Tuesday, January 20, 2026

संवेदनशील समाज घडवण्यासाठी 'त्यांचे' पाऊल; कऱ्हाडला लैंगिक जाकरूकतेचा उपक्रम ः ट्रान्सजेंडरांनी जागृतीसाठी साधला विद्यार्थ्यांसह सामान्यांशी संवाद ;

वेध माझा ऑनलाइन।
 प्रत्येकाला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, त्याचा मान सन्मान टिकला पाहिजे, यासाठी मुंबईच्या हमसफर ट्रस्ट आणि सातारा येथील पेहचान फौंडेशनतर्फे लैंगिक संवेदनशीलता विषयावर तीन वेगवेवगळ्या ठिकाणी कार्यशाळा संपन्न झाल्या. येथील शासकीय अभियांत्रकी महाविद्यालय व हॉटेल अमित येथे संपन्न झालेल्या कार्यशाळेत विशेष जनजागृती मोहिम हाती घेण्यात आली. त्यात ट्रान्सजेंडरसहीत विविध वक्त्यांनी सहभाग घेवून विशेष मार्गदर्शन केले. 

कार्यक्रमात प्रा. एस. के. पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांमध्ये जेन्डर सेन्सिटिविटीची जागरूकता चांगली झाली आहे. समाजात त्यांच्या बाबत गैरसमज आहेत. त्यांच्या एलजीबीटिक्यू समुदायातील  विद्यार्थी असेल तर समाजाचा त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन चुकीचा असतो पण आपण त्यांना आत्मविश्वास द्यायला हवा आणि त्याची एनर्जी देशाच्या निर्मिती साठी वापरायला हवी. हा समुदाय नैसर्गिक आहे. त्यांना समाजाने सर्व क्षेत्रात स्वीकारायला हवे आणि त्यामुळे ते मुख्य प्रवाहात येतील. 

यावेळी कार्यशाळेत वैज्ञानिक दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांमध्ये लिंगभेद आणि लैंगिक ओळखीसह ट्रान्सजेंडर तसेच एलजीबीटीक्यू बद्दलचे गैरसमज दूर करून वैज्ञानिक विचार रुजवण्यावर भर देण्यात आला. हमसफर ट्रस्टच्या निलोफर मस्के आणि सुमी एम.के. यांनी समुदायाची ओळख करून दिली. त्यांच्या समोरील सामाजिक व कायदेशीर संघर्षांवर प्रकाश टाकला. यावेळी डॉ. एस.के. पाटील, प्रा. देशपांडे आणि विद्यार्थी कल्याण अधिष्ठाता डॉ. कृष्णा आळसुंदकर यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरक्षित वातावरणाचे महत्त्व अधोरेखित केले. पेहचान फाउंडेशनच्या याशी पाटील, अमोल साळुंखे आणि महाविद्यालयाच्या जिमखान्याने कार्यक्रमाचे  नेटके नियोजन केले. प्रश्नोत्तरांच्या तासातून विद्यार्थ्यांनी शंका विचारल्या. त्याचे निरसन करण्यात आले. हॉटेल अमित एक्झिक्यूटिव्ह आणि हॉटेल संगम येथेही उपक्रम झाला. त्यावेळी व्यावसायिक क्षेत्रात काम करणार्यांना त्याची माहिती सांगून त्यांच्या साठी जागृती अभियान राबवण्यात आले. हॉटेल अमित एक्झिक्यूटिव्ह येथील कर्मचाऱ्यांसाठी लैंगिक संवेदनशीलतेवर आधारित विशेष सत्राला व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. हॉटेल संगम येथे स्नेहभोजन झाले. यावेळी एक अत्यंत भावूक आणि प्रेरणादायी कार्यक्रम पार पडला. ज्यामध्ये तृतीयपंथीयांचा स्वीकार केलेल्या पालकासोबत संवाद साधण्यात आला. या पालकांकडून इतर तृतीयपंथीयांच्या पालकांना आपल्या पाल्याला नाकारू नका, तर प्रेमाने स्वीकारा , असे आवाहन करण्यात आले. शहरात राबवण्यात आलेले हे उपक्रम केवळ तांत्रिक किंवा व्यावसायिक प्रगतीपुरते मर्यादित न राहता, एक प्रगल्भ आणि संवेदनशील समाज घडवण्याच्या दिशेने पडलेले मोठे पाऊल ठरले आहेत, असे मत अनेक मान्यवरांनी व्यक्त केले.

No comments:

Post a Comment