू, मलेरियासह टायफॉईडचाही धोका वाढला आहे. मात्र त्याची लक्षणे आणि काय काळजी घ्यावी हे जाणून घेऊयात…

काय आहेत टायफॉईडची लक्षणं? :
दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील पावसाळ्यात टायफॉईडचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. कारण या दिवसात हवेतील ओलावा शिजलेल्या अन्नाला लवकर नासवत असतो. यामुळे अन्नावर आणि पाण्यात साल्मोनेला टायफी नावाची बुरशी तयार होत असते. मात्र हे अन्न आणि पाणी शरिरात गेलं की ही बुरशी आतड्यांवर चढते आणि टायफॉईड या आजाराचा संसर्ग त्या व्यक्तीस होतो.

ताप येणे
उलट्या
जुलाब
अशक्तपणा
भूक कमी लागणे


 नेमकी काय काळजी घ्यावी? :
– सर्वात महत्वाचं म्हणजे बाहेरचे उघड्यावरचे पदार्थ चुकूनही खाऊ नका.
– दिवसभर भरपूर पाणी प्या. याशिवाय शक्यतो पाणी उकळून प्यावे.
– ताजे अन्न खावे. तसेच शिळे, उरलेले अन्नपदार्थ खाणं पूर्णपणे टाळा.

वाढत्या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि रुग्णाला वरील लक्षणे आढळली तर लवकरात लवकर डॉक्टरांच्या सल्ल्यानं रक्ताच्या तपासण्या करून घ्याव्यात. तसेच एंजाइम लिंक्ड इम्यूनोसोर्बेंट टेस्ट, फ्लुरोसेंट एंटीबाडी टेस्ट, विडाल टेस्ट या तपासण्या देखील करून घ्याव्यात.

रात्री 12 नंतर वाद्य वाजवण्यास परवानगी दया / गणेश मंडळांचे एसपींकडे निवेदन

वेध माझा ऑनलाइन।
यंदाच्या वर्षी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये शासनाने सर्व वाद्ये वाजवण्यास रात्री बारा वाजेपर्यंत परवानगी दिली आहे. बहुतांश मंडळांनी केलेली आरास पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावातील लोकही मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. मात्र, रात्री १२ नंतर वाद्य वाजवण्यास बंदी केल्यामुळे आरास पाहण्यास दर्शक थांबत नसल्याने तसेच मंडळांच्या गणेशमूर्ती केवळ औपचारिकरित्या शांततेने विसर्जन कराव्या लागत असल्याने सर्व गणेशभक्तांचा उत्साह व त्यांच्या भावना लक्षात घेऊन रात्री बारानंतर देखील वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी साताऱ्यातील गणेशोत्सव मंडळांनी निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे केली आहे.


निवेदनात म्हटले आहे, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात साजरे होणारे उत्सव म्हणजे गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव. या दोन्ही उत्सवांना राज्यात लोकमान्यता आहे आणि शासनाने देखील राजमान्यता दिली आहे. सातारा शहरात सुमारे २५0 पेक्षा जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे ओहत. गेल्या काही वर्षांमध्ये गणेशोत्सवाचे स्वरुप बदलत आहे.
त्याबाबत न्यायालयाकडून, शासनाकडून तसेच पोलीस खात्याकडून अनावश्यक अशी बंधने घातली जात आहेत. तरुणांच्या आनंदावर विरजण पडत आहे. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या कालावधीत देखावे, ध्वनीक्षेपकासाठी वेळेची बंधने घातली जात आहेत. परंतु, ही सर्व बंधने घालताना आणि त्याची कार्यवाही व कारवाई करताना पोलीस यंत्रणा आणि गणेशोत्सव मंडळांमध्ये योग्य तो सुसंवाद, समन्वय असावा, त्याच उद्देशाने सहा मागण्या नमूद करत आहोत.
विसर्जन मिरवणूकीत बारानंतरही वाद्य वाजवण्यास परवानगी देण्यात यावी. विसर्जन मिरवणुकीचा मार्ग पारंपरिक जसा सुरु आहे तसाच याही वर्षी सुरु ठेवावा, कोणत्याही मंडळाला मिरवणुकीत लवकर पुढे जाण्यासाठी सक्ती करु नये, प्रशासनाने सहकार्याची भूमिका ठेवावी,
विसर्जन मिरवणुकीमध्ये गणेश भक्तांकडून उत्साहाच्या भरात प्रशासनाच्या सूचनेचे पालन न झाल्यास त्यांना योग्य तशी समज द्यावी, कोणतेही कायदेशीर खटले दाखल करु नयेत, विसर्जन मार्गावरील वाहतूक वळवण्यात यावी, पार्किंगचा प्रश्न सोडवावा, त्याची सूचना अगोदर जाहीर करावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

उदयनराजे म्हणाले...साताऱ्यांत डॉल्बी वाजवणार ; मंत्री शंभूराज देसाई म्हणाले...कारवाई होणार;

वेध माझा ऑनलाइन।
गणेश विसर्जन मिरवणुकीवरील वेळेचं बंधन आणि वाद्यांवरील निर्बंधावरून साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले आणि पालकमंत्री शंभूराज देसाईंनी एकमेकांना आव्हान दिलंय. प्रशासनाने नियमांचा बागुलबुवा उभा करून गणेशोत्सवाच्या उत्साहावर विरजण घालू नये. असे कितीसे पोलीस आहेत. तेवढा पोलीस फोर्स जिल्ह्याला पुरेसा नाही. त्यामुळं इथं पण युपी, बिहारच होईल, या गोष्टीचं पोलिसांनी भान ठेवावं. लाठीचार्ज झाला तर ‘अरे ला कारे’ने उत्तर देता येईल, असं उदयनराजेंनी सुनावलं आहे. उदयनराजेंच्या या आव्हानाला पालकमंत्री शंभूराज देसाईंनी देखील प्रत्त्युतर दिलंय.

साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले आणि पालकमंत्री शंभूराज देसाई या दोघांनी स्वतंत्रपणे माध्यमांशी संवाद साधला. प्रथम उदयनराजेंनी संवाद साधत डॉल्बी वाजवण्यात येणार असल्याचे सांगून टाकले. मुंबई, पुण्यात डॉल्बी वाजविला जात असताना साताऱ्यात याला का बंदी? असा सवाल करत डॉल्बी नियमात राहून वाजवावा, असे म्हंटले. त्यांच्या या वक्तव्यानंतर पालकमंत्री देसाई यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन डॉल्बी आणि उदयनराजेंच्या वक्तव्याबाबत सविस्तर भूमिका मांडली. यावेळी पालकमंत्री देसाई म्हणाले की, त्यांच्या उदयनराजेंचं वक्तव्य आम्ही तपासून घेऊ. शासनाचे नियम आणि हायकोर्टाचे काय निर्देश आहेत, त्याची माहिती उदयनराजेंना दिली जाईल. कोणी नियम आणि कायद्याचं उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पालकमंत्र्यांनी दिला आहे.

तुम्ही पवार साहेबांची माफी मागून मोकळे झालात, आता आम्ही कुणाची माफी मागायची ; आम्ही मात्र वाईट ठरलो ; अजितदादांच्या समर्थकाचा सवाल ; पत्र व्हायरल ;

वेध माझा ऑनलाइन।
लोकसभा निवडणुकीनंतर आता विधासभा निवडणुकीच्या तोंडावर आता बारामतीत अजित पवार समर्थकाचं एक पत्र सध्या व्हायरल झालं आहे. 
भावनिक राजकारणाचा सल्ला देणारे अजित पवारच भावनिक कार्ड का खेळताय? असा सवाल या पत्राद्वारे करण्यात आला आहे. 
या पत्रातून असे म्हटलंय की, दादा बरे आहात का…हल्ली तुमची काळजी वाटते. दुर्दैव आहे की हे पत्र नाव न लिहिता लिहावं लागतंय. कारण नाव कळालं तर पुढे राजकारणात भविष्य राहिल की नाही हा प्रश्न आहे. आजकाल तुमचं वागणं, बोलणं, सांगणं आणि ऐकणंही बददलंय. जाहीर सभेत चूक झाली म्हणून कबुली देताय, कधी खदखद व्यक्त करताय. कधी भावनिक होताय, की सहानुभूतीचं कार्ड खेळताय? तुम्ही माफी मागून मोकळे झालात, पण आम्ही पवार साहेबांच्या लेखी वाईट ठरलो. आता आम्ही कुणाची माफी मागायची हे सुद्धा सांगा… असं या पत्रातून समर्थकानं म्हटलंय.हे पत्र सध्या सोशल मिडियावर वहायरल होतय

Wednesday, September 11, 2024

राज्यभरात आज निवडणूक झाली तर ? सर्व्हेतून धक्कादायक माहिती उघड ; कोणत्या किती जागा मिळतील ?

वेध माझा ऑनलाइन।
महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागांसाठी आगामी काळात निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत 145 हा बहुमताचा आकडा आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टाईम्स नाऊ नवभारत मॅट्रीजचा ओपिनियन पोल समोर आला आहे. या पोलमध्ये धक्कादायक खुलासा झाला आहे.

देशात दोन महिन्यांपूर्वी लोकसभेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत देशभरात भाजपला चांगलं यश मिळालं. पण महाराष्ट्रात भाजपला पाहिजे तसं यश मिळालं नाही. या निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला मोठा फटका बसला. फक्त भाजपलाच नाही तर महायुतीमधील तीनही पक्षांना या निवडणुकीत महाराष्ट्रात फटका बसला. या निवडणुकीतून धडा शिकून महायुतीने नव्या योजना आणि घोषणांचा पाऊस सुरु केला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची प्रचंड महत्त्वकांक्षी आणि गेमचेंजर योजना ठरण्याची चिन्हं आहेत. कारण लोकसभेत जसा फटका बसला तर फटका महायुतीला आगामी विधानसभा निवडणुकीत बसण्याची शक्यता कमी आहे. पण तरीदेखील महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात काँटे की टक्कर असणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील? आणि कोण बाजी मारेल? याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टाईम्स नाऊ नवभारत मॅट्रीजकडून सर्वेक्षण करण्यात आलं आहे. या सर्वेक्षणातून समोर आलेली आकडेवारी ही आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड रणधुमाळी रंगणार असल्याचे संकेत देत आहेत. महाराष्ट्रात आज निवडणूक झाली तर महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात प्रचंड चुरस होणार असल्याचं पोलमध्ये म्हटलं आहे. 
पोलनुसार, महायुतीमधील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्ष हे आघाडीवर आहेत. पण तरीदेखील महाविकास आघाडीतील ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेस हे महायुतीपासून फार लांब राहणार नाहीत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीतील लढाई कोणत्याच पक्षासाठी सोपी राहणार नाहीय

महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागांसाठी आगामी काळात निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत 145 हा बहुमताचा आकडा आहे. पोलनुसार, आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला 137 ते 152 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला 129 ते 144 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुती बहुमताचा आकडा गाठू शकते. पण तो आकडा गाठणं महायुतीलादेखील सोपं होणार राहणार नाही.
ओपिनियन पोलची आकडेवारी काय सांगते?
टाईम्स नाऊ नवभारत मॅट्रीजच्या पोलनुसार, भाजप महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे. पण तरीही भाजपच्या जागा घटण्याची शक्यता आहे. पोलनुसार, महाराष्ट्रात भाजपला 83 ते 93 जागावर समाधान मानावं लागण्याची शक्यता आहे. तर शिवसेना शिंदे गटाला 42 ते 52 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. तर अजित पवार गटाला फार कमी अवघ्या 7 ते 12 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे.
पोलनुसार, महाविकास आघाडीत काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. त्या पाठोपाठ राष्ट्रवादी शरद पवार गट आणि त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचा नंबर लागण्याची शक्यता आहे. या ओपिनियन पोलनुसार, महाराष्ट्रात काँग्रेसला 58 ते 68, शरद पवार गटाला 35 ते 45 जागा आणि शिवसेना ठाकरे गटाला 26 ते 31 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. तसेच इतरांना 3 ते 8 जागा मिळण्याचा शक्यता

Sunday, September 8, 2024

लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर अतिरिक्त भार पडत असल्याची माहिती; सोशल मीडियावर एक पत्र व्हायरल? क़ाय आहे त्या पत्रात ?

वेध माझा ऑनलाइन ।
महायुती सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर अतिरिक्त भार पडत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. वित्त विभागाकडे आलेले अनेक प्रस्ताव पुढे ढकलले जात आहेत किंवा त्याला स्थगिती दिली जात असल्याचंही समोर आलं आहे. त्यामुळेच ऐन सणासुदीच्या काळात राज्यातील होमगार्डच्या भत्तावाढीला स्थगिती मिळाली आहे. तशा आशयाचं पत्रही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


काय आहे "त्या' पत्रामध्ये? 
राज्यातील होमगार्ड सेवेच्या विविध भत्त्यांमध्ये वाढ करण्यास मान्यता देण्याची वित्त विभागास विनंती करण्यात आली होती. सन 2024-25 च्या अर्थसंकल्पामध्ये महिला, शेतकरी, युवा, मागास वर्ग आणि समाजातील सर्व दु्र्बल घटकांना आर्थिक मदत व प्रगतीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध योजनांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यावरील आर्थिक भार मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. 

त्यामुळे विभागाने सादर केलेला प्रस्ताव काही काळासाठी पुढे ढकलण्याबाबत किंवा सद्यःस्थितीत स्थगित ठेवण्याबाबत विचार करणे आवश्यक आहे असे अभिप्राय वित्त विभागाने दिले आहेत. सबब, राज्यातील होमगार्ड यांच्या विविध भत्त्यांमध्ये वाढ करण्याबाबतचा प्रस्ताव सद्यःस्थितीत स्थगित ठेवण्यात येत आहे. 

दरम्यानराज्यात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी मदत करण्यासाठी राज्य सरकारकडून राखीव निधी ठेवण्यात येतो. हा निधी लाडकी बहीण योजनेकडे वळवण्याचा निर्णय 3 सप्टेंबर रोजी घेण्यात आला होता. त्यावर टीका होताना नंतर हा निर्णय मागे घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.
राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू करण्याचं जाहीर झाल्यानंतर त्यासाठी निधी कसा उभा करायचा असा प्रश्न पडला होता. राज्यात 21 ते 60 वयोगटातील महिलांची संख्या ही दोन कोटींच्या वरती आहे. त्यासाठी दरवर्षी 46 हजार कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. हा निधी कसा उभा करायचा असा सवाल अर्थविभागाने विचारला होता. महिलांसाठी सामाजिक न्याय, आदिवासी विभाग, महिला आणि बालकल्याण विभागाच्या अनेक योजना आहेत. त्यात ही योजना सुरू केल्यास एकाच लाभार्थ्याला दोन दोन योजनांचा लाभ मिळण्याची शक्यता आहे असंही अर्थ खात्याने म्हटलं होतं.   

राज्याच्या तिजोरीवर मोठा भार
लाडकी बहीण योजनेंतर्गत आतापर्यंत राज्यातील 1.59 महिलांना 4,787 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहेत. जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे एकत्रितरित्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. 

एकंदरीतच, राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा भार पडत असून आर्थिक चणचण वाढल्याचं दिसतंय. पण समोर विधानसभेची निवडणूक असल्याने ओढाताण करून, अनेक गोष्टींना फाटा देऊन या योजनेवर खर्च करावा लागतोय असं सध्या तरी चित्र आहे. 


गणेश चतुर्थीचेनिमित्त शिंदे सरकार कडून पुन्हा एकदा ‘आनंदाचा शिधा’ ; अवघ्या १०० रुपयांत मिळणार या ४ वस्तू ;

वेध माझां ऑनलाइन।
सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धूम असून प्रत्येकाच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. गणरायाच्या आगमनाने सर्वांच्या मनात उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे. आता याच आनंदात सरकारच्या एका निर्णयाने आणखी भर पडली आहे. गणेश चतुर्थीचे निमित्त साधून शिंदे सरकार कडून पुन्हा एकदा ‘आनंदाचा शिधा’ या उपक्रमाचे वाटप करण्यात येणार आहे. हा आनंदाचा शिधा यंदाही अवघ्या १०० रुपयांत उपलब्ध असून सर्वसामान्य जनतेला या माध्यमातून ४ वस्तू देण्यात येणार आहेत.

या योजनेन्तर्गत पात्र कुटुंबांना फक्त 100 रुपयांत चणाडाळ, तेल, साखर, रवा अशा ४ वस्तू मिळणार आहे. यात चणाडाळ 1 किलो, सोयाबीन तेल 1 लिटर, साखर 1 किलो, आणि रवा 1 किलो मिळेल. राज्यातील सर्वसामान्य आणि गरीब जनतेचा सण गोड़ व्हावा यासाठी सरकार हा उपक्रम राबवत आहे. मात्र यासाठी काही अटी सुद्धा आहेत. त्याची पूर्तता झाल्यानंतरच आनंदाचा शिधा मिळणार आहे.
आनंदाचा शिधा वाटपासाठी सरकारकडून तब्बल 562 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहेत. जे कुटुंब अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिकाधरक आहे त्यांना सरकारच्या या उपक्रमाचा लाभ मिळणार आहे. सोबतच प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारकांनाही हा आनंदाचा शिधा दिला जाईल. 

सर्वात मोठी बातमी! मराठा आरक्षणाबाबत कोर्टाकडून निकाल जाहीर होणार? मराठा समन्वयक विनोद पाटील यांची माहिती ;


वेध माझा ऑनलाइन ।

मराठा आरक्षणाबाबत सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारची गेल्या अनेक वर्षांपासून न्यायालयीन लढाई सुरु आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारच्या काळात त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. पण ते आरक्षण काही वर्षांनी सुप्रीम कोर्टात टिकलं नव्हतं.राज्य सरकारला याआधी या प्रकरणात अपयशाला सामोरं जावं लागलं होतं. तरीही
दरम्यान राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करत सुप्रीम कोर्टात युक्तिवाद केला. ही याचिका आता सुप्रीम कोर्टात अंतिम टप्प्यावर असल्याची माहिती समोर येत आहे.

मराठा आरक्षणाची लढाई ही सोपी नाही. या लढाईसाठी अनेक जण झटत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारच्या काळात त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. पण ते आरक्षण काही वर्षांनी सुप्रीम कोर्टात टिकलं नव्हतं. सुप्रीम कोर्टाच्या निकालावर पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती. याच याचिकेबाबत आता मोठी बातमी समोर येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. आता या याचिकेच्या अंतिम सुनावणीचा वेळ जवळ आला आहे. येत्या आठवड्यात सुप्रीम कोर्ट संबंधित याचिकेवर मोठा निकाल देणार आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा संबंधित निकाल हा ऐतिहासिक ठरणार आहे. या निकालात राज्यातील मराठा समाजाला दिलासा मिळतो का? ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. हा निकाल सकारात्मक राहिला तर महायुती सरकारसाठी आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधी मिळालेलं मोठं गिफ्ट ठरणार आहे. अर्थात याबाबत काय-काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मराठा आरक्षणाच्या पुनर्विचार याचिकेवर पुन्हा सुनावणी होणार आहे. पुनर्विचार याचिकेवर 11 सप्टेंबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. या याचिकेवर येत्या 11 सप्टेंबरला अंतिम निर्णय येण्याची शक्यता आहे. मराठा समन्वयक विनोद पाटील यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. विनोद पाटील यांच्याच वतीने सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे.

विनोद पाटील यांच्याकडून महत्त्वाची माहिती
“मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केल्यानंतर माझ्यावतीने आणि राज्य सरकारच्या वतीने सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पिटीशन सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. अनेक दिवसांपासून सुनावणी सुरु आहे. पण न्याय अद्याप मिळालेला नाही. 11 सप्टेंबरला न्याय आम्हाला मिळेल. सरकारने प्रचत्न केला तर निश्चितपणे आम्हाला न्याय मिळेल. कारण त्यांना कल्पना आहे, माहिती आहे की, न्यायालयात कधीकधी कशाप्रकारे जावं लागतं. त्यांनी ते करावं, अशी अपेक्षा मला आणि समाजाला आहे”, असं विनोद पाटील म्हणाले.

“11 सप्टेंबरला 1001 क्रमांकाची सुनावणी आहे. दुपारच्या वेळेस मराठा आरक्षणाच्या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे. या सुनावणीत निर्णय येणं अपेक्षित आहे”, अशी आशा विनोद पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. विनोद पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार 11 सप्टेंबरला मराठा आरक्षणाच्या याचिकेवर अंतिम सुनावणी होऊन निकाल जाहीर झाला तर मराठा आरक्षणासाठीचा तो मोठा दिवस ठरणार आहे. अर्थात या प्रकरणात काय-काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

लाडकी बहीण योजेनेबाबत सरकारचा नवा निर्णय ; बैंकांना करणार सूचना; क़ाय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाइन ।
राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शिंदे सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून २१ ते ६५ वयोगटातील मात्र महिलांच्या बँक खात्यावर दर महिन्याला १५०० रुपये सरकारकडून जम करण्यात येत आहेत. आत्तापार्यंत जुलै आणि ऑगस्ट अशा २ महिन्याचे ३००० रुपये महिलांना मिळालं असून महिलावर्गात आनंदाचे वातावरण आहे. मात्र काही बँकांकडून महिलांच्या खात्यातील रक्कम दंडापोटी बँकानी वजा केली जात आहे. जास्त दिवस खाते वापरात नसल्याने हा दंड कट करण्यात आल्याचे बँकांकडून सांगण्यात येत आहे. यावरून विरोधक आक्रमक होताच सरकारने एक महत्वाचे पाऊल उचललं आहे.
बँकांसोबत बैठकीचे आयोजन करणार- 
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अनेक महिलांच्या खात्यावरील जमा झालेले पैसे बँकांकडून कट करण्यात आल्याच्या तक्रारी समोर येताच महायुती सरकारने लवकरच बँकांसोबत बैठक करुन त्यातून मार्ग काढण्याचं निश्चित केलं आहे. लाभार्थी महिलांचे पैसे कापू नयेत, यासाठी बँकांसोबत पत्रव्यवहार करण्याची तयारीही सुरू केल्याची माहिती मंत्रालयातील संबंधितांनी दिली आहे. महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी या संबंधी बँकासोबत पत्र व्यवहार केला आहे, तसेच बँकांसोबत बैठकीचे आयोजन करुनही त्यांना सूचना केल्या जातील अशी माहिती समोर येत आहे. असं झाल्यास महिलांना मिळालेला हा सर्वात मोठा दिलासा असेल.

दरम्यान, आता इथून पुढे फक्त अंगणवाडी सेविकांकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज मंजूर केले जातील, असा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. महिला व बाल विकास विभागाकडून यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. यापूर्वी लाभार्थी महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षिका, समूह संघटक सीआरपी अंतर्गत शहरी आणि ग्रामीण लाईव्हहूड मिशन, ग्रामसेवक, आपले सेवा सरकार अशा 11 प्राधिकृत व्यक्तींना प्राधिकृत करण्यात आले होते. सरकारकडून त्यांना प्रत्येक अर्जामागे 50 रुपये दिले जात होते. पण, आता केवळ अंगणवाडी सेविकांकडून मंजूर केले जातील. राज्य सरकारने याबाबत शासन आदेश जारी केला आहे.

अजितदादांनी बारामतीमधून लढणार नसल्याचं पुन्हा दिले संकेत !...यावर शरद पवार गटाची प्रतिक्रिया वाचा;

वेध माझा ऑनलाइन  ।
बारामतीला एकदा माझ्याशिवाय दुसरा आमदार मिळाला पाहिजे. दुसरा आमदार आला की माझी किंमत तुम्हाला कळेल असं वक्तव्य अजित पवारांनी केलं. मीही आता 65 वर्षांचा झालोय, न मागताही विकासकामं होतायत, तरीही बारामतीकर वेगळा विचार करतात अशी खंतही अजित पवारांनी व्यक्त केली. कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या वक्तव्याला एकमुखी विरोध केला.  अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर ते बारामतीमधून लढणार नसल्याचं संकेत त्यांनी दिलंय का अशी चर्चा सुरू आहे.

या आधीही अजित पवारांनी ते बारामतीमधून निवडणूक न लढण्याचे संकेत दिले होते. आताही तशाच प्रकारचं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे अजित पवार भावनिक राजकारण करत असल्याची चर्चा आहे. बारामती लोकसभेतील सुनेत्रा पवारांचा पराभव हा अजित पवारांच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचं या वक्तव्यावरून दिसतंय अशी चर्चा आहे. 

 काय म्हणाले अजितदादा? 
एकदा बारामतीकरांना मी सोडून आमदार मिळाला पाहिजे. मग त्यावेळी माझी 1991 ते 2024 पर्यंतच्या कामाची तुलना करा. त्यावेळी 1991 पासूनच्या माझी कामं तुम्हाला कळतील. मीही आता 65 वर्षांचा झालो. बारामतीत मी वेगळी भूमिका घेतली नाही तरीही पराभव झाला. बारामतीला माझ्याशिवाय दुसरा आमदार मिळाला पाहिजे. दुसरा आमदार आला म्हणजे तुम्हाला माझी किंमत कळेल. मी केलेली कामं तुम्हाला कळतील.

आम्ही सकाळी लवकर उठतो त्यावर आमची काहीजण चेष्टा करतात. त्यात माझा वैयक्तिक काही स्वार्थ नाही. मुस्लिम समाजाने मला काही निवेदन दिले तर काही जण वेगळे वक्तव्य करतात. मी फुले, शाहू, आंबेडकरांचा विचार सोडणार नाही. बारामतीत काम करत असताना एका समाजाने सांगावं की आमच्यावरती अन्याय झाला. कार्यकर्ता कसा सक्षम होईल आपण बघितलं पाहिजे. गरज सरो आणि वैद्य मरो असं होतं कामा नये. विकास करायचं या असेल तर घड्याळाला निवडून द्या. आपण केलेली कामे मतदारांना सांगायचं, त्यांनी काय करायचं ते त्यांनी करावं. ही निवडणूक महत्त्वाची आहे आणि तुमच्या भविष्याची आहे. सत्तेत आपण असू तर अर्थला चालना मिळणार आहे.

अजित पवारांच्या या वक्तव्यावर त्यांच्या गटाचे प्रवक्ते अनिल पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, एखाद्या काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या घरातील व्यक्तीला जनता पराभूत करते त्यावेळी त्याला वेदना होतात. अजितदादांनी बारामतीचा मोठा विकास केला. तो विकास पाहण्यासाठी देशभरातून लोक येतात. अजितदादा सकाळी 6 पासून रात्री 11 पर्यंत काम करतात. 

शरद पवार गटाची प्रतिक्रिया काय? 

पवार साहेबांना सोडल्यानंतर त्यांची किंमत काय हे आता अजितदादांना समजलंय. पवार साहेबांनी अजितदादांच्या ताब्यात पूर्ण पक्ष दिला. पण त्याचा गैरवापर अजितदादांनी केला. तुम्हाला जर आता पश्चाताप झाला असेल तर पक्ष पुन्हा एकदा पवार साहेबांच्या ताब्यात द्यावा अशी प्रतिक्रिया शरद पवार गटाचे नेते महेश तपासे यानी दिली. 


गौतमी पाटील सोबत घडला भयानक प्रकार ; क़ाय आहे बातमी ;

वेध माझा ऑनलाइन।
महाराष्ट्रात गौतमी पाटीलची चांगलीच क्रेझ आहे. दिवसेंदिवस गौतमीची फॅन फाॅलोइंग सुद्धा वाढताना दिसत आहे. आपल्या चाहत्यांसाठी गौतमी तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर कायम नवनवीन फोटो व्हिडीओ शेअर करत असते. गौतमीला आपलं नृत्य सादर करण्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात बोलवण्यात येतं. दरम्यान,  गौतमीच्या एका डान्स शो  अमरावती येथे अयोजित करण्यात आला होता. त्यावेळेस गौतमीसोबत एक भयानक प्रकार घडला.

नेमकं काय घडलं?
गौतमीचा कार्यक्रम अमरावती येथीस अचलपूरमध्ये आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतिने आयोजित करण्यात आला होता. एका भव्य दहीहंडी उत्सवाच्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अनेक नामवंत गोविंदा पथकांनी हजेरी लावत या उत्सवात एकच जल्लोषाचं वातावरण तयार केलं होतं. दरम्यान, यावेळी कार्यक्रमात आग लागल्याने एकच खळबळ उडाली.

गौतमीचा डान्स पाहण्यासाठी लाखो लोकांची गर्दी झाली होती. दरम्यान, गौतमीचा कार्यक्रम सुरु असताना स्टेजवर अचानाक आग लागली आणि भडका उडाला. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली. मात्र, ही आग लागताना गौतमीच्या बाॅऊन्सरने पाहीलं आणि त्यामुळे मोठा आनर्थ टळला. अचानक स्टेजवर आग लागल्याने काही वेळ कार्यक्रम थांबवण्यात आला.



सातारा जिल्ह्यात डॉल्बीवर कारवाई ; कुठे कुठे झाली कारवाई?

वेध माझा ऑनलाईन।
पोलिस ठाण्याच्या हद्दीत गणेश आगमन सोहळ्यावेळी ध्वनिक्षेपकास मनाई असतानाही कायद्याचे उल्लंघन करून मोठ्या आवाजात ध्वनिक्षेपक लावल्याप्रकरणी कुडाळ (ता. जावळी) पोलिस ठाण्यात तिघांवर कारवाई करण्यात आली.

याप्रकरणी अभिषेक रवींद्र चव्हाण (रा. म्हसवे, ता. जावळी), शुभम शहाजी बाकले (रा. जुळेवाडी, ता. कराड) व कृष्णा पोपट मोरे (रा. गोडोली, ता. जि. सातारा) या ध्वनिक्षेपकांच्या मालकांवर कुडाळ पोलिसांनी कारवाई केली.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात ध्वनिक्षेपक लावण्यास बंदी आहे, असे असतानाही ए.पी.आऊटलाईन सिस्टीम, पावरप्लस साऊंड सिस्टिम व एस. आर. एस. साऊंड सिस्टिम या ध्वनिक्षेपकाच्या मालकांनी कुडाळ येथील नवज्योत मित्र मंडळ,संत सावता माळी मंडळ व पिंपळेश्वर मित्र मंडळांच्या ठिकाणी मोठ्या आवाजात ध्वनिक्षेपक लावला होता. मेढा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी ही कारवाई केली.

मनोज जरांगे शरद पवारांचं कातडं घातलेला माणूस आहे- जरांगे-पाटलांवर टीका ;

वेध माझा ऑनलाईन
मनोज जरांगे पाटलांची जी वक्तव्य येतायत याला मस्ती आणि माज नाही म्हणायंचं तर काय म्हणायचं? असा सवाल भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केलाय. तर प्रत्येक जण भाजप, फडणवीसांचा माणूस, मात्र हा शरद पवार आणि महाविकास आघाडीचा माणूस आहे. ज्या पद्धतीने याने मराठ्यांचं नुकसान केलं, मराठ्यांना खड्ड्यात घालण्याचं काम केलं असं म्हणत प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटलांना आव्हान दिलंय. ते म्हणाले, ‘हिंमत असेल तर चर्चेला यावं…देवेंद्र फडणवीसांची चूक दाखवावी. जेव्हा मी आणि प्रविण दरेकर बोललो त्यावेळी मराठा नेते बोलले असते, तर तुमची माजाची चादर टराटरा फाडली असती त्यामुळे हिंमत असेल तर महाराष्ट्रात २८८ उभे करा, आम्ही ताकदीने उभे राहू.’ पुढे ते असेही म्हणाले की, शरद पवारांचं घातलेलं कातडं याचं फाडल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही, असेही म्हणत प्रसाद लाड यांनी विरोधकांसह मनोज जरांगे पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तर प्रवीण दरकरांनीही जोरदार निशाणा साधला आहे.

Saturday, September 7, 2024

मनोज जरांगेंच्या विरोधात सगळा मराठा समाज उभा करायला वेळ लागणार नाही, ; कोणी दिली धमकी ;

वेध माझा ऑनलाइन ।
मनोज जरांगे पाटील यांच्यावर बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी उदयन राजे यांच्या निवडूकी संदर्भातील आरोप केल्यानंतर आता वातावरण चिघळलं आहे. आता जरांगे यांनी राऊत यांना आव्हान दिले असल्याने त्यांच्या बाजू घेत भाजपाचे लोक पुढे येत आहेत.

मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला आता प्रतिसाद मिळत नाही. त्यांनी महाविकास आघाडीची बाजू घेतल्याचे वारंवार दिसून आले आहे. त्यामुळे मराठा समाजाचा प्रतिसाद कमी कमी होत चालला आहे. मनोज जरांगे महाविकास आघाडीला पूरक काम करीत आहे. 

आमच्या राजेंद्र राऊत यांना आव्हान देण्याची भाषा मनोज जरांगे करीत आहेत. राजेंद्र राऊत यांच्या मागे आम्ही सर्व मराठा समाजाचे आमदार आहोत. आम्ही सर्व ताकदीने राजेंद्र राऊत यांच्या मागे आहोत असे भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.मराठा समाजाचा सात बारा तुमच्या नावावर लिहीलाय का ? असेही दरेकर यांनी जरांगे पाटील यांना आव्हान दिले आहे.

मी छत्रपती शिवाजी महाराजांची, माझ्या आई-वडिलांची शपथ घेऊन सांगतो....मी फुकलो असतो तरी उदयनराजे पडले असते,” हे विधान मनोज जरांगेंनी केलं आहे ; बार्शीच्या आमदाराचा खळबळजनक गौप्यस्फोट ;

वेध माझा ऑनलाइन।
आगामी विधानसभा निवडणुकीत 288 जागेवर उमेदवार देणार असल्याची घोषणा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी केली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे महायुतीसह महाविकास आघाडीचेही टेन्शन वाढलं आहे. एकीकडे जरांगे पाटील रोज सरकारला आव्हान देत असतानाच आता बार्शीच्या आमदारांनी एक खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे.

“मी माझ्या देवाची म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांची, माझ्या आई-वडिलांची शपथ घेऊन सांगतो. मी फुकलो असतो तरी उदयनराजे पडले असते,” हे विधान तमाम महाराष्ट्रातील मराठा बांधवांनो मनोज जरांगेंनी केलं आहे. त्यावेळी मला मोठा धक्का बसला असल्याचे बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी म्हंटले.
बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील आणि भाजप खासदार उदयनराजे भोसले यांच्याविषयी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले की, आम्ही मराठा आरक्षणाविषयी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत बैठकीला बसलो होतो. याच बैठकीत उदयनराजांचा विषय निघाला. त्यावेळी मनोज जरांगे यांनी हे विधान केल्याचे राउत म्हणाले...



Thursday, September 5, 2024

आपटेच्या बायकोनेच दिली पोलिसांना माहीती... !!त्यानन्तर आपटेला झाली अटक.....क़ाय आहे बातमी ?

वेध माझा ऑनलाइन।
राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर पोलीस ज्याचा दिवसरात्र शोध घेत होते तो शिल्पकार जयदीप आपटे पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. पोलिसांनी बुधवारी संध्याकाळी त्याला कल्याणमधील घराच्या परिसरातून ताब्यात घेतले. जयदीप आपटे हा कोणालाही पत्ता लागू नये यासाठी डोक्यावर टोपी आणि चेहऱ्यावर मास्क घालून इमारतीमध्ये शिरत होता. मात्र, यावेळी इमारतीच्या प्रवेशद्वारावर तैनात असलेल्या पोलिसांनी जयदीप आपटेला ताब्यात घेतले.गेल्या अनेक दिवसांपासून मालवणी पोलीस, कल्याण ग्रामीण आणि ठाणे पोलिसांची पाच पथकं जयदीप आपटेचा शोध घेत होती. परंतु, जयदीप आपटे पोलिसांच्या हाती लागला नव्हता. परंतु, बुधवारी जयदीप आपटेच्या पत्नीनेच पोलिसांना माहिती दिल्यामुळे आपटे पोलिसांच्या हाती लागल्याचे सांगितले जात आहे. जयदीप आपटेचे वर्कशॉप त्याच्या घराजवळच आहे. या परिसरातच काल त्याला ताब्यात घेण्यात आले. जयदीप आपटे याने त्याची पत्नी निशिगंधा हिच्याशी संपर्क साधून घरी परत येत असल्याची माहिती दिली होती. तिनेच पोलिसांना जयदीप घरी येत असल्याचे सांगितले. जयदीपने घरी परत यावे आणि तपासात सहकार्य करावे, अशी त्याच्या पत्नीची इच्छा होती. त्यामुळे पत्नीने जयदीप आपटे हा घरी येणार असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसांनी इमारतीच्या प्रवेशद्वारावर सापळा रचून जयदीप आपटेला अटक केली.
वेध माझा ऑनलाइन।
राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर पोलीस ज्याचा दिवसरात्र शोध घेत होते तो शिल्पकार जयदीप आपटे पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. पोलिसांनी बुधवारी संध्याकाळी त्याला कल्याणमधील घराच्या परिसरातून ताब्यात घेतले. जयदीप आपटे हा कोणालाही पत्ता लागू नये यासाठी डोक्यावर टोपी आणि चेहऱ्यावर मास्क घालून इमारतीमध्ये शिरत होता. मात्र, यावेळी इमारतीच्या प्रवेशद्वारावर तैनात असलेल्या पोलिसांनी जयदीप आपटेला ताब्यात घेतले.

गेल्या अनेक दिवसांपासून मालवणी पोलीस, कल्याण ग्रामीण आणि ठाणे पोलिसांची पाच पथकं जयदीप आपटेचा शोध घेत होती. परंतु, जयदीप आपटे पोलिसांच्या हाती लागला नव्हता. परंतु, बुधवारी जयदीप आपटेच्या पत्नीनेच पोलिसांना माहिती दिल्यामुळे आपटे पोलिसांच्या हाती लागल्याचे सांगितले जात आहे. जयदीप आपटेचे वर्कशॉप त्याच्या घराजवळच आहे. या परिसरातच काल त्याला ताब्यात घेण्यात आले. जयदीप आपटे याने त्याची पत्नी निशिगंधा हिच्याशी संपर्क साधून घरी परत येत असल्याची माहिती दिली होती. तिनेच पोलिसांना जयदीप घरी येत असल्याचे सांगितले. जयदीपने घरी परत यावे आणि तपासात सहकार्य करावे, अशी त्याच्या पत्नीची इच्छा होती. त्यामुळे पत्नीने जयदीप आपटे हा घरी येणार असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसांनी इमारतीच्या प्रवेशद्वारावर सापळा रचून जयदीप आपटेला अटक केली.

मला घरी जाऊ द्या, पोलिसांसमोर ढसाढसा रडला जयदीप आपटे;


वेध माझा ऑनलाइन।
मालवण पोलीस, ठाणे पोलीस आणि कल्याण ग्रामीण पोलिसांची पाच पथकं त्याचा कसून शोध घेत होती. मात्र, जयदीप आपटे हा त्यांच्या हाती लागला नव्हता. पण बुधवारी जयदीप आपटे हा कल्याणमधील त्याच्या घरी आला आणि अलगदपणे पोलिसांच्या तावडीत सापडला यानंतर घाबरलेल्या अवस्थेत असलेला जयदीप आपटे हा ढसाढसा रडायला लागला.

मिळालेल्या माहितीनुसार, जयदीप आपटे हा कसाऱ्यावरुन लोकल ट्रेन पकडून कल्याण रेल्वे स्थानकात आला. कल्याणला उतरल्यावर जयदीप रिक्षा करत दूध नाका परिसरात उतरला. जयदीपने कोणीही ओळखू नये यासाठी डोक्यावर टोपी, तोंडाला मास्क आणि रुमाल गुंडाळला होता. यावेळी जयदीपच्या हातात दोन बॅगाही होत्या. जयदीप हा टोपी आणि मास्क लावून राहत्या घरी कुटुंबाला भेटण्यासाठी जात होता.पण इमारतीच्या गेटवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी पोलिसांकडून इमारतीमध्ये जाणाऱ्या प्रत्येक नागरिकांचे ओळखपत्र तपासले जात होते. ते ओळखपत्र तपासूनच पोलीस रहिवाशांना इमारतीत सोडत असल्याचे त्याने लांबूनच पाहिलं. यानंतर जयदीप हा इमारतीजवळ आला. पोलिसांनी त्याच्याकडे आयडी कार्ड मागितले. पण त्याने नकार दिला. त्यावेळी पोलीस कर्मचाऱ्याला त्याचा चेहरा पाहून हा जयदीप आपटेच असावा, असा संशय आला. त्यामुळे पोलिसांनी त्याला त्याच्या नावाने आवाज दिला. यानंतर घाबरलेल्या अवस्थेत असलेला जयदीप आपटे हा ढसाढसा रडायला लागला. यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. त्यानंतर डीसीपी कार्यालयामध्ये जयदीप आपटेची कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर जयदीप आपटेला सिंधुदुर्ग पोलिसांच्या हवाली करण्यात आले.