Thursday, January 15, 2026

ठाकरे बंधूंसह पवारांना आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का…मुंबईत ठाकरे बंधू आणि पवार 70 च्या आत…मनसेलाही धक्का…पुणे पिंपरी चिंचवड आणि मुंबईत भाजपाची एकहाती सत्ता... एक्झिट पोल चा अंदाज ;

वेध माझा ऑनलाइन।
जनमत एक्झिटपोलच्या अंदाजानुसार, मुंबई महापालिकेत पवार आणि ठाकरे बंधुंच्या मिळून जागा 58 ते 65 च्या मध्ये येण्याची शक्यता  आहे.शिवसेना ठाकरे गट आणि मनसेला आतापर्यंतचा हा सर्वात मोठा धक्का असणार आहे. 

शिवसेना ठाकरे गटाची सत्ता मुंबई महापालिकेवर राहिली आहे.शिवसेना शिंदे गट आणि भाजपा मिळून मुंबईमध्ये 138 जागा येण्याचा अंदाज एक्झिटपोलनुसार, येण्याची शक्यता आहे. म्हणजेच मुंबई महापालिकेवर थेट भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाची सत्ता येईल.भाजपा शिंदे गटाची  सत्ता पोलनुसार दाखवण्यात आली आहे.

मुंबई महानगर पालिका निवडणूकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले असताना आज मतदान संपल्यानंतर जाहीर झालेल्या बहुतांश एक्झिट पोलमध्ये आता महायुतीला बहुमत मिळणार असे म्हटले जात आहे. 
मुंबई महानगर पालिकेचे एक्झिट पोलमध्ये अनेक संस्थांनी भाजपा आणि शिवसेना महायुतीला बहुमत मिळणार असा अंदाज वर्तवला आहे. पोल ऑफ पोल, आणि जनमत एक्झिट पोलने आता मुंबई महानगर पालिकेत महायुतीला 138 जागा मिळण्याची अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईत आता भाजपाचा महापौर होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment