कराड पालिकेचे भाजपच्या पक्ष प्रतोदपदी नगरसेवक शिवाजी पवार यांचे नाव जवळजवळ निश्चित मानले जात आहे त्यांना या पदाच्या माध्यमातून अधिकाधिक चांगले काम करता येणार आहे त्यांना ही राजकीय मोठी संधी असल्याचे बोलले जात आहे यापूर्वी त्यांच्या कामाची कारकीर्द ही शहरात सामाजिक नेता म्हणून उठावदार राहिली आहे
शिवाजी पवार हे स्वतः यावेळी नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत मागच्या वेळी त्यांच्या पत्नी कराडच्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या लोकशाही आघाडी च्या माध्यमातून त्यांनी शहरात काम केले यावेळी मात्र भाजपकडून निवडणूक लढवत स्वतः शिवाजी पवार नगरसेवक म्हणून सध्या शहरात कार्यरत आहेत
आमदार डॉ अतुल भोसले यांचे नेतृत्व मानत शिवाजी पवार यांनी ही निवडणूक लढवली व या निवडणुकीत त्यांनी 1222 एवढे मताधिक्याने विजय मिळवला आपल्या सहकारी उमेदवाराला निवडून आणण्यासाठी देखील त्यांनी मोठे प्रयत्न केले तोही उमेद्वार चांगले मताधिक्य मिळवत निवडून आला त्यांच्या प्रभागात भाजपने शिवाजी पवार यांच्या नेतृत्वामुळे त्याठिकाणी आपले प्राबल्य सिद्ध केले आहे
शिवाजी पवार यांची यावेळी पालिकेच्या पक्ष प्रतोदपदी भाजपकडून निवड निश्चित मानली जात आहे यानिमित्ताने त्यांना उठावदार काम करण्याची संधी मिळाली आहे ते या संधीचे सोने करतील अशी कराडकरांना अपेक्षा आहे
No comments:
Post a Comment