अजितदादांच्या अशा अचानक जाण्याने जिल्ह्याच्या व राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे माझे व्यक्तिगत अजितदादांशी चांगले संबंध होते आम्ही एकत्र काम केलं आहे साखर कारखानदारी असो किंवा जिल्ह्याचे प्रश्न असोत मी त्यांचा सल्ला घेत असे ते देखील मला नेहमी मदत व मार्गदर्शन देखील करत होते
त्यांच्या निधनाची बातमी आज सकाळी समजली त्यांनतर आम्ही आमचे सगळे कार्यक्रम रद्द केले तसे आम्ही जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना कळवले आहे
त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबीयांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे अशा शब्दात आमदार डॉ अतुल भोसले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या व अजितदादांना श्रद्धांजली वाहिली
No comments:
Post a Comment