वेध माझा ऑनलाईन।
राज्यातील आपत्कालीन आरोग्य सेवा अधिक सक्षम, दर्जेदार आणि वेगवान करण्यासाठी १०२ आणि १०८ या दोन्ही रुग्णवाहिका सेवांचे एकत्रीकरण करण्यात येणार आहे. वर्षअखेरीपर्यंत राज्यभरात ४ हजार ५०० नवीन अत्याधुनिक रुग्णवाहिका सेवेत दाखल करण्याचे नियोजन असून, यामुळे रुग्णांना वेळेत वैद्यकीय मदत मिळणे अधिक सुलभ होईल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.
सध्या अपघात आणि गंभीर आजारांसाठी १०८, तर गर्भवती महिला व बालकांसाठी १०२ ही रुग्णवाहिका सेवा स्वतंत्रपणे कार्यरत आहे. या सेवांमधील तांत्रिक अडचणी आणि समन्वयाच्या अभावामुळे काही वेळा रुग्णवाहिका मिळण्यास विलंब होतो. हे लक्षात घेऊन दोन्ही सेवांचे एकत्रीकरण करून एकाच मध्यवर्ती नियंत्रण कक्षातून कॉलचे व्यवस्थापन केले जाणार आहे. रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाइकांनी मदतीसाठी संपर्क साधल्यानंतर जवळ उपलब्ध असलेली रुग्णवाहिका तातडीने रवाना करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment