Friday, January 16, 2026

नगरसेविका सौ किशोरी अतुल शिंदे यांनी पालिकेच्या मिळणाऱ्या सर्व सुविधांचा केला त्याग ; त्यांचा हा निर्णय अनेक लोकप्रतिनिधींना प्रेरणा देणारा ठरणार ;

वेध माझा ऑनलाइन।
नगरसेविका म्हणून मिळणारे भत्ते, सुविधा व इतर सेवा स्वतः न स्वीकारता त्या थेट नगरपरिषदेच्या जनरल फंडात वर्ग करण्याची  विनंती करून कराडच्या नगरसेविका सौ किशोरी अतुल शिंदे यांनी जनसेवेला सर्वोच्च स्थान दिले आहे यांनी दाखवलेला आदर्श आजच्या राजकारणात दुर्मिळ आणि प्रेरणादायी आहे 
नगरसेविका सौ किशोरी शिंदे या भाजपच्या तिकिटावर नगरसेविका म्हणून यावेळी निवडून आल्या आहेत भाजपचे युवा नेते अतुल शिंदे यांच्या त्या पत्नी आहेत 

भाजप नेते अतुल शिंदे हे आमदार डॉ अतुल भोसले व उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांचे निकटवर्तीय मानले जातात ते भाजप चे अधिकृत सदस्य आहेत... तसेच स्वीकृत नगरसेवक म्हणून देखील त्यांनी शहरात काम पाहिले आहे... त्यांचे वडील नगरसेवक आणि काँग्रेसचे शहर अध्यक्ष म्हणून सर्वांना परिचित होते...त्यांच्या मातोश्री नगरसेविका म्हणून दोन वेळा निवडून आल्या होत्या... त्यांचे कराड दक्षिण व उत्तर मध्ये परिचित लोकांचे मोठे जाळे आहे... अतुल शिंदे यांनी आमदार भोसले यांच्या नुकत्याच झालेल्या आमदारकीवेळी महत्वाची भूमिका बजावत पहील्या फळीतील काम पाहीले आहे... आणि त्यांना आमदार होण्यासाठी शहरात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली आहे...  
अनेक गणेश मंडळे तसेच सर्वच समाजातील सण उत्सवासाठी त्यांचे सर्वतोपरी सहकार्य नेहमीच असते... त्यांचा मित्रपरिवार मोठा आहे...  त्यांची प्रतिमा आपला माणूस अशीच आहे... आणि म्हणूनच शहरातील नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी त्यांच्या नावाची चर्चा भाजप गोटात जोरदार सुरू होती...
दरम्यान यावेळी निवडून आलेल्या अतुल शिंदे यांच्या पत्नी नगरसेविका सौ किशोरी शिंदे हे नेतृत्व देखील सत्ता नव्हे तर सेवाभाव आणि लोकहिताच्या मूल्यांवर उभे राहिलेले नेतृत्व आहे त्यामुळे त्यांनी पालिकेचा भत्ता व सर्व सुविधांचा केलेला त्याग ही कृती केवळ निर्णय नसून, ती संस्कारांची, परंपरेची आणि निस्वार्थ सेवेची साक्ष आहे अशाही प्रतिक्रिया उमटत आहेत त्यांचा हा निर्णय अनेक लोकप्रतिनिधींना प्रेरणा देणारा ठरेल हे नक्की!

No comments:

Post a Comment