Wednesday, January 28, 2026

बारामतीत अजितदादांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार ; राष्ट्रध्वज जय पवारांकडे सुपूर्द ;

 वेध माझा ऑनलाइन।
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. बारामतीजवळ झालेल्या विमान दुर्घटनेत त्यांच्या अकाली जाण्याने राजकीय, सामाजिक आणि सामान्य जनतेमध्ये तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. आज सकाळी बारामती येथे शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येत असून, हजारो नागरिक अंतिम दर्शनासाठी उपस्थित आहेत.

अजित पवार यांच्या पार्थिवावर राष्ट्रध्वज अर्पण करण्यात आला असून, तो त्यांच्या मुलगा जय पवार यांच्याकडे सन्मानाने सुपूर्द करण्यात आला. हा क्षण उपस्थित प्रत्येकासाठी अत्यंत भावनिक ठरला. कुटुंबीय, सहकारी नेते, कार्यकर्ते आणि नागरिकांनी अश्रूंनी निरोप देत त्यांच्या कार्याला श्रद्धांजली वाहिली. 
आज सकाळी 11 वाजता बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. त्याआधी सकाळी काटेवाडी येथून अंत्ययात्रेला सुरुवात झाली. हजारो नागरिक रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून ‘अजितदादा अमर रहे’च्या घोषणा देत आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देत होते.

No comments:

Post a Comment