Tuesday, January 27, 2026

मृत्यूच्या अगोदर म्हणजे... आज सकाळीे 8 वाजून 57 मिनिटांनी... अजितदादांनी केलेली शेवटची पोस्ट व्हायरल ; काय आहे ती पोस्ट?

वेध माझा ऑनलाइन।
बुधवारी सकाळी झालेल्या विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं आहे. अजित पवारांची अशी एक्झिट मनाला चटका लावणारी आहे. बारामती येथील गोजुबावी परिसरातील धावपट्टीवर उतरत असताना विमानाचं नियंत्रण सुटलं आणि ते शेतात कोसळलं. अपघातात अजित दादा यांच्यासोबत अन्य दोन जणांचं देखील निधन झालं आहे. अजित पवार यांच्या निधनाची माहिती समोर आल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अशात अजित पवार यांची शेवटची सोशल मीडिया पोस्ट देखील सर्वत्र व्हायरल होत आहे.

अजित पवार यांनी बुधवारी सकाळी 8 वाजून 57 मिनिटांनी ट्विट केलं होतं. आता अजित पवार यांची पोस्ट एक्सवर दिसत नसली तरी त्या पोस्टचा स्क्रिनशॉट व्हायरल होत आहे. महान स्वातंत्र्य सेनानी, पंजाब केसरी लाला लजपत राय यांना जयंतीदिनी अभिवादन करणारं ट्वीट त्यांनी केलं.

पंजाब केसरी लाला लजपत राय यांचा फोटो पोस्ट करत अजित पवार म्हणाले, ‘राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी आपले सर्वस्व अर्पण करणारे, महान स्वातंत्र्य सेनानी, स्वराज्याचे उद्घोषक, ‘पंजाब केसरी’ लाला लाजपत राय जी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! त्यांची राष्ट्रनिष्ठा आपल्याला कायमच प्रेरणा देत राहील…’, सध्या अजित पवार यांची शेवटची पोस्ट सर्वत्र व्हायरल होत आहे.

No comments:

Post a Comment