Thursday, January 15, 2026

कराडच्या उपनगराध्यक्षपदी पोपटराव साळुंखे...स्वीकृत म्हणून भाजपकडून सुहास जगताप,लोकशाहीकडून जयंत पाटील, तर यशवन्त आघाडी कडून नरेंद्र लिबे यांची निवड...वेध माझा ने व्यक्त केलेला अंदाजच परफेक्ट ; परफेक्ट बातमी म्हणजे वेध माझा हे झालं सिद्ध ;

वेध माझा ऑनलाइन।
आज कराड पालिकेचे स्वीकृत नगरसेवक म्हणून भाजपकडून सुहास जगताप लोकशाही आघाडीकडून जयंत पाटील तसेच यशवन्त आघाडी च्या वतीने नरेंद्र लिबे यांची निवड झाल्याचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी जाहीर केले तर उपनगराध्यक्ष म्हणून पोपटराव साळुंखे यांची निवड करण्यात आली 
दरम्यान अशाच निवडी होतील असा अंदाज वेध माझा ने अगोदरच व्यक्त केला होता आणि निवडीही तशाच झाल्या याबद्दल वेध माझा चे शहरातून अभिनंदन होत आहे 

माजी नगरसेवक सुहास जगताप हे शहरातील भाजपचे युवा नेते म्हणून परिचित आहेत माजी आमदार डॉ अतुल भोसले यांचे ते निष्ठावन्त म्हणून ओळखले जातात कोणाला कसलीही अडचण असेल तर ते व त्यांचे कार्यकर्ते मदतीसाठी नेहमीच पुढे असतात ते मागील  टर्मला नगरसेवक म्हणून शहरात नगरसेवक म्हणून कार्यरत होते त्यांनी केलेले सामाजिक व पक्षाचे काम शहरात चर्चेत राहिले शहर अध्यक्ष म्हणून भाजपचे तेच दावेदार होते मात्र त्यांची ती संधी देखील मागीलवर्षी हुकली होती  एकूणच त्यांचा पालिकेतील कामकाजाचा आतापर्यंतचा अभ्यास, केलेले सामाजिक तसेच पक्षाचेही काम याचा विचार करून त्यांची भाजपने पालिकेत स्वीकृत नगरसेवक म्हणून यावेळी त्यांची निवड केली आहे 

लोकशाही पार्टीचे अध्यक्ष जयंतकाका पाटील यांचे नाव यावेळी लोकशाही आघाडीकडून स्वीकृतसाठी चर्चेत होतेच त्यांनी शिवाजी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अध्यक्ष या नात्याने केलेले आतापर्यंतचे काम खूप मोठे आहे यावेळच्या नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी त्यांनी घेतलेले  परिश्रम व 6 नगरसेवकावरून 13 वर ही नगरसेवक संख्या जाण्यासाठी केलेले प्रयत्न कारणीभूत ठरले आहेत  यशवन्त आघाडी व लोकशाही आघाडी यांचे एकत्रीकरण करण्यामागे त्यांचे यशस्वी प्रयत्न कारणीभूत असल्याचेही सांगण्यात येत आहे जयंतकाका पाटील यांच्या नावाची कराड पालिकेत स्वीकृत नगरसेवक म्हणून आज निवड झाली

नरेंद्र लिबे हे राजेंद्रसिंह यादव आणि विजयसिंह यादव यांचे निष्ठावन्त म्हणून ओळखले जातात अनेक वर्षे त्यांनी यादव यांची पाठराखण करत यशवन्त आघाडीच्या वाढीसाठी मोठे प्रयत्न केले आहेत त्यांची आज स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड करण्यात आली

पोपटराव साळुंखे हे गेली 30 वर्षे माजी आमदार बाळासाहेब पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून सर्वत्र परिचित आहेत...अडचणीच्या काळात त्यांच्याबरोबर कोण असेल... तर ते नाव म्हणजे पोपटराव साळुंखे... असेच नेहमी म्हटले जाते...
पोपटराव साळुंखे यांनी कायमच माजी आमदार बाळासाहेब पाटील यांना कोणत्याही अपेक्षेशिवाय साथ दिली आहे... भले, भले अनेकजण आम्ही निष्ठावन्त आहोत असे म्हणत दुसऱ्या पार्टीच्या नेत्याच्या जवळ जाताना दिसतात...मात्र पोपटराव साळुंखे यांनी असल्या राजकारणाला कधीही महत्व दिले नाही... त्यामुळे पर्यायाने त्यांचा आदर नेहमीच सगळीकडेच राखला गेला...निष्ठावन्त असावा तर असा...असे त्यांचे नाव घेऊन आजही बोलले जाते...आज त्यांची उपनगराध्यक्ष म्हणून निवड झाली


No comments:

Post a Comment