नुकत्याच झालेल्या कराड पालिकेच्या निवडणुकीत भाजपला एकूण 10 जागा मिळाल्या त्यामध्ये माजी नगरसेवक गुंड्याभाऊ वाटेगावकर हे चांगल्या मताने निवडून आले त्यांचा पूर्वानुभव व सिनिएरिटी चा विचार करून त्यांची पालिकेत भाजपकडून गटनेता म्हणून निवड झाल्याचे खात्रीलायक समजते
माजी नगरसेवक वाटेगावकर हे गेली तीन ते चार टर्म नगरसेवक म्हणून शहरात कार्यरत आहेत त्यांनी केलेले आरोग्य विभागासाठीचे काम शहरात नेहमी चर्चेत असते त्यांनी पालिकेत विविध विभागात काम केले आहे त्यांचा अनुभव दांडगा आहे त्यांना पालिकेच्या सर्व विभागाचा चांगला अभ्यास आहे शहराला मिळालेल्या स्वछता अभियानातील प्रथम पुरस्काराने त्यांच्या कामाचे शहरात कौतुक झाले होते ते यशवन्त विकास आघाडीचे नगरसेवक म्हणून शहराला परिचित होते... मात्र सध्याच्या झालेल्या निवडणुकीत ते भाजप चे नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत...
त्यांनी यशवन्त आघाडी सोडून भाजपमध्ये अचानक प्रवेश केला होता...त्यांनी हा प्रवेश का केला ?... याचे उत्तर अद्याप कोणालाच मिळालेले नाही...याबाबत शहरात आजही चर्चा असते...
दरम्यान त्यांचा पालिकेतील कामकाजाचा अभ्यास, पूर्वी केलेले पालिकेतील उठावदार काम व त्यांची सिनिएरिटीचा विचार करता त्यांची भाजपने पालिकेत गटनेता म्हणून निवड केली आहे असे खात्रीलायक समजते
No comments:
Post a Comment