Tuesday, January 27, 2026

विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू ; महाराष्ट्र हादरला ;

वेध माझा ऑनलाइन।
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती येथे झालेल्या एका भीषण विमान अपघातात मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बारामती येथील लँडिंग दरम्यान त्यांच्या छोट्या विमानाला अपघात झाला आणि त्यानंतर विमानाने पेट घेतला. या दुर्घटनेत उपमुख्यमंत्री अजित पवारांसह एकूण सहा जणांचा दुर्दैवी अंत झाला आहे. डीजीसीए कडून या घटनेची पुष्टी करण्यात आली आहे.
अजित पवार हे सकाळी मुंबईहून एका सभेसाठी बारामतीला निघाले होते. नेहमीप्रमाणे ते एका छोट्या विमानाने प्रवास करत असताना, बारामती विमानतळाच्या शेजारीच लँडिंग दरम्यान विमानाला अपघात झाला. विमान कोसळल्यानंतर त्याला आग लागल्याने सहा जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. 

No comments:

Post a Comment