कराडचे नगरसेवक सुहास पवार यांच्या समर्थक व कार्यकर्त्यांनी नुकतीच लोकशाही आघाडीचे नेते व माजी आमदार बाळासाहेब पाटील यांची भेट घेऊन सुहास पवार यांना यावेळी पालिकेतील उपनगराध्यक्षपद देण्यात यावे अशी प्रत्यक्ष भेटून मागणी केली आहे
कराड शहराच्या वाढीव भागाला यावेळी उपनगराध्यक्षपद देण्यात यावे त्यासाठी सुहास पवार यांच्या रूपाने हे पद शहराला मिळावे असेही कार्यकर्त्यांनी आपल्या मागणीत म्हटले आहे
सुहास पवार हे शहरातील नुकत्याच झालेल्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक दोन मधून निवडून आले आहेत सलग 15 वर्षे त्यांचे या प्रभागावर वर्चस्व आहे त्यांना प्रशासनिक कामाचा चांगला अनुभव आहे त्यांनी पालिकेत विविध सभापतीपदावर देखील काम केले आहे
नगरसेवक सुहास पवार हे युवकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे युवा नेते म्हणून परिचित आहेत माजी आमदार बाळासाहेब पाटील यांचे ते निष्ठावन्त म्हणून ओळखले जातात कोणाला कसलीही अडचण असेल तर ते व त्यांचे कार्यकर्ते मदतीसाठी नेहमीच पुढे असतात त्यांच्या या लोकप्रियतेचा फायदा त्यांना व पार्टीला मतदाराच्या रूपाने नेहमीच झालेला दिसून आलेला आहे सुहास पवार यांचा संपर्क समाजात खूपच मोठा असल्याने त्यांच्या आयोजित प्रत्येक कार्यक्रमाला शहरातील हजारो लोकांनी हजरी लावत त्यांच्यावरील प्रेम व्यक्त केलेले कायमच दिसले आहे ...गेली 15 वर्षे सुहास पवार प्रभाग क्रमांक 2 मधील जनतेची सेवा करत आहेत नुकत्याच झालेल्या शहरातील पालिका निवडणुकीसाठी त्यांनी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी तयारी केल्याचे बोलले जात होते त्यांचा पालिकेतील कामाचा 3 टर्मचा अनुभव तसेच कामकाजाचा अभ्यास व त्यांच्या सिनिएरिटीचा विचार करून त्यांना यावेळी उपनगराध्यक्ष पद सन्मानाने द्यावे अशी मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांनी माजी आमदार बाळासाहेब पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केली आहे
No comments:
Post a Comment