सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष उदयसिंह पाटील यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराड येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते उदयसिंह पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी पृथ्वीराज चव्हाण यांनी उदयसिंह पाटील यांना नवीन जबाबदारीबद्दल शुभेच्छा दिल्या. जिल्हा बँकेचे कामकाज अधिक चांगल्या पद्धतीने करत बँक कायम प्रगतीपथावर राहण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच स्वर्गीय विलासकाकांचा वारसा उदयसिंह पाटील यांच्या रूपाने पुढे सुरू राहत आहे, याचा विशेष आनंद होत असल्याची भावना पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली.
या भेटीदरम्यान स्वर्गीय विलासकाकांच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. तसेच सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक, बँकेची आजवरची कारकीर्द आणि सहकार क्षेत्रातील वाटचाल अशा विविध विषयांवर उदयसिंह पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यात चर्चा झाली. यावेळी प्रा. काटकर सर, पंचायत समिती सदस्य नितीन थोरात, अजितराव पाटील, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल चव्हाण, सरचिटणीस इंद्रजीत चव्हाण, कराड उत्तर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाबुराव पवार, युवक काँग्रेसचे अमित जाधव, गोल्डन पवार, सयाजी पाटील, सतीश पाटील, देवदास माने आदी यावेळी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment