Monday, January 26, 2026

एकनाथ शिंदेंनी सांगितलं... का चालू केली लाडकी बहीण योजना...म्हणाले... आईची काटकसर आणि पत्नीच्या डोळ्यात पाणी बघितलंय;

वेध माझा ऑनलाइन।
राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची उद्या अंतिम तारीख आहे. त्यामुळे, आता राजकीय पक्ष कामाला लागले असून प्रचाराचा धुरळा पुन्हा उडणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्या जन्मभूमीतून प्रचाराचा नारळ फोडला. आज या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ होतोय, अडीच वर्षात माझं काम तुम्ही पाहिलंय मी अडीच वर्षात अडीच तास शांत झोपलो नसेल. लाडक्या बहिणींनी ठरवलं होतं लाडक्या भावाला निवडून आणायचं, असे म्हणत पुन्हा एकदा लाडकी बही‍ण योजनेसंदर्भाने प्रचारात आघाडी घेतली. नुकतेत ठाकरे गटातून शिवसेनेत आलेल्या माजी आमदार दगडू सपकाळ यांच्यासह एकनाथ शिंदेंनी साताऱ्यातून तुफान फटकेबाजी केली. 
दरम्यान माझ्या आईची काटकसर आणि माझ्या पत्नीच्या डोळ्यातील अश्रू पहिले होते, म्हणून मी याचा विचार करुन महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली असे त्यांनी सांगितले

लाडकी बहीण योजनेसाठी 45 हजार कोटी एका वर्षाचा खर्च होता, भल्याभल्यांची हिम्मत झाली नाही. मात्र, जे खोडा घालायचे त्यांना 232 नंबरचा चा घोडा दाखवला. महारष्ट्राच्या इतिहासात 232 जागा महायुतीच्या कधी निवडून आल्या नव्हत्या, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना भरभरुन मतदान महायुतीला केल्याचं म्हटलं. 

एकनाथ शिंदे म्हणाले...
माझी कर्मभूमी मुंबई असली तर माझी जन्म भूमी सातारा आहे, सातारा जिल्ह्याची गौरवशाली परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आपण कारभार करतोय. संपत्ती कमावली यापेक्षा माणसं किती कमवली हे मी पाहिलं. आधीच्या मुख्यमंत्र्यांना स्पीड ब्रेकर आणि स्थगितीशिवाय काही माहित नव्हतं. फेसबुक लाईव्ह नाही तर फेस टू फेस काम कराव लागतं, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

No comments:

Post a Comment