Wednesday, January 28, 2026

अजित पवारांच्या निधनावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले शरद पवार ?

वेध माझा ऑनलाइन।
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीजवळ विमान अपघातात मृत्यू झाला आहे. आज सकाळी 9 च्या सुमारास झालेल्या या घटनेत अजित पवारांसह विमानचे पायलट आणि इतर सहकाऱ्यांचाही मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. अजित पवाराच्या निधनावर खासदार आणि अजित पवार यांचे काका शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांनी म्हटले की, अजित पवार यांच्या निधनाची बातमी अत्यंत दु:खद आहे. एक मेहनती नेता आपल्यातून गेल्याने महाराष्ट्राचे अतोनात नुकसान झाले आहे. राज्याचं जे नुकसान झालंय ते भरून येण्यासारखं नाहीये. आजही काही गोष्टी आपल्या हातात नाहीत. यात काहीही राजकारण नाही. हा केवळ एक अपघात होता. याच्या यातना महाराष्ट्राला आणि आम्हा सर्वांना आहे, यात राजकारण आणू नये असंही शरद पवार म्हणाले.

No comments:

Post a Comment