Monday, April 29, 2024

सातारा मे पहेले भगवा लहेरया था...आगे भी लहेराता रहेगा : उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कराडच्या विराट सभेत व्यक्त केला विश्वास : रेकॉर्डब्रेक मतदान करण्याचे केले आवाहन ;


वेध माझा ऑनलाइन।
सातारा जिल्हा हे तिर्थस्थळपेक्षा कमी नाहीये... ही भूमी पवित्र भूमी आहे... सातारा मे पहले भगवा लेहेराता था । आगे भी लेहेराता रहेगा... एवढा मोठा जनसमुदाय बघून एवढंच समजलय की... फिर एक बार मोदी सरकार... ऐसेही होगा ..असा विश्वास नरेंद्र मोदी यांनी व्यक्त करत आपला आशीर्वाद घ्यायला आलोय...अशा शब्दात कराडकरांचे आभार मानले...

कराड नजीक असणाऱ्या सैदापुर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विराट स्वरूपातील जाहीर सभा आज पार पडली त्यावेळी प्रचंड जनसमुदायला ते संबोधत होते उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ या सभेचे आयोजन करण्यात आले होते

मोदी पुढे म्हणाले...सध्या टेक्नॉलॉजी चे युग आहे मी स्वतः सोशल मीडियाचा वापर करून ताजे विकासात्मक अपडेट घेतो...मात्र आमचे विरोधक याच सोशल मीडियाचा वापर करून फेक व्हीडिओ व्हायरल करत आहेत...देशातील सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे काम करत आहेत...देशात सामाजिक तणाव निर्माण करण्यासाठी यातून प्रयत्न विरोधक करत आहेत...देशातील एकता अखंडता राखण्यासाठी अशा व्हीडिओना पोलिसांच्या लक्षात आणून द्या...इलेक्शन कमिशन ने अशा घटनेकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे

आम्ही देशात रुग्णाच्या सेवेसाठी अधिकाधिक हॉस्पिटल्स काढली दरवर्षी 1 लाख डॉक्टर्स निर्माण होत आहेत साताऱ्यात डिस्काऊंट मध्ये औषध मिळत आहेत 5 लाख लोकांकडे आयुष्यमान कार्ड आहे कोणतीही जात असो त्या घरात 70 वर्षापेक्षा अधिक आयुमान असणाऱ्या व्यक्तीला वैद्यकीय आयुष्यमान योजनेतून सेवा मिळणार आहे...

आज आमचे सरकार 80 करोड लोकांना मोफत अन्न देत आहे... काँग्रेस सरकारने गरिबांना काही दिलं नाही... लाखो टन अन्नाची नासाडी होत होती... त्यावेळी सुप्रीम कोर्ट ने सांगितलं होतं अन्न गरिबांना वाटा...त्यावेळी पंतप्रधान मनमोहन सिंग म्हटले होते... कोर्टाने यात लक्ष घालू नये...आणि काँग्रेसने अन्न सडून वाया घालवल...पण गरीबांना दिलं नाही
आता... आणखी एक काँग्रेसची खतरनाक चाल आहे...ते लोक प्रत्येकाच्या घरातील संपत्तीवर एक्सरे करून लक्ष ठेवून लोकांच्या संपत्तीची काँग्रेसवाले लूट करणार असल्याची भीती मोदींनी यावेळी व्यक्त केली...

प्रत्येक घर, आणि शेती मध्ये पाणी पोचवण्याचे आमचे स्वप्न आहे... येणाऱ्या वर्षात शेतीच्या प्रगती होण्याबाबत आम्ही विस्तार बनवत आहोत... पी एम किसन सम्मान योजनेंतर्गत करोडो लोकांना याचा फायदा होत आहे... गडकिल्ले सवारण्याचे काम आम्ही करत आहोत...आपला सपना मेरा संकल्प है...वो सपना पुरा करने केलीये मेरा जीवन भी है...असे म्हणत त्यांनी सर्व रेकॉर्ड तोडत देश के लीये वक्त निकाल कर कमल खिलावो..असे आवाहन यावेळी केले... घराघरात जाऊन माझा नमस्कार सांगा... असे उपस्थित कराडकरांना सांगत मोदींनी आपल्या वाणीला विराम दिला...

Sunday, April 28, 2024

शरद पवार स्वतःला चव्हाण साहेबांचे मानसपुत्र मानतात,...मग चव्हाण साहेबांना मरणोत्तर भारतरत्न मिळावे यासाठी त्यांनी का प्रयत्न केले नाहीत? उदयनराजे यांचा कराडात सवाल ...


वेध माझा ऑनलाइन
शरद पवारांनी स्वतःला पदमविभूषण मिळाल्यानंतर स्व यशवन्तराव चव्हाण साहेबांना मरणोत्तर भारतरत्न मिळावे असे पवारांना का वाटले नाही ? त्यांनी याबाबतची मागणी कधीच का केली नाही ? त्यांनी आयुष्यभर चव्हाणांचा मानसपुत्र असल्याचे सांगत चव्हाण साहेबांच्या नावावर जोगवा मागत राजकारण केलं असा पलटवार श्री छ उदयनराजे यांनी आज केला

यशवन्तराव चव्हाण याना मरणोत्तर भारत रत्न द्या अशी उदयनराजे यांनी मागणी केली आहे त्यावर निवडणुकीच्या काळातच राजेंना हे का सुचलं... असा आरोप विरोधकांनी केला होता त्यावर उत्तर देताना उदयनराजे यांनी आज पलटवार करत प्रत्युत्तर दिले

त्यांचा निवडणुकीचा संकल्पनामा आज कराडच्या स्व चव्हाण साहेबांच्या समधीस्थळी प्रसिद्ध करण्यात आला त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते 

राजे म्हणाले...उद्या पंतप्रधान मोदींसमोर आम्ही स्व चव्हाण साहेबांना मरणोत्तर भारतरत्न मिळावे अशी मागणी करणार आहोत...
पवार साहेबांना 18 लाख लोकांच्यातून एक स्वच्छ चारित्र्याचा उमेदवार मिळाला नाही त्यांनी भ्रष्टाचारी उमेदवार याठिकाणी उभा केला आहे हे दुर्दैवच म्हणावं लागेल

यावेळी बावनकुळे यांनी उदयनराजे राज्यात सर्वात मोठ्या मताधिक्याने विजयी होणार असे विधान केले
उद्याच्या होणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित रहा असेही आवाहन त्यांनी यावेळी केले

मुंबईत भाजपने पूनम महाजनचे तिकीट कापल,; पूनम महाजन ने काय केलंय ट्विट... ?

वेध माझा ऑनलाइन।
उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपने धक्कातंत्र वापरत विद्यमान खासदार पूनम महाजन यांचे तिकीट कापलं आणि विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम याना उमेदवारी दिली. तिकीट मिळाल्यानंतर उज्ज्वल निकम यांनी अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेशही केला आहे. तर दुसरीकडे तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण सदैव देशाच्या सेवेसाठी समर्पित असेल असं त्यांनी म्हंटल आहे

पूनम महाजन यांनी ट्विट करत म्हंटल, “खासदार म्हणून मी मागची १० वर्षे मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व करण्याची संधी मला दिली. त्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना धन्यवाद देते. खासदार म्हणून नाही तर मुलीप्रमाणे मला त्यांनी स्नेह दिला. मी माझ्या लोकसभा क्षेत्रातील कुटुंबीयांची, जनतेची ऋणी राहिन, तसंच आशा करते की आपलं नातं कायम टिकून राहिल. माझे दैवत, माझे दिवंगत वडील प्रमोद महाजन यांनी मला राष्ट्रप्रथम मार्ग दाखवला. तोच मार्ग मला आयुष्यभर चालवता यावा, अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करते. माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण सदैव देशाच्या सेवेसाठी समर्पित असेल.” या आशयाची पोस्ट पूनम महाजन यांनी केली आहे.

दरम्यान, उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातुन महाविकास आघाडी तर्फे वर्ष गायकवाड निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे आता उज्ज्वल निकम विरुद्ध वर्षा गायकवाड असा रंगतदार सामना मुंबईत पाहायला मिळेल. भाजपकडून तिकीट मिळताच उज्ज्वल निकम यांनी भाजप मध्ये प्रवेश केला. माझ्यावर जी नवीन जबाबदारी देण्यात आली, ती निभावण्यासाठी बाप्पा बळ देईल. मला राजकारणाचा अनुभव नसला तरी मी नवखा नाही, अशी प्रतिक्रिया उज्ज्वल निकम यांनी दिली .

उद्या कराडात नरेंद्र मोदींची होणार सभा ; कसा असणार आहे वाहतुकीत बदल ?

वेध माझा ऑनलान : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सैदापूर (ता. कराड) येथील सभेच्या अनुषंगाने कराड शहरातील अंतर्गत वाहतुकीत बदल करुन वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी दि. २९ एप्रिल रोजी मध्यरात्रीचे एक वाजल्यापासून सभा संपेपर्यंत पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी अधिसूचना पारित केली आहे. या अधिसूचनेद्वारे वाहनांच्या वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे.


सोमवारी दि. २९ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजल्यापासून सभा संपेपर्यंत सैदापूर कॅनॉल ते ओगलेवाडी रोड गणपती मंदिर हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहील. या मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला कोणतेही वाहन पार्क करता येणार नाही. सुर्ली घाट विटा मार्ग, तसेच शामगाव घाट मार्गे कराडकडे कोणत्याही प्रकारचे जड वाहन, एसटी बस यांना करवडी फाटा- ओगलेवाडी- सैदापूर कॅनॉल हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहील. सैदापुर कॅनॉल- कृष्णा सर्कल-विजय दिवस चौक- भेदा चौक- पोपटभाई पेट्रोल पंप- कोल्हापूर नाका- ढेबेवाडी फाटा- कृष्णा हॉस्पिटल या मार्गावर कोणतेही वाहन पार्क करता येणार नाही.



कृष्णा हॉस्पिटल- ढेबेवाडी फाटा- खरेदी विक्री पेट्रोल पंप, कोल्हापूर नाका युटर्न- कोयना मोरी- म. गांधी पुतळा- पोपटभाई पेट्रोल पंप- भेदा चौक- विजय दिवस चौक- कृष्णा सर्कल- सैदापूर कॅनॉल या मार्गावर कोणतेही वाहन पार्क करता येणार नाही. चिपळूण- पाटण- ढेबेवाडी- उंडाळे- तासगाव- इस्लामपुर या बाजूकडून येणारी व विटा, औंध- पुसेसावळी बाजूकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने कराड शहरात प्रवेश न करता महामार्गावरुन तासवडे- शिरवडे- मसुर- शामगाव घाट मार्गे विटा- औंध- पुसेसावळी बाजूकडे जातील. अत्यावश्यक वैद्यकीय सेवा (रुग्णवाहिकेसाठी) सैदापूर कॅनॉल- गणपती मंदिर- ओगलेवाडी मार्ग बंद राहील. त्याऐवजी सैदापूर कॅनॉल- बनवडी फाटा- गजानन हौसिंग सोसायटी- गणपती मंदिर- ओगलेवाडी चौक- करवडी फाटा या मार्गाचा वापर करावा, असे अधिसूचनेत म्हटले आहे.

विटा सुर्ली घाट मार्गे, तसेच शामगाव घाट मार्गे कराडमध्ये येणारी एसटी, जड वाहने मसूर- उंब्रज- तासवडे टोल नाका- महामार्गाने कोल्हापूर नाका मार्गे कराडमध्ये येतील. ओगलेवाडी- रेल्वे स्टेशनकडील वाहने ओगलेवाडी चौक- एमएसईबी बनवडी- बनवडी फाटा- कोपर्डे- सहयाद्री साखर कारखाना- शहापूर फाटा- शिरवडे- तासवडे- वहागाव मार्गे महामार्गाने कोल्हापुर नाका मार्गे कराडमध्ये येतील. वाहतूक ज्या-ज्या ठिकाणांवरुन वळविण्यात आली आहे अथवा बंद करण्यात आली आहे. अशा सर्व ठिकाणी दिशादर्शक फलक व त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे. वाहतुक मार्गात केलेल्या बदलांसाठी सर्व नागरिकांनी व वाहन चालकांनी नोंद घेऊन पोलीस दलास सहकार्य करावे, असे आवाहन श्री. शेख यांनी केले आहे.

अशी असेल पार्किंग व्यवस्था
सातारा बाजूकडून येणारी चारचाकी वाहने उंब्रज- मसुर- सहयाद्री साखर कारखाना- कोपर्डे- बनवडी फाटा- वेणुताई चव्हाण कॉलेज- शासकीय इंजिनिअरींग कॉलेज या ठिकाणी पार्क करावीत. सांगली जिल्हयातून विटा- कडेगाव मार्गे व औंध- पुसेसावळी यामार्गे येणारी चारचाकी व दुचाकी वाहने करवडी फाटा-ओगलेवाडी मार्गे गजानन हौसिंग सोसायटी येथील सूर्या फर्निचरपासुन पूर्वेस असणाऱ्या अमर जाधव यांच्या (शेतात) मैदानावर पार्क करतील. चिपळूण, पाटण, ढेबेवाडी, उंडाळे बाजूकडून सभेकरीता येणारी चारचाकी वाहने कोल्हापुर नाका युटर्न- कोयना मोरी- म. गांधी पुतळा- पोपटभाई पेट्रोल पंप- भेदा चौक- विजय दिवस चौक- कृष्णा सर्कल- सैदापुर कॅनॉल- एसजीएम कॉलेज पाठीमागे हॉलीफॅमिली येथील पैसा फंड व लिगाडे पाटील कॉलेज येथील मैदानात पार्क करावीत. इस्लामपूर, तासगाव, उंडाळे, ढेबेवाडी, पाटण या भागातून सभेकरीता येणारी दुचाकी वाहने ही कोल्हापुर नाका यूटर्न- कोयनामोरी-म. गांधी पुतळा-पोपटभाई पेट्रोलपंप-भेदा चौक-विजय दिवस चौक-कृष्णा सर्कल- सैदापुर कॅनॉल येथील पार्किंग ठिकाणी पार्क करावीत. सातारा- उंब्रज बाजूकडून येणारी दुचाकी वाहने फार्मसी कॉलेज विदयानगर येथे पार्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




शशिकांत शिंदे यांना अटक झाली तर... शरद पवारांचे मोठे विधान ;

वेध माझा ऑनलाइन।
नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील शौचालय घोटाळा प्रकरणी सातारा लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप विरोधकांनी केलेत. याप्रकरणी फळ मार्केटचे माजी संचालक संजय पानसरे यांना अटक करण्यात आली असून शशिकांत शिंदे यांनाही अटक होईल कि काय अशी चर्चा जिल्ह्यात सुरु असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विधानाने खळबळ उडाली आहे. शशिकांत शिंदे याना अटक झाली तर आम्ही लोकशाही मार्गाने लढा उभारू असं विधान शरद पवारांनी जाहीर सभेतच केल्याने चर्चाना उधाण आलं आहे.

एका जाहीर सभेत बोलतांना शरद पवार म्हणाले, शशिकांत शिंदे बाजार समितीमध्ये चांगलं काम करत आहेत. काहीही करून शशिकांत शिंदे यांना शशिकांत शिंदे यांना अडवायचं कसं ? त्यांना थांबवण्यासाठी विरोधकांकडून प्रयत्न सुरू आहेत. जर त्यांनी शशिकांत शिंदे यांना अटक केली तर संपूर्ण सातारा जिल्हा आणि महाराष्ट्रात संयमाने आणि लोकशाही मार्गाने आम्ही लढा उभारू हा अन्याय महाराष्ट्र सहन करत नाही हे उदाहरण या ठिकाणी दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही असं शरद पवार यांनी म्हंटल. शरद पवार यांनी जाहीर सभेतच हे भाष्य केल्यानंतर शशिकांत शिंदे याना अटक होणार का? अशा चर्चाना उधाण आलं आहे.
कोरेगावमधील आमदार महेश शिंदे यांनी मुंबई बाजार समिती घोटाळा प्रकरणी शशिकांत शिंदे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. मुंबई बाजार समितीत २०१४ साली चार हजार कोटींचा घोटाळा झाला आहे. यात तत्कालीन संचालक शशिकांत शिंदे यांचा सहभाग असल्याचा आरोप आमदार महेश शिंदेंनी केला आहे. दुसरीकडे महायुतीचे उमेदवार त्यात उदयनराजे भोसले सुद्धा याच मुद्द्यावरून शशिकांत शिंदे आणि शरद पवार यांच्यावर यांच्याविरोधात भ्रष्टाचारावरून रान उठवत आहेत. तर दुसरीकडे शशिकांत शिंदे यांनी यापूर्वी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.


Friday, April 26, 2024

शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची आज पाटणमध्ये जाहीर सभा

वेध माझा ऑनलाईन।
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरदचंद्र पवार हे आज शनिवार दिनांक २७ एप्रिल २०२४ रोजी सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. सातारा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची आज शनिवारी दुपारी ३ वा. पाटण येथील जुन्या ग्रामपंचायत मैदानावर जाहीर सभा होणार आहे अशी माहिती पाटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष राजाभाऊ शेलार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. 
           
प्रसिद्धी पत्रकात पुढे दिलेल्या माहितीनुसार या सभेला राज्याचे माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण, माजी खासदार श्री. श्रीनिवास पाटील, पक्षाचे जेष्ठ नेते व माजी मंत्री श्री.विक्रमसिंह पाटणकर, माजी मंत्री आ.श्री.बाळासाहेब पाटील, उ.बा.ठा.शिवसेना उपनेते नितीन बानुगडे, सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्री.आ.शशिकांत शिंदे,  सातारा जिल्हा मध्य. सह. बँकेचे संचालक श्री.सत्यजितसिंह पाटणकर (दादा),श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ.भारत पाटणकर, रयत सहकारी साखर कारखाने चेअरमन श्री.उदयसिंह पाटील -उंडाळकर, उ.बा.ठा.शिवसेना सातारा जिल्हा अध्यक्ष श्री.हर्षद उर्फ भानुप्रताप कदम, राष्ट्रीय काँग्रेसचे प्रांतिक प्रतिनिधी श्री.हिंदुराव पाटील त्याचबरोबर महाविकास आघाडीतील मित्रपक्षांचे सर्व जिल्हा अध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्ष, राष्ट्रीय कॉंग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, श्रमिक मुक्ती दल, शेकाप आणि महाविकास आघाडीतील घटक मित्र पक्षांच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहनही या पत्रकात केले आहे.

Thursday, April 25, 2024

शौचालय घोटाळा प्रकरण ; संचालक मंडळावर अटकेची टांगती तलवार! ; काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाईन।
एपीएमसी मार्केट शौचालय घोटाळा प्रकरण, माजी संचालक संजय पानसरेंना अटक ७ कोटींच्या या शौचालय घोटाळा प्रकरणात यापूर्वी तिघांना अटक करण्यात आली आहे. तर याप्रकरणातील ७ अधिकारी फरार आहेत. संजय पानसरे यांच्यासह ७ अधिकाऱ्यांचा मुंबई हायकोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. याप्रकरणात साताऱ्याचे शरद पवार गटाचे नेते आणि लोकसभेचे उमेदवार शशिकांत शिंदे यांना अंतरिम जामीन मिळाला आहे 

दरम्यान २०२३ मध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी नवी मुंबई पोलिस तपास करत आहेत. याप्रकरणात आतापर्यंत ४ जणांना अटक केली आहे.

नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजेच एपीएमसी मार्केटमधील शौचालय घोटाळा प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या घोटाळा प्रकरणात फळ मार्केटचे माजी संचालक संजय पानसरे यांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. ७ कोटींच्या या शौचालय घोटाळा प्रकरणात यापूर्वी तिघांना अटक करण्यात आली आहे. तर याप्रकरणातील ७ अधिकारी फरार आहेत. संजय पानसरे यांच्यासह ७ अधिकाऱ्यांचा मुंबई हायकोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता.

बुधवारी संध्याकाळी नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने एपीएमसी मार्केटचे माजी संचालक संजय पानसरे यांना अटक केली. तर कांदा बटाटा बाजार समितीचे माजी संचालक अशोक वाळुंज यांची पोलिसांनी चौकशी केली. तर या प्रकरणात अन्य संचालकांवर अटकेची टांगती तलवार आहे. 
एपीएमसी मार्केट परिसरातील शौचालय चालवण्यासाठी देण्यात येणाऱ्या कंत्राटामध्ये कमी दरामध्ये कंत्राट देत शासनाचे ७ कोटींपेक्षा जास्त रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल करत नवी मुंबईच्या गु्न्हे शाखेने तपासाला सुरुवात केली होती. याप्रकरणी गुन्हे शाखेने आतापर्यंत तीन जणांना अटक केली होती. बुधवारी आणखी एकाला म्हणजे संजय पानसरे यांना अटक केली. याप्रकरणात आतापर्यंत ४ जण अटकेत आहेत. तर बुधवारी पोलिसांनी अशोक वाळुंज यांची देखील चौकशी केली. अटक करण्यात आलेले संजय पानसरे हे एपीएमसी मार्केटमधील संचालकांपैकी सर्वात मोठे संचालक आहेत. त्यांच्या अटकेनंतर आता इतर संचालक देखील घाबरले आहेत.

दरम्यान, नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट हे आशियातील सर्वात मोठे आणि प्रसिद्ध मार्कट म्हणून ओळखले जाते. एपीएमसी मार्केट परिसरात असलेल्या शौचालयाच्या कंत्राटामध्ये घोटाळा झाल्याची बाब समोर आली होती. शौचालयाच्या कंत्राटामध्ये सरकारचे ७ कोटी ६१ लाख ४९ हजार ६८९ रुपयांचे नुकसान झाल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. याप्रकरणी आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह आठ जणांवर आरोप करण्यात आला आहे. २०२३ मध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी नवी मुंबई पोलिस तपास करत आहेत. याप्रकरणात आतापर्यंत ४ जणांना अटक केली आहे.

आमदार शिवेंद्रराजेचा शशिकांत शिंदेंना कडाडून विरोध ; म्हणाले...शशिकांत शिंदे साताऱ्याच्या विकासाच्या आड आले...

वेध माझा ऑनलाइन।
देगाव एमआयडीसीचे शिक्के उठवणाऱ्यांनी सातारकरांचे नुकसान केले आहे. बाहेरच्या लोकांनी येऊन सातारा जिल्ह्यातील जनतेला स्वाभिमान शिकवू नये. विकासाच्या नेहमी आड येणारे सातारकरांना स्वाभिमान शिकवत असतील तर त्यांना त्याच भाषेत उत्तर देवू, असा इशारा आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी दिला

खा. उदयनराजे भोसले यांच्या प्रचारानिमित्त सोनगाव (ता. सातारा) येथील सप्तपदी मंगल कार्यालयात झालेल्या शेंद्रे जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. खा. उदयनराजे भोसले यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

उदयनराजेंच्या विरोधात जे उमेदवार आहेत, त्यांनीच विधान परिषदेत प्रश्न उपस्थित करून मविआ सरकारच्या काळात देगाव एमआयडीसीला खो घातला होता. साताऱ्याच्या विकासाला विरोध करणाऱ्यांच्या विरोधात आपण सर्वांनी उभे राहण्याची वेळ आली आहे. सातारा तालुक्यात आपली स्वतंत्र ताकद आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मोठ्या संघर्षानंतरही आपण सर्वजण एकत्र आलो आहोत. खासदार उदयनराजे आणि माझ्यात कुठलेही राजकीय सेटिंग झालेलं नाही तर विकासकामे गतीने पूर्ण करण्यासाठी आपल्याला पुन्हा भाजपला सत्तेवर आणायचे असल्याचे आ. शिवेंद्रराजे म्हणाले.

घटना बदलली जाणार असल्याचा चुकीचा प्रचार विरोधी नेत्यांकडून सुरू आहे. वास्तविक मोदी-शहा यांनी घटनेला हात लावणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मते मिळवण्यासाठी आंबेडकरप्रेमी जनतेला फसवण्याचे काम विरोधक करत आहेत, अशी टीकाही आ. शिवेंद्रराजेंनी केली. भाजपाच्या माध्यमातून सातारा शहरासह तालुक्याचा विकास करायचा आहे. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने केलेली एकी पुढे विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच गाव पातळीवरील निवडणुकांत देखील कायम ठेवायची असल्याचे सुतोवाच आ. शिवेंद्रराजेंनी यावेळी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध ; पहा काय आहे हा शपथनामा...

वेध माझा ऑनलाईन।
लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आदी नेतेमंडळीच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. पवार गटाच्या या जाहीरनाम्याला शपथनामा असं संबोधण्यात आलं आहे. समाजातील सर्व घटकांचा, शेतकऱ्यांचा, तरुणांचा, महिलांचा विचार या जाहीरनाम्यात करण्यात आला आहे. तसेच आमची सत्ता आल्यास ५० % आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी कायदा करू असे आश्वासनही शरद पवार गटाने दिल आहे.

शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील घोषणा...
शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र आयोग स्थापन करणार
बेरोजगार तरुण- तरुणींना पहिल्या वर्षी मदत करणार

जेष्ठ नागरिकांसाठी आयोग स्थापन करणार
महिला आणि मुलीच्या सुरक्षेसाठी कायदा करणार

शेती आणि शैक्षणिक वस्तूंवर GST आकारणार नाही

५० % आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी कायदा करू

गरिबांसाठी रेशन कार्डच्या निकषात बदल करू
कंत्राटी नोकर भरती बंद करू

सत्तेत आल्यावर जातनिहाय जनगणना करू
आरोग्यासाठी उत्तम सेवा पुरवणार

युवा, महिला, युवती, शेतकरी, कामगार, उपेक्षित घटक, अल्पसंख्याक अश्या अनेक घटकांचा शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यात समावेश करण्यात आला असल्याचं यावेळी राज्यसभेच्या खासदार वंदना चव्हाण यांनी सांगितलं आहे. “जाहीरनामा बनवण्यासाठी मला शरद पवार आणि जयंत पाटील यांनी खूप चांगलं सहकार्य केलं. अनेक लोकांकडून माहिती घेऊन हा जाहीरनामा तयार केला आहे असेही त्यांनी म्हंटल आहे.



सांगलीत बंड करणाऱ्या विशाल पाटील यांच्यावर कारवाई केव्हा ? काँग्रेसचे नेते काय म्हणाले?

वेध माझा ऑनलाइन।लोकसभा निवडणुकीत बंडखोरी केली म्हणून कोल्हापूर मतदारसंघात बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवणारे बाजीराव खाडे यांना काँग्रेसने पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे. मात्र, सांगलीत बंड करणाऱ्या विशाल पाटील यांच्याबाबत मौन बाळगले आहे. याबाबत कारवाई करण्याचा अधिकार प्रदेश काँग्रेसला नसून तो अखिल भारतीय काँग्रेसला असल्याचे सांगितले जात आहे.

खाडे यांनी युवक काँग्रेस ते राष्ट्रीय सचिव म्हणून काम पाहिले. प्रियांका गांधी यांचे निकटवर्तीय ओळखले जात होते. 

सांगलीतून विशाल पाटील यांनी बंडखोरी केली तर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाईल, असा इशारा राज्यातील काँग्रेस नेत्यांनी दिला होता. उद्धवसेनेनेही कारवाई करण्याची मागणी काँग्रेसकडे केली होती.  २२ एप्रिल रोजी सांगली मतदारसंघातील निवडणुकीसाठी अर्ज मागे घ्यायचा होता. मात्र, विशाल पाटील यांनी अर्ज मागे न घेता बंडखोरी केली आहे. काँग्रेसचे अनेक स्थानिक पदाधिकारीही सध्या विशाल पाटील यांचा प्रचार करीत आहेत. 
सांगलीतील उद्धवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण, विधीमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची गुरुवारी सांगलीत सभा होत आहे.
काँग्रेस पक्षाच्या राज्यघटनेनुसार लोकसभा निवडणुकीत बंडखोरी केलेल्या उमेदवारावर कारवाई करण्याचे अधिकार पक्षाचे अध्यक्ष किंवा राज्य प्रभारीला असतात. दुसरीकडे प्रदेश काँग्रेसवर दोन प्रकारचे प्रतिनिधी नियुक्त केले जातात. काही प्रतिनिधी हे प्रदेश काँग्रेसतर्फे नियुक्त केले जातात तर काही प्रतिनिधी अखिल भारतीय काँग्रेसतर्फे नियुक्त केले जातात. विशाल पाटील हे प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत. 
त्यांची नियुक्ती अखिल भारतीय काँग्रेसमार्फत झाली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार अखिल भारतीय काँग्रेसला आहे. अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्या स्वाक्षरीने विशाल पाटील यांच्यावर कारवाई होऊ शकते, असे प्रदेश काँग्रेसमधील सूत्रांनी एका मध्यम समूहाला सांगितले.

Wednesday, April 24, 2024

शरद पवारांचं घर कोणी फोडलं? अल्लाहची शपथ घेत जितेंद्र आव्हाडांनी घेतलं राष्ट्रवादी च्या मोठ्या नेत्याचं नाव ; कोण आहे हा नेता ...? काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाइन।  रायगडच्या सभेत आव्हाड म्हणाले, खूप दिवसांनंतर भाषणाची संधी मिळली आहे. त्यामुळे सगळ्यांचा हिशेब चुकता करणार आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटून दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटांमधील नेते सातत्याने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. अजित पवार गटातील नेते थेट शरद पवार यांना लक्ष्य करत आहेत. तर शरद पवारांच्या गटातील नेते त्यावर प्रत्युत्तर देत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रायगडमधील महाविकास आघाडीच्या सभेतून स्थानिक खासदार आणि अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. महाविकास आघाडीचे रायगड लोकसभेचे उमेदवार आणि माजी खासदार अनंत गीते (शिवसेनेचा ठाकरे गट) यांच्या प्रचारार्थ रायगडच्या मोर्बा येथे मविआची जाहीर सभा पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे या सभेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. तसेच शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीदेखील या सभेला संबोधित केलं.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “खूप दिवसांनंतर भाषणाची संधी मिळली आहे. त्यामुळे सगळ्यांचा हिशेब चुकता करणार. येत्या निवडणुकीत सर्व पाकिटमारांचा हिशेब होईल. मला एक गोष्ट कळत नाही की, ज्यांनी लोकांच्या घरावर दरोडे टाकले, चोरी केली तरी त्यांना सुखाची झोप कशी काय लागते तेच मला समजत नाही. मला या मंचावरून सुनील तटकरेंना विचारायचं आहे की, तुम्हाला शरद पवार यांनी काय कमी केलं होतं ते आम्हाला सांगा. आधी तुम्ही ए. आर. अंतुलेंना (महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री) झोपवलंत. आता त्यांच्या मुलाच्या, पुतण्याच्या की जावयाच्या खांद्यावर हात टाकून फिरताय. आज अंतुले वरून बघत असतील तर त्यांच्या डोळ्यात अश्रू येत असतील.” दरम्यान, सभेला उपस्थित लोकांनी आव्हाड यांना आठवण करू दिली की, तो अंतुलेंचा जावई आहे. त्यावर आव्हाड म्हणाले, पुतण्या असो वा जावई तो ए. आर. अंतुलेंचीच ओळख सांगतो ना… मला त्यांचं नातं माहीत नाही.

शरद पवार गटातील आमदार आव्हाड म्हणाले, तटकरेजी शरद पवारांनी तुम्हाला काय कमी केलं होतं? तुम्हाला मंत्री बनवलं. शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी तुमच्या मंत्रिपदाला विरोध केला होता. तरीदेखील शरद पवार यांनी तुम्हाला मंत्री केलं. खरंतर जयंत पाटील हे तुम्हाला चांगलंच ओळखतात. त्यामुळेच ते शरद पवारांना म्हणाले होते की, तटकरेंना मंत्रिपद देऊ नका. परंतु, शरद पवार यांनी तुम्हाला, तुमच्या मुलीला, तुमच्या मुलाला, तुमच्या भावाला आणि तुमच्या भावाच्या मुलालाही पद दिलं. एका घरात पाच-पाच पदं देऊनही तुम्ही त्यांचं घर फोडलंत. शरद पवार यांचं घर फोडण्याचं काम कोणी केलं असेल तर ते तटकरेंनी केलं आहे. मी अल्लाहला साक्षी मानून खूप गांभीर्याने हे वक्तव्य करतोय. मी ठामपणे दावा करतोय की, तटकरेंनीच शरद पवारांचं घर फोडलं. शरद पवार यांच्या घरात कोणी भींत उभारली असेल तर ती तटकरेंनीच उभारली आहे.

कराडात नरेंद्र मोदींच्या सभेची जय्यत तयारी सुरू ; उदयनराजे यांच्या प्रचारार्थ 29 एप्रिलला होणार विराट सभा ; 1 लाख लोकांच्या बैठकीचे नियोजन ...

वेध माझा ऑनलाइन।
29 एप्रिल 2024 सोमवार रोजी कराड येथे सातारा लोकसभा महायुतीचे लोकप्रिय उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांच्या प्रचारार्थ देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी साहेब यांची महाविराट सभा संपन्न होणार आहे. या सभेसाठी उभारण्यात येत असलेल्या भव्य मंडपाचे भूमिपूजन समाजातील विविध घटकातील लोकांकडून श्रीफळ वाढवून करण्यात आले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सातारा जिल्ह्यातील प्रचार सभा निश्चित झाली आहे. सोमवारी 29 एप्रिलला पंतप्रधान कराड तालुक्यातील कराड ओगलेवाडी मार्गानजीक सैदापुर येथे बीज गुणन केंद्र कृषी विभाग डेपो या मैदानावर प्रचार सभेसाठी उपस्थित राहणार आहेत. 

या सभेसाठी सैदापुर परिसरात या सभेसाठी जय्यत तयारी केली जात आहे. या सभास्थळी 35 एकराच्या विस्तीर्ण जागेवरती सभामंडप उभारण्याचे काम सुरू झाले आहे. 

या सभेसाठी उभारण्यात येणाऱ्या मंडपाचे भूमीपूजन आज करण्यात आले. १ लाख लोकांची बैठक व्यवस्था या मंडपात करण्यात येणार आहे. 
  
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, कराड शहराध्यक्ष एकनाथ बागडी, भाजपा किसान मोर्चा सरचिटणीस रामकृष्ण वेताळ, प्रदेश सदस्या स्वाती पिसाळ, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष चिन्मय कुलकर्णी, वर्धन ऍग्रोचे कार्यकारी संचालक विक्रम कदम, जिल्हा सरचिटणीस सागर शिवदास, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, जिल्हा सरचिटणीस सुनील शिंदे, कराड दक्षिण मंडल अध्यक्ष धनाजी पाटील, मुकुंद चरेगावकर, सुहास जगताप, उमेश शिंदे, अजय पावसकर , नितीन वास्के, घनशाम पेंढारकर, कराड उत्तर मंडल अध्यक्ष शंकर शेजवळ, अभिषेक भोसले, कराड उत्तर महिला अध्यक्ष सिमा घार्गे, मंजिरी कुलकर्णी, तुकाराम नलवडे, मोहनराव जाधव, शहाजी मोहिते, सुदर्शन पाटसकर, भारत जत्रे, प्रितेश मेहता, संजय शहा , केतन शहा, निशा खिलारे,नितीन खिलारे,नेताजी वाडकर,राणी वाडकर, दादासो साठे, नंदना साठे, बाळासाहेब बागडे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Tuesday, April 23, 2024

शशिकांत शिंदे म्हणाले...मला आणि बाळासाहेब पाटील यांना पक्षातून फोडण्याचा प्रयत्न झाला ; आणखी काय म्हणाले ?


वेध माझा ऑनलाइन।
माझ्यासह बाळासाहेब पाटील यांनाही पक्षातून फोडण्याचा प्रयत्न झाला. मात्र आमच्यावर यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार असून आम्ही शरद पवारांची साथ सोडणार नाही सातारा जिल्हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा जिल्हा आहे. सातारा जिल्ह्यातील माथाडी कामगाराचा मुलगा व सर्वसामान्य कुटुंबातील नेतृत्व म्हणून जिल्ह्यातील जनतेने मला एक संधी द्यावी. या संधीचे सोने करू, अशी ग्वाही शशिकांत शिंदे यांनी दिली.

सातारा लोकसभा निवडणुकीतील इंडिया आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांच्या प्रचाराचा शुभारंभ कराड उत्तरमधील पाल येथे श्री खंडोबा मंदिरात झाला. त्यावेळी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी श्रीनिवास पाटील होते. आमदार बाळासाहेब पाटील, सत्यजितसिंह पाटणकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, सारंग पाटील, डॉ. भारत पाटणकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हर्षद कदम, एड. रवींद्र पवार, मानसिंगराव जगदाळे कराडचे नगरसेवक जयवंत पाटील, संगीता साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती.

लोकसभेच्या निवडणुकीत जिल्ह्यात सर्वत्र फिरत असताना जनतेतून असे जाणवत आहे की  लोकसभेला आपला विजय निश्चित आहे. त्यामुळेच भाजपने जिल्ह्यात उमेदवार जाहीर करायला विलंब केला. कोण विरोधात बोलायला लागल की त्याला आत टाकायचे हा ट्रेंड सध्या देशात सुरू आहे. माझ्यासह बाळासाहेब पाटील यांनाही पक्षातून फोडण्याचा प्रयत्न झाला. मात्र आमच्यावर यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार असून माझ्यावर कितीही दबाव टाकला तरी पवारांची साथ मी सोडणार नाही. 

आपली उमेदवारी लोकांपर्यंत गेली असल्याने सत्ताधारी पक्षाकडून षड्यंत्र रचण्यात आले आहे.
सातारा जिल्ह्याचे वातावरण गेल्या वर्षभरात बिघडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, धनगर आरक्षण या सगळ्या प्रश्नावर केंद्र सरकार व राज्य सरकारने जनतेची फसवणूक केली आहे.
सातारा मतदारसंघ जातीयवादी शक्तींच्या ताब्यात जाऊ नये, यासाठी लोकसभा निवडणूक लढवत आहे, असे सांगत सर्वसामान्य जनतेच्या पाठबळावर सातारची तुतारी निश्चितपणे दिल्लीत जाईल, असा विश्वास आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला.

आमदार बाळासाहेब पाटील म्हणाले की, भाजप सरकारने नोटबंदी, जीएसटी, शेतकरी विरोधी कायदे असे अनेक चुकीचे निर्णय घेतले असून त्याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसला आहे. लोकसभा निवडणुकीत देशातील वातावरण बदलत चालले असून निश्चितपणे इंडिया आघाडीचा विजय होणार आहे. शशिकांत शिंदे हे एखादा मुद्दा हातात घेतला तर तो सोडवण्यासाठी शेवटपर्यंत लढणारे नेतृत्व आहे. त्यांची उमेदवारी सर्वसामान्य जनतेपर्यंत गेली असल्याने त्यांच्याविरुद्ध सत्ताधारी षड्यंत्र रचत आहेत.

यावेळी अजितराव पाटील चिखलीकर, डॉ. भारत पाटणकर, एड. रवींद्र पवार यांनीही यांची भाषणे झाली. माजी सभापती देवराज पाटील यांनी प्रास्ताविक केले तर आभार सर्जेराव खंडाईत यांनी आभार मानले. यावेळी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.


Monday, April 22, 2024

इंदिरा गांधींनी संविधानाची मोडतोड केली ; राजेंनी पहिल सगळंच काढलं:कारवे येथील सभेत उदयनराजे महाविकास आघाडीवर बरसले ;

वेध माझा ऑनलाइन।
संविधानाची मोडतोड आणीबाणीतच झाली होती. मोदी संविधान बदलायला निघाल्याचा आरोप वारंवार विरोधकांकडून केला जात आहे. वास्तविक, आणीबाणीच्या काळातच संविधानाची मोडतोड काँग्रेसच्या नेत्या इंदिरा गांधी यांनी केली होती. पंडित नेहरूंनी तर संविधान लिहिणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव करण्याचे कृत्य दोन वेळा केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नेहरूंच्या मानसिक त्रासातूनच मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. आता खोटं नाटक उभे करून लोकांची दिशाभूल करण्याचे काम काँग्रेसचे नेते करत आहेत, असा आरोप खासदार उदयनराजे भोसले यांनी केला.

भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ कार्वे (ता. कराड) भव्य प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या व्यासपीठावर य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुलबाबा भोसले, माजी आमदार आनंदराव पाटील, कराडचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, कृष्णा कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप, संचालक निवासराव थोरात, धोंडिराम जाधव, बाजीराव निकम, वसंतराव शिंदे, दत्तात्रय देसाई, दयानंद पाटील, भाजपाचे तालुकाध्यक्ष पैलवान धनाजी पाटील, विजय जगताप, संग्राम बर्गे, संपतराव थोरात, बाळासाहेब निकम, , प्रवीण थोरात आदींची प्रमुख उपस्थिती होती.

खासदार उदयनराजे भोसले पुढे म्हणाले, काँग्रेसने विश्वास गमावल्याने भाजपच्या हाती लोकांनी सत्ता दिली. अवघ्या दहा वर्षांत भारतीय जनता पक्ष व मित्रपक्षांच्या महायुतीने देशात कायापालट करण्यासारखे काम केलेले आहे. ज्या लोकांनी काँग्रेसवर विश्वास ठेवला, त्यांना गृहीत धरण्याचे काम काँग्रेस नेत्यांनी केले. लोकांच्या कष्टाच्या पैशाचा अनेकांनी अपहार केला. सर्वसामान्य लोकांना विकासाच्या वाटेवर आणण्यासाठी ज्या उपाययोजना करायला पाहिजेत, त्या केलेल्या नाहीत. लोकांची आता कुठे उन्नती होत आहे. केंद्रात आणि राज्यात एकाच विचाराचे सरकार सत्तेवर असेल तर निश्चितपणे विकास सातत्याने असाच होत राहील. माझ्याविरोधात महाविकास आघाडीचा जो उमेदवार उभा केलेला आहे, त्याने कोट्यवधींचा भ्रष्टाचार केलेला आहे. अशा भ्रष्टाचारी लोकांना निवडून देऊन विकास कसा होणार हे जनतेने लक्षात घ्यावे.

डॉ. सुरेश भोसले म्हणाले, भारताची विकसित राष्ट्र म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार जोरदार प्रयत्न करत आहे. स्टार्ट अपसारखी कल्पना या सरकारने विकसित केली. कोरोनाच्या काळामध्ये जगातील केवळ तीन ते चार देश व्हॅक्सीन तयार करू शकले, त्यामध्ये भारताचा नंबर लागतो. भारत सरकारने देशाच्या १४० कोटी जनतेला कोविड प्रतिबंधक मोफत व्हक्सिनेशन केले आहे, ही केवढी मोठी बाब आहे. प्रत्येक व्यक्तीचा विकास करण्याचे धोरण मोदी सरकारने राबवलेले आहे, लोकसभेची यंदाची निवडणूक गांभीर्याने घेण्याची गरज आहे. उदयनराजे भोसले यांना पुन्हा लोकसभेत पाठवायचे आहे.

डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, लोकसभा निवडणुकीसाठी खासदार उदयनराजे भोसले यांचा प्रचार दौरा सुरू असून त्याला कराड तालुक्यातून फार मोठा प्रतिसाद मिळतो आहे. कराड दक्षिणमधील गावांमध्ये अवघ्या दोन वर्षात ४३३ कोटी रुपयांचा निधी आणण्यात यश आलेले आहे. उदयनराजेंचे हात पाठीशी असल्यामुळे हे शक्य झाले. सर्वांनी बूथनिहाय काम करावे. 

निवासराव थोरात यांनी प्रास्ताविक केले. संपतराव थोरात यांनी आभार मानले. यावेळी कार्वेचे सरपंच सर्जेराव कुंभार, उपसरपंच राहूल जाधव, माजी सरपंच संदीप भांबुरे, महेश थोरात, वैभव थोरात, संपतराव थोरात, कोरेगावचे सरपंच बाळासाहेब पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कॉलर उडवतो, कुणाला लुबाडत नाही...

माझी कॉलर उडवण्याची स्टाईल सर्वत्र फेमस झाली. मात्र मी कॉलर उडवत असलो तरी कोणाला लुबाडत नाही. लोकांचं कल्याण करण्याचे व्रत मी हाती घेतलेले आहे. मी कालही तुमचा होतो, आजही तुमचा आहे.. आणि उद्याही तुमचाच राहणार यात शंका ठेवू नका. भ्रष्टाचारी लोकांबाबत मला प्रचंड चीड आहे. अन्याय, अत्याचार मला सहन होत नाही. चुकीला चूक म्हणण्याची हिंमत माझ्याकडे आहे, असे खासदार उदयनराजे भोसले म्हणाले.

काँग्रेसकडे खुपकाळ सत्ता असूनही विकास करता आला नाही.......

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस पक्षाकडे सलग अनेक वर्षे सत्ता होती. मात्र या काळात काँग्रेसला जेवढा विकास करता आला नाही, तेवढा मोदी सरकारच्या काळात गेल्या दहा वर्षांत झाला आहे. आता देशाला पुन्हा अधोगतीच्या मार्गावर नेण्यासाठी काँग्रेस व त्यांचे मित्रपक्षाचे नेते अंगात सोंग आणून तुमच्यापुढे लोटांगण घालतील. अशा सोंगाड्यांच्या थापांना भुलू नका, असे प्रतिपादन भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केले. 


Sunday, April 21, 2024

उदयनराजे भोसले यांच्या कराड दौऱ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; शहरात जोरदार स्वागत ;

वेध माझा ऑनलाइन।
सातारा लोकसभा मतदारसंघातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या कराड येथील प्रचार दौऱ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या प्रचार दौऱ्यात त्यांनी कराड शहरासह विद्यानगर, सैदापूर परिसरातील मान्यवरांशी व नागरिकांशी संवाद साधला. दरम्यान, ३० एप्रिल रोजी कराड येथे होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सैदापुरातील नियोजित सभास्थळाची पाहणी करण्यात आली. 
दरम्यान आज संध्याकाळी नगरसेवक सुहास जगताप, शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र माने सामाजिक कार्यकर्ते संदीप पवार शिवप्रतिष्ठानचे सागर आमले यांच्या निवासस्थानी उदयनराजे यांनी भेट दिली त्यावेळी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले

दरम्यान महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रचारात आघाडी घेतली असून, त्यांनी कराड तालुक्यातील प्रचारावर विशेष भर दिला आहे. आज कराड येथे आगमन होताच त्यांचे भाजपा कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आले. या प्रचार दौऱ्यात खासदार भोसले यांच्यासमवेत भाजपचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुलबाबा भोसले यांनी कराड शहर, विद्यानगर व सैदापुरातील विविध मान्यवरांच्या भेटीगाठी घेतल्या. 

याप्रसंगी भाजपाचे लोकसभा प्रभारी डॉ. अतुलबाबा भोसले, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, श्रीनिवास जाधव, सुनील काटकर, मोहनराव जाधव, राजेंद्रसिंह यादव, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सागर शिवदास, शहराध्यक्ष एकनाथ बागडी, मुकुंद चरेगावकर, सुहास जगताप, उमेश शिंदे, प्रशांत कुलकर्णी, प्रमोद शिंदे, धनाजी जाधव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Saturday, April 20, 2024

शशिकांत शिंदे या लढवैय्या नेतृत्वाला निवडून देऊया ; आ बाळासाहेब पाटील यांचे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आवाहन ;

वेध माझा ऑनलाईन।
आपल्या मतदारसंघात इंडिया आघाडीकडून उमेदवारी देण्यात आलेले आमदार शशिकांत शिंदे हे यशवंत विचार जपणारे, कामगारांसाठीचे लढवय्या नेतृत्व आहे असे सांगत कराड ही यशवंत विचाराची भूमी आहे. त्यामुळे आपल्यावर मोठी जबाबदारी आहे. ती ओळखून या निवडणुकीत इंडिया आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचे चिन्ह घराघरापर्यंत पोहोचवून त्यांना विजयी करूया.असे आवाहन आ बाळासाहेब पाटील यांनी केले 

45 सातारा लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांच्या निवडणूक प्रचारार्थ आमदार बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली कराड शहरातील यशवंत विचारांच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत आमदार बाळासाहेब पाटील बोलत होते. 

आमदार बाळासाहेब पाटील म्हणाले, 
सातारा लोकसभा मतदारसंघात इंडिया आघाडीच्यावतीने उमेदवारीसाठी सर्वे घेण्यात आला. त्यानंतर मला इथल्या उमेदवारीबद्दल विचारण्यात आले होते मात्र सह्याद्री साखर कारखान्याचा विस्तार आणि सहप्रकल्पाची कामे आपण हाती घेतली असल्याने मी  उमेदवारीसाठी इच्छुक नसल्याचे सांगितले. त्यानंतर आ. शशिकांत शिंदे यांचे नाव पुढे आले आणि त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. शशिकांत शिंदे यांनी पूर्वीच्या जावली मतदारसंघाचे आणि त्यानंतर कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी मंत्री म्हणून ही काम केले आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना चांगला अनुभव आहे. त्यांचा मुंबईत राहणाऱ्या सातारकरांशी चांगला संपर्क आहे, हा कामगारासाठी लढणारा लढवय्या नेता असून यशवंत विचार जोपासणारे नेतृत्व आहे. 
सातारा लोकसभा मतदारसंघात कराड उत्तर मधून मी स्वतः आणि दक्षिण मधून पृथ्वीराज चव्हाण बाबा असे आम्ही दोघे इंडिया आघाडीचे आमदार आहोत, तर इतर मतदारसंघात विरोधी  आमदार आहेत तरीही भाजप विरोधात त्याठिकाणी मतदारांमध्ये सुप्त लाट आहे  आपल्या उमेदवाराला जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी कार्यकर्त्यांनी तत्पर रहावे, असे आवाहन आमदार बाळासाहेब पाटील यांनी यावेळी केले.

सौरभ पाटील म्हणाले
ही निवडणूक सत्ताधारी विरुद्ध भारतीय लोक अशी होत आहे शशिकांत शिंदे यांचा परिचय हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवत त्यांचे चिन्ह देखील सर्व मतदारांपर्यत पोहोचवणे आपली जबाबदारी आहे त्यासाठी आपण स्वतःच उमेदवार आहोत या भावनेने आपल्याला या निवडणुकीला सामोरे जायचं आहे आपला विजय निश्चित आहे याबद्दल खात्री बाळगा 

नंदकुमार बटाणे यांनी प्रास्ताविक केले तर माजी नगरसेवक शिवाजी पवार यांनी आभार मानले.

यावेळी माजी नगराध्यक्ष जयवंत पाटील, माजी नगराध्यक्षा ऍड विद्याराणी साळुंखे, ऍड सतीश पाटील,माजी उपनगराध्यक्ष सुभाषराव डुबल, सुभाषराव पाटील, माजी नगरसेवक अरुण जाधव, कांतीलाल शेठ,  मझहरभाई कागदी, जयंतकाका पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कराड मधील शिवाजीनगर हौसिंग सोसायटी येथे चोरी करणाऱ्या चोरट्यांना पोलिसांकडून अटक ; 42 लाखाचा मुद्देमाल जप्त ;


वेध माझा ऑनलाइन। कराड येथील शिवाजीनगर हौसिंग सोसायटी येथे चोरी करणाऱ्या दोघा चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखा सातारा व कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने सातारा येथून ताब्यात घेतले.  निलेश शामराव गाढवे ,रमेश महादेव कुंभार अशी पोलिसांनी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 
कराडातील शिवाजीनगर हौसिंग सोसायटी येथे चोरट्यांनी घराची खिडकी उचकटून 38 लाख रूपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून काही दिवसांपूर्वी नेले होते. याबाबत कराड शहर पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली होती. त्यानंतर पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, डीवायएसपी अमोल ठाकूर यांनी घटनास्थळी भेट देऊन या गुन्ह्यातील आरोपीबांबत माहिती प्राप्त करून गुन्हा उघड करण्याच्या सूचना दिल्या होत्या 

त्याप्रमाणे तपास केला तेव्हा सदरचे वाहन पोलीस रेकार्डवरील रमेश कुंभार याचे असल्याचे निष्पन्न झाले रमेशच्या घराच्या आजूबाजूच्या परिसरात वेषांतर करून पोलीस चार दिवस पाळत ठेवून होते. 
त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रमेश कुंभार व त्याचे सोबत असणारा निलेश गाढवे या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून तपास केला असता त्यांनी चोरी केल्याचे कबूल केले.  पोलिसांनी चोरीस गेलेले 52 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, चोरीसाठी वापरलेली गाडी असा एकूण 42 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.



Friday, April 19, 2024

सुप्रिया सुळे व सुनेत्रा पवार यांच्या लढतीची चर्चा थेट अमेरिकेत : काय आहे बातमी...

वेध माझा ऑनलाइन। बारामती लोकसभेची निवडणूक सर्वात चर्चेची निवडणूक ठरणार आहे. बारामतीमधील पवार कुटुंबातील या लढतीकडे देशाचे नाही तर जगाचे लक्ष लागले आहे. बारामती हा पवार कुटुंबाकडे वर्षानुवर्ष राहिलेला मतदार संघ आहे. परंतु जुलै २०२३ नंतर समीकरण बदलले. बारामतीमध्ये पवार कुटुंबात फूट पडली. या फुटीनंतर अजित पवार यांनी महायुतीची वाट धरली तर शरद पवार महाविकास आघाडीबरोबर राहिले. लोकसभा निवडणुकीत पवार कुटुंबातील या नेत्यांनी आपआपल्या घरातील उमेदवारास निवडणूक रिंगणात उतरवले आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्री पवार यांनी शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे विरोधात शड्ड ठोकले आहे. यामुळे या लढतीची चर्चा देशभर सुरु झाली होती. परंतु विदेशातही या लढतीचे कुतूहल दिसून आले आहे. यासंदर्भात सुप्रिया सुळे यांनीच माहिती दिली. ही निवडणूक कव्हर करण्यासाठी अमेरिकेहून प्रतिनिधी आल्याचे त्यांनी सांगितले.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे
आपल्या भाषणात सुप्रिया सुळे यांनी बारामती लढतीची माहिती दिली. त्या म्हणाल्या की, बारामती मतदारसंघाची हवा संपूर्ण जगभरात आहे. मी जेवढा वेळ सदानंद सुळेबरोबर घालवीत नाही तेवढा वेळ बारामतीकरांबरोबर आनंदात घालवत आहे. देशभरातून पत्रकार बारामतीमध्ये येत आहेत. परंतु न्यूयॉर्कवरून देखील पत्रकार आले आहेत. न्यूयॉर्क टाईम्सचे प्रतिनिधी बारामतीमध्ये तळ ठोकून आहे. त्यांच्यासोबत फोटोग्रॉफर्स आहे. म्हणजे शरद पवार हे जिल्हा, राज्य, देश नव्हे तर अमेरिकेपर्यंत पोहचले आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने हनुमान पावला आहे. त्यापेक्षा वेगळे काय हवे?

ही वैचारिक लढाई- सुप्रिया सुळे
संपूर्ण मतदार संघात फिरावे लागत असल्यामुळे बारामती येथे कमी वेळ देते आहे. परंतु बारामतीकर ते सांभाळणार आहे. ग्रामपंचायतपासून लोकसभापर्यंत प्रत्येक निवडणूक वैचारिक लढाईने लढणार आहे. ही वैयक्तीक लढाई नाही.मी आणि अमोल कोल्हे एका विचाराने लढत आहोत

शशिकांत शिंदे यांची इंद्रजित गुजर यांच्या निवासस्थानी भेट :


वेध माझा ऑनलाईन।
सातारा लोकसभेचे इंडिया आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांनी नुकतीच गुजर हॉस्पिटलला भेट दिली यावेळी इंद्रजित गुजर यांच्यासह त्यांच्या शेकडो समर्थकांनी आमदार शिंदे यांचे जोरदार स्वागत केले.यावेळी जिल्हाध्यक्ष हर्षद कदम व माजी नगरसेवक उपस्थित होते. 

 इंद्रजित गुजर यांनी खासदार संजय राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. आमदार शशिकांत शिंदे यांना इंडिया आघाडीची उमेदवारी मिळाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने आमदार शिंदे यांच्या मताधिक्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान आमदार शिंदे यांनी बनवडी येथे शिवसेना ठाकरे पक्षाच्या मेळाव्यास मार्गदर्शनही केले.

शशिकांत शिंदे म्हणतात...नाहीतर मला ईडी सारख्या केस मध्ये अडकवले असते

वेध माझा ऑनलाईन।
माझ्यावर भ्रष्टाचाराची खोटी केस टाकली आहे असं माझ्यावर आरोप करणारे नरेंद्र पाटीलच यापूर्वी म्हणत होते...आता ते दुसरंच बोलतायत...असो... त्यांना आता कोणीतरी तसे बोलायला सांगितलेलं दिसतय... पण जर मी माझ्यावर केलेल्या या केसबद्दल जामीन घेतला नसता तर...मला ईडी सारख्या केसमध्ये भाजपने अडकवले असते... मी महाविकास आघाडीचा कट्टर प्रचारक आहे, मी लोकसभेला उभे राहू नये म्हणूनच माझ्यावर केस केल्याची खेळी केली असल्याचे सूतोवाच सातारा लोकसभेचे शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी कराडात संगम हॉटेल याठिकाणी माध्यमांशी बोलताना केले

काँग्रेसचे दोन वेगवेगळे मेळावे होत आहेत का ? याचा अर्थ महाविकास आघाडीत एकवाक्यता नाही का?या पत्रकारांच्या प्रश्नावर  शिंदे म्हणाले...एक रयत संघटनेचा तर दुसरा काँग्रेसचा कार्यक्रम होत आहे...याठिकाणी माझा परिचय व्हावा म्हणून हे कार्यक्रम होत आहेत...यामध्ये महाविकास आघाडीमध्ये दुफळी आहे असे म्हणणे योग्य नाही ... ठाकरेंच्या शिवसेनेने देखील याठिकाणी मेळावा घेत आमची एकसंघता दाखवली आहे...

मी सातारचा पालकमंत्री असताना याठिकाणी मला काम करण्याकरिता फक्त 9 महिनेच मिळाले यादरम्यान मी कराडात लोक दरबार घेतला त्याचप्रमाणे याठिकाणी आवश्यक असणारी सगळी कामे केली... विरोधात असणाऱ्या उमेदवारांनी कराडमध्ये किती कामे केली असा सवाल देखील शिंदे यांनी उदयनराजे यांचे नाव न घेता उपस्थित केला...

कराडमध्ये लोकांचा प्रचंड प्रतिसाद मला मिळतोय विरोधकांना पराभव समोर दिसत असल्याने माझ्याबाबत खोटे आरोप ते करत आहेत त्यांनी असले उदयोग न करता लोकांच्या दरबारात येऊन ही निवडणूक लोकशाही मार्गाने लढावी मग कळेल इथला खासदार आता कोण होणार ते...

उदयनराजे यांनी शरद पवारांवर आरोप करताना हे लक्षात घेतलं पाहिजे की शरद पवारांमुळेच ते आतापर्यंत खासदार झाले आहेत...अर्थात ते राजे आहेत...मी सामान्य कार्यकर्ता आहे...त्यामुळे  लोक ठरवतील की आता जिल्ह्यातील लोकांना कोण खासदार पाहिजे ते...

दरम्यान, सातारा लोकसभा मतदार संघाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी आज दुपारी भर उन्हात कराडचे नगरसेवक इंद्रजीत गुजर यांच्या निवासस्थानी भेट दिली त्यावेळी नगरसेवक गुजर यांनी त्यांची ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूक काढत त्यांचे कराडात स्वागत केले यावेळी शेकडो युवकांनी उपस्थिती लावली होती

Thursday, April 18, 2024

बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि पती राज कुंद्रा यांची 98 कोटी रुपयांची मालमत्ता ईडी कडुन जप्त ;

वेध माझा ऑनलाईन ।
मनी लाँड्रिंग प्रकरणांमध्ये ईडीने बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि पती राज कुंद्रा याची मुंबई पुण्यातील फ्लॅटसह एकूण 98 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. ही कारवाई गुरूवारी सकाळी ईडीकडून करण्यात आली आहे. त्यामुळे याचा शिल्पा शेट्टी आणि पती राज कुंद्रा याला मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेत जुहूमधील निवासी फ्लॅट, पुण्यातील निवासी बंगला आणि राज कुंद्रा यांच्या इक्विटी शेअर्सचा समावेश आहे. या मालमत्तेचा एकूण आकडा 97.79 कोटी रूपये इतका आहे.

काय आहे प्रकरण?
राज कुंद्रावर लोकांना गुंतवणुकीच्या बदल्यात 10 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून बिटकॉइन घोटाळा केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. या बिटकॉइन प्रकरणांमध्ये राज कुंद्रा यांनी 150 कोटी रुपयांचा फायदा करून घेतला असल्याचा आरोप ईडीने लावला आहे. त्यामुळेच राज कुंद्रा यांच्या मालकीची 97.79 कोटी रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता ईडीने तात्पुरती जप्त गेली आहे. या प्रकरणांमध्ये राज कुंद्रा निर्दोष आढळल्यास त्यांनाही मालमत्ता पुन्हा देण्यात येईल.

दरम्यान, बिटकॉईन घोटाळ्यामध्ये शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा याचे नाव समोर आले आहे. यात राज कुंद्राने 2 हजार कोटींचा घोटाळा केला असल्याचे ईडीचे म्हणणे आहे. या प्रकरणामुळे 2018 साली देखील शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांना ईडीने समन्स बजावले होते. त्यानंतर त्यांची चौकशी करण्यात आली होती. त्यावेळी या प्रकरणातील मुख्य आरोपी अमित भारद्वाज याला अटक करण्यात आली होती. हा घोटाळा मनी लॉन्ड्रिंगशी जोडला असल्याचे सांगण्यात येत होते. आता पुन्हा एकदा ईडीने याच प्रकरणामुळे राज कुंद्रा याची मालमत्ता जप्त केली आहे. यात शिल्पा शेट्टीच्या नावावर असलेल्या काही फ्लॅटचा समावेश ही आहे.

Wednesday, April 17, 2024

आज उदयनराजे भोसले विराट शक्ती प्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल करणार : आज सकाळी 11 वाजता साताऱ्यातील गांधी मैदानावरून रॅलीला होणार सुरुवात,

वेध माझा ऑनलाईन  ।
सातारा लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून शशिकांत शिंदे यांचा जोरदार शक्ती प्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्यानंतर आता आज महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले हे सुद्धा आज विराट शक्ती प्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उदयनराजे यांच्या शक्ती प्रदर्शनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती राहणार आहे. त्यामुळे शक्तिप्रदर्शन जोरदार होण्यासाठी उदयनराजे यांनी खास करून बैठक आयोजित केली होती. यामध्ये जिल्ह्यातील भाजपचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक, प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. आज सकाळी 11 वाजता साताऱ्यातील गांधी मैदानावरून रॅलीला सुरुवात होणार आहे.

रॅली राजपथ मार्गे शेटे चौक, खालचा रस्ता, शिवतिर्थ या ठिकाणी जाणार आहे. तिथं छत्रपती शिवरायांच्या आणि यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला हार घालून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणार आहे. या रॅलीसाठी पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला आहे.

Tuesday, April 16, 2024

साताऱ्याचे भाजपचे तिकीट उदयनराजेंना "फायनल' ; कराडात भाजपचा जल्लोष ...

वेध माझा ऑनलाईन
साताऱ्याचे लोकसभेचे उमेदवार म्हणून उदयनराजे भोसले यांना भाजपने अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले त्यानिमित्ताने आज कराड शहरातील भाजपच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी करत आनंद व्यक्त करण्यात आला जय भवानी जय शिवाजी...उदयनराजे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है...अशी घोषणाबाजी करत कराड शहर भाजपा कार्यालयबाहेर यावेळी जल्लोषही करण्यात आला

यावेळी भाजपचे पदाधिकारी प्रमोद शिंदे, एकनाथ बागडी,शैलेंद्र गोंदकर,मुकुंद चारेगावकर,किसन चौगुले, विश्वनाथ फुटाणे,सुहास चक्के,विवेक भोसले,सौरभ शहा,संजय शहा,रुपेंद्र कदम,धनंजय खोत,सागर लादे,रमेश माने,अमिनुद्दीन शेख,निजाम आंबेकरी विनायक घेवदे आशुतोष काटरे,रुपेंद्र कदम,अनिल लोखंडे,सलमान शेख इ कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

विशाल पाटील यांचा अपक्ष अर्ज दाखल ; सांगलीत उद्धव ठाकरेंना धक्का...

वेध माझा ऑनलाईन।
सांगली मतदारसंघात ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यातील वाद विकोपाला गेला असून विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी सातत्याने स्थानिक नेते आग्रह धरत होते. परंतु मविआत ही जागा ठाकरे गटाला देण्यात आली असून याठिकाणी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी उफाळून आली आहे.

महाविकास आघाडी सांगलीबाबतचा निर्णय बदलेल अशी आशा स्थानिक नेत्यांना आहे. त्यासाठी नागपूर येथे काँग्रेस नेत्यांची बैठक होणार आहे. परंतु तत्पूर्वी विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणुकीचा अर्ज दाखल केला आहे. त्यात मंगळवारी काँग्रेस जिल्ह्यात मेळावा घेऊन शक्तिप्रदर्शन करणार आहे. यानंतर विशाल पाटील आणखी एक अर्ज भरतील जो काँग्रेसकडून असेल. काँग्रेसकडून अधिकृत उमेदवारी मिळेल या आशेवरही नेते आहे. 
आज मोजक्या कार्यकर्त्यांसह विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. परंतु मंगळवारी सांगलीत शक्तिप्रदर्शन करत आणखी एक उमेदवारी अर्ज भरणार आहेत. याबाबत विशाल पाटील यांनी माहिती दिली की,  सांगली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज उद्या दाखल करणार आहे, तत्पूर्वी आज खरसुंडी येथे आमचे कुलदैवत सिद्धनाथाच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतले. आपल्या सर्वांचे आशीर्वाद आणि सिद्धनाथाची कृपादृष्टी नेहमीच पाठीशी राहिली आहे. येणारा काळ कसोटीचा असला तरी सोबत संघर्षाचा वारसा आणि आपल्या सर्वांच्या प्रेमाचे असणारे पाठबळ अगणित ऊर्जा देणारे आहे असं त्यांनी सांगितले.

Monday, April 15, 2024

तिढा सुटला, भाजपचे साताऱ्याचे उमेदवार उदयनराजेच!

वेध माझा ऑनलाइन।सातारा लोकसभेच्या उमेदवारीचा तिढा सुटला आहे. अखेर सातारच्या जागेवर भाजपकडून  खासदार उदयनराजे भोसले  यांच्या  नावाची घोषणा करण्यात आली आहे.  भाजपच्या केंद्रीय कमिटीकडून प्रेसनोट जाहिर करत  उदयनराजेंना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

सातारा लोकसभेच्या उमेदवारीचा तिढा कायम असताना उदयनराजेंनी उमेदवारी जाहीर होण्याची वाट न बघता प्रचाराचा धडाका सुरूच ठेवला होता. अखेर आज हा तिढा सुटला असून साताऱ्याच्या लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडीचे शशिकांत शिंदे विरुद्ध भाजपचे उदयनराजे भोसले अशी थेट लढत असणार आहे.

बातमी कराडच्या शिवशंकर पथसंस्थेतील अपहाराची ; सुमारे 13 कोटींचा अपहार ; संचालक, केमचार्यांवर गुन्हा दाखल :

वेध माझा ऑनलाईन । कराड येथील शिवशंकर नागरी सहकारी पतसंस्थेत १३ कोटी नऊ लाख ९६ हजारांचा अपहार केल्याबद्दल पतसंस्थेच्या १८ संचालक आणि पाच कर्मचाऱ्यांवर शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. त्याची फिर्याद विशेष लेखा परीक्षक धनंजय गाडे यांनी दिली आहे. 

पोलिसांचनी दिलेल्या माहितीनुसार, शरद गौरीहर मुंढेकर, शिवाजी हणमंतराव पिसाळ, महेश लक्ष्मण शिंदे, प्रेमलता चंद्रकांत बेंद्रे, शंकर नागप्पा घेवारी, सर्जेराव सोमनाथ लोकरे, वसंत कृष्णा काळे, श्रीकांत विठोबा आलेकरी, 
महालिंग तुकाराम मुंढेकर, तात्यासासाहेब आबासाहेब विभूते.शंकर मनोहर स्वामी, महादेव मल्लाप्पा बसरगी, दीपक मारुती कोरडे, उमेश वसंतराव मुंढेकर, सतीश चंद्रकांत बेडके, मिलिंद रामचंद्र लखापती, मनोज चंद्रकांत दुर्गवडे, वृषाली विश्वास मुंढेकर, सिंधू अमोल जुगे, 
शिवाजी भाऊ मानकर, चंद्रकांत गणपती दुर्गवडे आदी व्यवस्थापक रवींद्र मृगेंद्र स्वामी, 
सुभाष महादेव बेंद्रे ज्ञानेश्वरी भिकोबा बारटक्के दत्तात्रय रघुनाथ शिंदे व सुनील आनंदा काशीद कर्मचारी नितीन रामचंद्र चिंचकर संग्राम शंकर स्वामी अशी गुन्‍हा दाखल झालेल्‍यांची नावे आहेत. 

जोरदार शक्तिप्रदर्शन करत आमदार शशिकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल : शरद पवार म्हणाले...आपलं नाणं खणखणीत :

वेध माझा ऑनलाइन। सातारा लोकसभा निवडणूक २०२४ साठी महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातून आमदार शशिकांत शिंदे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी स्वत: शरद पवार यांच्यासह ‘मविआ’तील नेत्यांनी देखील साताऱ्यात उपस्थिती लावली. महारॅलीच्या माध्यमातून जोरदार शक्तिप्रदर्शन करत आमदार शशिकांत शिंदे यांचा अर्ज भरल्यानंतर शरद पवारांनी “आपलं नाणं खणखणीत, चिंता करण्याची गरज नाही,” अस सांगत आपला विश्वास व्यक्त केला.

साताऱ्यात आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत आमदार शशिकांत शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काढण्यात आलेल्या महारॅलीत खासदार श्रीनिवास पाटील, आमदार पृथ्‍वीराज चव्‍हाण, बाळासाहेब पाटील यांच्‍यासह महाविकास आघाडीतील सर्व पक्षांचे वरिष्‍ठ नेते व पदाधिकारी उपस्‍थित राहिले. यानंतर शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, स्वातंत्र्याच्या चळवळीत अत्यंत मोलाचे योगदान देणारा आणि स्वातंत्र्यां नंतर सातारा जिल्ह्यातील अनेकांनी आपले योगदान दिले आहे.

यशवंतराव चव्हानांसारखी कर्तृत्वान लोक या जिल्ह्यात होऊन गेली. आणि त्यांच्या विचाराचा पगडा अजूनही या जिल्ह्यातील सामान्य लोकांमध्ये आहे. त्यामुळे साहजिकच आज देशात जे काही घडतंय त्याला पर्याय देण्याच्या दृष्टीने जे काही आमच्या इंडिया आघाडीच्या तर्फे प्रयत्न सुरु आहेत. याला प्रतिसाद देण्यात सातारा जिल्हा हा अग्रभागी आहे.

साताऱ्यात लोकांचा प्रतिसाद हा शशिकांत शिंदे यांना चांगला मिळत आहे. विरोधकांकडून शिंदे याच्यावर जे काही आरोप करण्यात आलेले आहेत. त्याबद्दल मी शिंदेंना सुचवले आहे कि तुम्ही पत्रकार परिषद घ्या. जे काही असेल ते सर्व लोकांसमोर ठेवा. तसेच आपलं नाणं खणखणीत आहे त्यामुळे आपल्याला आता याबाबत चिंता करण्याची काही कारण नाही. सातारचे लोक हे पुरोगामी विचारणा नेहमी पाठिंबा देतात. मागील वेळेस जी निवडणूक झाली त्यावेळी महाविकास आघाडी नव्हती सर्व लोकांचा, पक्षांनी पाठींबा दिला होता. मात्र, महाविकास आघाडी आहे. आणि सर्व ताकदीनिशी निवडणुकीच्या रिंगणात उतरली असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले.
सातारा जिल्ह्यात यशवंतराव चव्हाणांपासून अनेक कर्तृत्त्वान लोकांची फळी निर्माण झाली आहे. त्यांच्या विचारांचा पगडा आजही लोकांच्या मनावर आहे. हजारोंच्या संख्येने आज शशिकांत शिंदेंचा अर्ज भरण्यासाठी आले. देशातील लोकांना परिवर्तन हवं आहे. त्याचे पहिले पाऊल साताऱ्यातून टाकण्यात आले आहे. आमच्या लोकांचा आत्मविश्वास वाढवण्याचे काम सातारकारांनी केले असून सध्या मोदींची शक्ती कमी करणे देशाची गरज आहे, असे देखील शरद पवार यांनी यावेळी म्हंटले.


साताऱ्यात कोण? घड्याळ की कमळ ? आज होणार मुंबईत फैसला !

वेध माझा ऑनलाईन।
सातारा लोकसभा निवडणुक २०२४ साठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला अवघे चार दिवस उरले आहेत. दरम्यान, आज महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार शिंदे मोठ्या शक्ती प्रदर्शनाने आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मात्र, महायुतीच्या उमेदवाराचा तिढा सुटलेला नसल्याने मतदारांबरोबरच कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. अद्यापही सातारा महायुतीमध्ये अजितदादा गटाकडे कि भाजपकडे राहणार? याबाबत शंका उपस्थित केली जात असताना महायुतीची आज मुंबईत महत्वाची बैठक पार पडणार असून यात साताऱ्याची जागा अजित पवार गट की भाजपकडे जाणार तसेच उमेदवार कोण? यावर निर्णय होणार आहे.

सातारा लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर महायुतीतुन खासदार उदयनराजे भोसले यांनी दिल्लीवारी करून आल्यानंतर आपणच उमेदवार असणार असल्याचे सांगत प्रचारास सुरुवात देखील केली आहे. मात्र, महायुतीतील शिंदे गटाकडून पुरुषोत्तम जाधव तर भाजपकडून नरेंद्र पाटील या दोघांनी देखील उमेदवारी आपल्याला देण्यात यावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्याचबरोबर अजित पवार गटानेही ही जागा आपल्यालाच मिळावी, अशी आग्रही मागणी लावून धरली आहे.


त्यांच्याकडून नितीन पाटील यांचे नाव उमेदवारीसाठी आघाडीवर आहे. साताऱ्यातील उमेदवारीबाबत तिढा निर्माण झाल्याने पक्षश्रेठींकडून निर्णय दिला जात नाही. महाविकास आघाडीचा उमेदवार अर्ज भरण्यासाठी जात असून देखील अद्यापही महायुतीकडून उमेदवाराची घोषणा केली जात नसल्याने हा तिढा नेमका कसा सुटणार? याची चर्चा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात सुरु आहे.

दिल्लीत चार दिवस ठाण मांडल्यानंतर उदयनराजे साताऱ्यात आले. त्यावेळी त्यांच्या स्वागताचा मोठा कार्यक्रम पार पडला. हा कार्यक्रम झाल्यानंतर उदयनराजेंनी प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात केली. मतदारसंघातील बहुतांश गावांचा त्यांचा फेरा पूर्ण झाला आहे. त्यांच्याकडून उमेदवारी अर्जही नेण्यात आला आहे; परंतु आजही महायुतीच्या उमेदवारीचे कोडे सुटले नाही. महायुतीमध्ये सातारा हा राष्ट्रवादीचा मतदारसंघ समजला जातो. तो भाजपला हवा आहे. मात्र, अजित पवार गटाकडून हा मतदार संघ देण्यास नकार दिला जात असल्याचे सूत्रांकडून सागिंतले जात आहे.


आज मुंबईतील बैठकीत साताऱ्याच्या जागेवर तोडगा निघण्याची शक्यता?
नाशिक मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ला देण्यासाठी भाजप तयार आहे; परंतु या मतदारसंघातून हेमंत गोडसे हे एकनाथ शिंदे गटाचे विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे शिंदे गट नाशिकची जागा सोडण्यास तयार नाही. त्यामुळे महायुतीकडून अद्याप साताऱ्याच्या जागेवर तोडगा निघालेला नाही. मात्र, उमेदवारी अर्ज भरण्याला आता केवळ चार दिवस उरले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवाराला नियोजनही करावे लागणार आहे. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी महायुतीची आज मुंबईत बैठक होणार आहे. त्यामुळे साताऱ्याच्या जागेचा तोडगा निघेल, अशी आशा आहे

अखेर... ठरलंच !,विशाल पाटील अर्ज भरणार...!

वेध माझा ऑनलाईन। महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभेची  जागा शिवसेना ठाकरे गटाला गेल्यानंतर काँग्रेसकडून इच्छुक असलेले विशाल पाटील हे नाराज आहे. महाविकास आघाडीने पुनः एकदा सांगलीच्या जागेबाबत फेरविचार करावा आणि ही जागा काँग्रेसला सोडावी असे आवाहन विशाल पाटील यांनी केलं आहे तसेच अखेरपर्यंत सांगलीची जागा आपल्याला सुटेल आशा विशाल पाटील बाळगून आहेत. त्याच पार्श्वभूमीवर उद्या म्हणजेच १६ एप्रिलला विशाल पाटील काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज भरणार आहेत, मात्र जर अखेरच्या दिवशीही सांगलीची जागा ठाकरे गटालाच गेली तर मात्र पुन्हा विशाल पाटील अपक्ष अर्ज भरण्याची शक्यता आहे.

विशाल पाटील यांच्याऐवजी महाविकास आघाडीत चंद्रहार पाटलांना सांगली लोकसभेची जागा सुटल्यानंतर विशाल पाटील यांच्या समर्थकांनी आक्रमक भूमिका घेतली होती. कोणत्याही परिस्थितीत तुम्ही निवडणूक लढवा अशी कार्यकर्त्यांची मागणी होती. अखेर उद्या विशाल पाटील आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करताना विशाल पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून मोठं शक्तिप्रदर्शन केलं जाण्याची शक्यता आहे. गणपती मंदिर पासून काँग्रेस भवन पर्यंत रॅली काढून विशाल पाटील आपला उमेदवारी अर्ज भरतील. यावेळी जिल्हा काँग्रेस मधील नेतेमंडळी सुद्धा उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

विशाल पाटील हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू आहेत. सांगली जिल्ह्यात दादा घराण्याला मानणारा मोठा गट आहे तसेच परंपरागत सांगली लोकसभेची जागा ही काँग्रेसने लढवली आहे. मात्र महाविकास आघाडीच्या जागावाटपात सांगलीची जागा ठाकरे गटाला गेल्याने वादाची ठिणगी पडली. आयात विशाल पाटील यांनी जरी काँग्रेसकडून अर्ज भरला आणि त्याचा काहीही उपयोग झाला नाही तर ते पुन्हा एकदा अपक्ष अर्ज भरतील. असं झाल्यास महाविकास आघाडी आणि चंद्रहार पाटलांसाठी हा मोठा धक्का असेल.

साताऱ्याचे "तुतारी' चिन्हाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी "मुतारी'चा घोटाळा केला ; माथाडी नेते नरेंद्र पाटील यांचा घणाघात :

वेध माझा ऑनलाइन। माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी शशिकांत शिंदे  यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. “साताऱ्याच्या तुतारी चिन्हाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत मुतारीचा घोटाळा केला आहे. हि गोष्ट खूप लांच्छनास्पद आहे. आणि अशा व्यक्तीला उमेदवारी मिळते यावर आम्ही पवार साहेबांना काही बोलूच शकत नाही,” अशा शब्दात माथाडी नेते नरेंद्र पाटलांनी शिंदेंवर हल्लाबोल केला आहे.

माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी आज कराड येथे पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शशिकांत शिंदे यांनी पोटाच्या बेंबीच्या देठापासून मला विरोध केला होता. एका माथाडी चळवळीत आपण काम केल्यानंतर आजपर्यंत माझ्या कुटुंबीयांनी आणि आम्ही त्यांच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांच्या विजयाच्या दृष्टिकोनातून काम केले. शेवटचा विजय त्यांचा कोरेगाव मतदार संघातून झाला.
परंतु २०२९ ला त्यांनी आमच्या ज्या काही सहकार्यांना हाताशी धरून ज्या पद्धतीने आमच्या विरोधामध्ये जे काही कटकारस्थान केले. त्याचे रिटर्न गिफ़्ट म्हणून कुठे तरी देण्याची संधी मला यानिमित्ताने आलेली आहे. निवडणुकीचा अजून बराचसा काळ बाकी आहे. त्यानंतर एक एक उलगडा आपण त्यावेळेला करू, असा सूचक इशारा देखील यावेळेला नरेंद्र पाटील यांनी दिला.

 उमेदवारी मिळेल !  : नरेंद्र पाटील
यावेळी नरेंद्र पाटील यांनी साताऱ्यातुन महायुतीतून आपल्याला उमेदवारी मिळेल असा विश्वास देखील व्यक्त केला. भाजपकडून छत्रपती उदयनराजे भोसले, मी स्वतः, धैर्यशील कदम आणि अजून काही उमेदवार इच्छुक आहेत. मला विश्वास आहे कि देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे साताऱ्याच्या जनतेचा कौल घेऊन चांगला उमेदवार देतील, असे नरेंद्र पाटील यांनी यावेळी म्हंटले.



Sunday, April 14, 2024

वेध माझा ऑनलाइन।
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात येत आहे. अनेकजन डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवत आहेत. कराड तालुक्यातही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात येते.

कराडकरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी रात्री बारा वाजल्यापासूनच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी केली.रात्री बारा वाजल्यापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी कराड आणि आसपासच्या गावातील लोक उपस्थित राहत होते. तीच गर्दी सकाळीही दिसून आली.

कराडमध्ये लेखक,पत्रकार अभयकुमार देशमुख यांनी सुद्धा एक वेगळा उपक्रम राबवला. त्यांनी स्वतः लिहिलेल्या मुखिया, एल्गार, वी हेट बायोलॉजिकल वॉर, मसनवाट, व्यक्त अव्यक्त भाग १ या कादंबऱ्यांचा हार बाबासाहेबांना अर्पण करत अनोखं अभिवादन केलं.

यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समिती कराडचे अध्यक्ष राहुल भोसले, माजी नगरसेवक आनंदराव लादे तसेच समितीचे इतर सदस्य आणि विठ्ठलराव देशमुख, विक्रमसिंह देशमुख आणि  मान्यवरांची उपस्थिती होती.

शशिकांत शिंदे म्हणाले... तर मी उमेदवारी अर्ज भरणार नाही ; काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाइन
साताऱ्यामध्ये अद्याप महायुतीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. छत्रपती उदयनराजे भोसले हे दावेदार आहेत. असे असले तरी मविआकडून शरद पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र माझ्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपात दोषी आढळलो तर उमेदवारी अर्ज भरणार नसल्याचे आव्हान शिंदे यांनी महायुतीला दिले आहे.

कोरेगाव मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी शशिकांत शिंदे यांच्यावर वाशी येथील एपीएमसीच्या गाळे विक्रीत तब्बल ४००० कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. यावर शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदाराला आव्हान दिले आहे. 
मविआकडून मी उद्या अर्ज भरणार आहे. शरद पवार उपस्थित असणार असून लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामुळे विरोधक रडीचा डाव खेळत आहेत. मी सगळे पुरावे द्यायला तयार आहे. जर मी यात दोषी आढळलो तर उमेदवारी अर्ज भरणार नसल्याचे आव्हान शिंदे यांनी दिले आहे. 


शरद पवार यांचाही भाजपसोबत जाण्याचा विचार होता... 4 जूननंतर काहीही होऊ शकतं, ; अजितदादा गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांचे धक्कादायक विधान;

वेध माझा ऑनलाईन ।
माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचाही भाजपसोबत जाण्याचा विचार होता. राजकारणात 4 जूननंतर काहीही होऊ शकतं, असं अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले आहेत. पुण्यातील एका उद्योजकाच्या घरी बैठक झाली होती, अशी माहिती पटेलांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साथ देण्याची आमची सर्वांची भूमिका आहे, असंही प्रफुल्ल पटेल म्हणाले इतकंच नाहीतर शरद पवार यांना भाजपसोबत येण्याची 50 टक्के इच्छा होती, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले होते. त्यांच्या त्या वक्तव्यावर प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्टीकरण दिलं ते म्हणाले, आम्ही दोनवेळा शरद पवारांची भेट घेऊन चर्चा केली. त्यांना सोबत येण्याची विनंती केली. आम्ही पाया पडून त्यांचे आशीर्वाद मागितले. तुम्ही सोबत राहिले तर आम्हाला आनंद होईल. तुमच्या मार्गदर्शनामध्येच आम्ही काम करु इच्छित आहोत. त्यावेळेस मला तरी ते अनुकूल वाटले...

Breaking...

गोळीबाराच्या घटनेनंतर सलमान खानला मुख्यमंत्री शिंदेंचा फोन ; काय म्हणाले...

वेध माझा ऑनलाईन।अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली आहे. सलमान खानला अतिरिक्त सुरक्षा पुरविली जाणार आहे. त्याच्या घराबाहेरील सुरक्षासुद्धा वाढवली जाणार आहे. पोलिसांकडून युद्ध पातळीवर आरोपींचा शोध घेतला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही वेळेपूर्वीच फोनवरून सलमानशी बातचित केली. फोनवरून मुख्यमंत्र्यांनी घडलेल्या घटनेची माहिती घेतली आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांनी 15 ते 20 पथकं तयार केली आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी कैद झाले असून त्यांची ओळख पटवण्याचं काम पोलीस करत आहेत.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
दुसरीकडे या घटनेवरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे. गृहमंत्री काय करत आहेत, असा सवाल शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. गोळीबाराच्या घटनेवर बोलताना राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. त्याबाबतची माहिती आम्हाला मिळेल. आम्हाला जेव्हा अधिक माहिती मिळेल, तेव्हा आम्ही देऊ. यात अटकळबाज्या करण्यात अर्थ नाही.”

नितेश राणे यांची प्रतिक्रिया
“हे महाविकास आघाडीचं सरकार नाही, जिथे उद्योजकांच्या घरासमोर जिलेटीन ठेवणार आणि मग सचिन वाझे त्याचा हिस्सा होणार. असं व्हायला हे काही उद्धव ठाकरे यांचं सरकार नाही. आम्ही जनतेला विश्वास देऊ इच्छितो की राज्यातल्या प्रत्येक नागरिकांची सुरक्षिततेची जबाबदारी आमची आहे,” असं नितेश राणे म्हणाले.

Saturday, April 13, 2024

बँकेत न जाता... घरी बसूनच काढा पैसे...ते कसे? वाचा बातमी...

वेध माझा ऑनलाईन
अनेकवेळा आपल्याला इमर्जन्सी कॅश पैशाची गरज लागते. परंतु आपल्याला जर पैसे काढायचे असेल, तर आपल्याला एक तर बँकेमध्ये जावे लागते, किंवा एटीएममध्ये जावे लागते. परंतु जर आपल्याला बँकेत किंवा एटीएम मध्ये जायला वेळ नसेल, तर आपल्याला पैसे काढता येणार नाही. परंतु आता तुम्हाला पैसे काढण्यासाठी बँकेची एटीएममध्ये जाण्याची गरज नाही. कारण आता घरबसल्या हे पैसे एटीएमद्वारे तुम्हाला मिळणार आहे. ही नवीन योजना पोस्ट ऑफिसने सुरु केलेली आहे.

इंडियन पोस्ट पेमेंट बँकेची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलेले आहे की, “जर तुम्हाला पैशाची तात्काळ गरज भासली आणि तुमच्याकडे बँकेत जाण्यासाठी वेळ नसेल, तर काळजी करण्याची गरज नाही. कारण आता आम्ही आधार एटीएम एईपीएस या सेवेचा वापर करून तुम्ही घरबसल्या पैसे काढता काढू शकता. पोस्ट मास्टर आता तुमच्या घरी येऊन तुम्हाला पैसे  काढण्यास मदत करेल.

आधार आधारित या पेमेंट बँक प्रक्रियेद्वारे एखादी व्यक्ती त्याच्या बायोमेट्रिक्सचा वापर करून रोख रक्कम काढू शकते. किंवा आधार लिंक केलेल्या खात्यातून पेमेंट करू शकते. एटीएम किंवा बँकेला भेट न देता एईपीएस वापरून ग्राहक छोटी रक्कम काढू शकतात. त्यामुळे तुमचा वेळ वाचेल. यासाठी तुमचे आधार तुमच्या बँक खात्यात लिंक करणे गरजेचे आहे.

दात पडलेला वाघ लोकांना नकोय; किशोरी पेडणेकरांची राज ठाकरेंवर बोचरी टीका

वेध माझा ऑनलाईन ।
 मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि महायुतीला लोकसभा निवडणुकीत बिनशर्त पाठिंबा देण्याची घोषणा केल्यानंतर राजकीय वर्तुळात त्याचे पडसाद उमटत आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या मुद्द्यावरुन राज ठाकरे यांच्याविरोधात रान उठवले आहे. राज ठाकरे हे भाजपच्या दबावासमोर झुकले, असा प्रचार मविआच्या नेत्यांकडून केला जात आहे. अशातच आता ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी राज ठाकरे यांच्यावर अत्यंत बोचरी टीका केली आहे. राज ठाकरे म्हणजे शक्तीहीन झालेला वाघ आहे. असा वाघ लोकांना नकोय, असे वक्तव्य किशोरी पेडणेकर यांनी केले. त्या शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. 

यावेळी किशोरी पेडणेकर यांनी राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर पुन्हा पत्रकार परिषद घेण्याची गरजच काय होती? राज ठाकरे म्हणतात, इतर पक्ष निवडून आल्यावर त्यांच्या भूमिका बदलू शकतात, मग मी का बदलू नये? पण राज ठाकरे पक्ष स्थापन झाल्यापासून सातत्याने भूमिका बदलत आहेत. 2019 मध्ये त्यांची 'लाव रे तो व्हीडिओ' ही टॅगलाईन लोकप्रिय झाली होती. पण राज ठाकरे यांनी नंतर त्यांची भूमिका बदलली. एवढंच कशाला पक्ष झाल्यापासून राज ठाकरे यांच्या पक्षाचा झेंडाही अनेकदा बदलला. आधी निळा, मग हिरवा, त्यानंतर थोडासा भगवा, असे करत राज ठाकरे यांनी अनेक झेंडे बदलले. त्यामुळे असा दात निघालेला, नखं काढलेला, शक्तीहीन आणि नुसता तोंडाने हवा मारणारा वाघ लोकांना नको आहे, असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले.

दहावी, 12 वी चा निकाल कधी लागणार ? वाचा बातमी...

वेध माझा ऑनलाईन।यावर्षी दहावी आणि बारावीची परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी सगळ्या परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे लावणे बंधनकारक केलेले होते. आता याच पार्श्वभूमीवर जुलै महिन्यामध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळकडून दहावी बारावीच्या प्रत्येक परीक्षा केंद्राची तपासणी केली जाणार आहे.

त्या परीक्षा केंद्रावरचे सगळे सीसीटीव्ही कॅमेरे चालू आहे का? त्याला बॅकअप आहे का? याची पडताळणी देखील होणार आहे. ज्या परीक्षा केंद्र बोर्डाच्या आदेशानुसार सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार नाहीत. तेथील केंद्राची मान्यता देखील रद्द केली जाणार आहे.

यावर्षी सीबीएससी बोर्डाने देखील दहावीच्या परीक्षेसाठी बेस्ट ऑफ फाईव्हची पद्धत सुरू केलेली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने हा फॉर्मुला अवलंबला आहे. आता ओपनबुक परीक्षा पद्धती अंमल अवलंबण्याची सीबीएससी बोर्डाची तयारी आहे.

या नवीन पद्धतीमुळे कॉपी करण्याच्या प्रकाराला कायमस्वरूपीचा आळा बसणार आहे. असा विश्वास या निर्णया मागे असणार आहे. त्याचप्रमाणे परीक्षांचे स्वरूप देखील बदलणार आहे. सेमिस्टर पद्धतीने ही परीक्षा होऊ शकते, असे शिक्षक तज्ञांनी सांगितलेले आहे.

इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा संपल्यानंतर त्यांच्या उत्तर पत्रिकांची तपासणी चालली आहे. आतापर्यंत या दोन्ही वर्गाच्या 85 टक्के उत्तरपत्रिका तपासून पूर्ण झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण शाळांनी ऑनलाईन पद्धतीने बोर्डाला देखील पाठवलेले आहे. दरवर्षी आपण पाहिले तर बारावीचा बोर्डाचा निकाल हा जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होतो. तर दहावीच्या बोर्डाचा निकाल हा दुसऱ्या आठवड्यात जाहीर होतो. परंतु आता यावर्षी दहावी आणि बारावीचे निकाल हे 5 जून पूर्वीच लागणार आहे.

Friday, April 12, 2024

काँग्रेस अल्पसंख्याक पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी झाकीर पठाण यांची निवड

वेध माझा ऑनलाईन। सातारा जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष झाकीर पठाण यांची अल्पसंख्याक सेलच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.अल्पसंख्यांक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार इम्रान प्रतापगडी यांनी ही निवड केली असून याबाबतचे पत्र झाकीर पठाण यांना देण्यात आले आहे.
 
झाकीर पठाण हे गेली 35 वर्षे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष म्हणून संधी देण्यात आली होती. त्यांच्या संघटन कौशल्याची दखल घेत राष्ट्रीय काँग्रेसचे अल्पसंख्यांक विभाग उपाध्यक्ष व महाराष्ट्र अल्पसंख्याक विभागाचे प्रभारी माननीय मोहम्मद अहमद खान यांच्याकडे महाराष्ट्र काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष मा. आमदार वजहद मिर्झा यांनी त्यांना पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष करण्याकरिता शिफारस केली होती त्यांच्यावर आता पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
 या निवडीबद्दल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार इम्रान प्रतापगडी ,आमदार वझाजात मिर्झा, मा. आमदार एम एम शैख, मा.आमदार मुझफर हुसैन, डॉ सुरेश जाधव, रणजितसिंह देशमुख, संजय तडाखे , राहुल काळोखे, रजिया शेख,इचलकरंजीचे नगर सेवक इम्रान मकानदार यांच्यासह काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले.

सांगली लोकसभेसाठी काँग्रेसचे विशाल पाटील बंडाच्या तयारीत ; पक्ष कार्यालयावरील काँग्रेस शब्द पुसून टाकला :

वेध माझा ऑनलाईन ।
महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभेची  जागा ठाकरे गटाला गेल्यानंतर काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील हे नाराज असून बंडाच्या तयारीत आहेत. विशाल पाटील यांच्या समर्थकांकडून मिरज तालुका काँग्रेस कमिटी बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तसेच सांगलीतील पक्ष कार्यालयावरील काँग्रेस शब्द पुसून टाकला आहे. त्यामुळे सांगली लोकसभेसाठी विशाल पाटील अपक्ष लढण्याची शक्यता जोर धरत आहे.

२ दिवसांपूर्वीच विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांनी सांगलीच्या जागेबाबत फेरविचार करण्यात यावा असे आवाहन महाविकास आघाडीच्या नेत्यांना केलं होते. त्यानंतर आज सांगलीमध्ये काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची तालुका न्याय बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये विशाल पाटील यांनी सांगली लोकसभा निवडणूक लढवावी अशी आग्रहाची मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली. एवढंच नव्हे तर कवठे महांकाळ, मिरत तालुक्याच्या कार्यकर्त्यांनी थेट राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे. तर मिरज तालुक्याची काँग्रेसची कमिटी बरखास्त करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यात काँग्रेसचं नाव घ्यायचं नाही, अशी भूमिका आता काँग्रेस कार्यकर्ते घेत आहेत. या घडामोडींनंतर आता विशाल पाटील अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत का? अशा चर्चांना उधाण आलंय.

महत्वाची बाब म्हणजे विशाल पाटील यांच्या समर्थकांकडून उमेदवारीचे २ अर्ज घेण्यात आले आहेत. त्यामुळे विशाल पाटील बंड करून अपक्ष निवडणूक लढवणार हे जवळपास नक्की वाटत आहे. विशाल पाटील अपक्ष लढल्यास काँग्रेस हायकमांड काय भूमिका घेणार?? विशाल पाटील यांच्यावर कारवाई करणार का? हे पाहणे महत्वाचे ठरेल. 

बारामतीत पवार विरुद्ध पवार रंगला सामना ; शरद पवार म्हणाले...सुनेत्रा पवार या मूळ पवार नाहीत ; बारामतीत वातावरण तापणार ;

वेध माझा ऑनलाईन ।बारामतीमध्ये पवार विरूद्ध पवार अशी सुरू असणारी लढाई आता ओरिजनल पवार यांच्यापर्यंत येऊन पोहोचली आहे. लेकीला निवडून दिलं आता सूनेला निवडून द्या, असं आवाहन अजित पवार यांनी बारामतीकरांना केलं होतं. यावरून सुनेत्रा पवार या मूळ पवार नाही असं वक्तव्य शरद पवार यांनी केलंय. इतकंच नाहीतर सुनेत्रा पवार मूळ पवार नसून त्या बाहेरच्या असल्याचे म्हटलंय. मूळ पवारांमध्ये फरक असंच विधान शरद पवारांनी केलंय. सुनेत्रा पवार या लोकसभेच्या बारामतीतील उमेदवार असून त्या अजित पवारांच्या पत्नी आहेत. सुनेत्रा पवार या मूळच्या धाराशीवच्या तेर गावच्या आहेत. मोठ्या राजकीय घराण्यातील आहे. आणि पद्मसिंह पाटलांच्या त्या बहिण आहेत. सुनेत्रा पवार यांचं वडिलांकडील नाव सुनेत्रा बाजीराव पाटील आणि आई द्रौपदी पाटील आहे. म्हणजेच लग्नानंतर सुनेत्रा पाटील या लग्नानंतर सुनेत्रा पवार झाल्यात. त्यामुळे अजित पवार यांनी सुनेत्रा निवडून द्या म्हणताच शरद पवार यांनी मूळ पवारचा मुद्दा उपस्थित केला ... एकूणच या सर्व घडामोडींमुळे बारामतीत वातावरण तापणार असच आता दिसू लागलय...

अभिनेते सयाजी शिंदे साताऱ्यातील रुग्णालयात दाखल ; पार पडली तातडीची हृदय शस्त्रक्रिया ; काय आहे बातमी...?


वेध माझा ऑनलाईन।
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते सयाजी शिंदे यांच्या प्रकृतीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर त्यांच्या हृदयावर तातडीने शस्त्रक्रिया पार पडल्याचे समोर आले आहे. दिनांक ११ एप्रिल २०२४ रोजी अचानक छातीत त्रास जाणवू लागल्याने सयाजी यांना साताऱ्यातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर डॉक्टरांनी तातडीने त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्याचे सुचविले आणि ही शस्त्रक्रिया पार पडली.

अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर नुकतीच अँजिओप्लास्टी सर्जरी पार पडली आहे. यानंतर त्यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांकडून माहिती देण्यात आली आहे. माहितीनुसार, सयाजी शिंदे यांच्यावर साताऱ्यातील प्रतिभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर डॉ. सोमनाथ साबळे यांच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहेत.

Thursday, April 11, 2024

मी कोणाचेही आव्हान मानत नाही ; शशिकांत शिंदेंनी उदयनराजे यांचे नाव न घेता फोडली डरकाळी ;

वेध माझा ऑनलाईन।
खासदार श्रीनिवास पाटील व त्यांचे चिरंजीव सारंग पाटील यांना राष्ट्रवादी ने लोकसभा उमेदवार म्हणून साताऱ्यातून नाकारले त्यानंतर बऱ्याच गॅपने शशिकांत शिंदे यांची उमेदवारी याठिकाणी जाहीर झाली ... अशातच त्यांच्यासमोर उदयनराजे यांचे या निवडणुकीत आव्हान असणार आहे याबाबत शशिकांत शिंदे यांना विचारले असता... शशिकांत शिंदे म्हणाले... माझ्या समोर कोणाचेही आव्हान आहे असे मी मानत नाही... माझी उमेदवारी कोणत्या उमेदवाराशी किंवा व्यक्ती विरोधात नाही, तर तत्वाशी आहे... मी 24 तास काम करणारा कार्यकर्ता आहे...श्रीनिवास पाटील यांची उमेदवारी रद्द झाल्यानंतर मला पक्षाने लढायला सांगितले...पक्ष आणि नेता अडचणीत असताना मी लढायला उतरलो आहे... ही निवडणूक लोकांनी हातात घेतली आहे...आता जिल्हाच ठरवेल की इथल्या लोकांना खासदार म्हणून कोण पाहिजे ते...

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षाची सातारा लोकसभेसाठीची उमेदवारी आमदार शशिकांत शिंदे यांना नुकतीच जाहीर झाली आहे त्यानंतर आज ते कराड येथील स्व यशवन्तराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते 

आमदार बाळासाहेब पाटील, पाटण राष्ट्रवादीचे नेते सत्यजित पाटणकर, काँग्रेस नेते ऍड उदयसिंह पाटील, शिवराज मोरे , शिवसेना जिल्हाप्रमुख हर्षद कदम समनवयक इंद्रजित गुजर राष्ट्रवादी युवकचे पोपटराव साळुंखे ,प्रशांत यादव जयंत बेडेकर तसेच लोकशाही आघाडी चे आजी माजी नगरसेवक महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

यावेळी बोलताना शशिकांत शिंदे पुढे म्हणाले...हा जिल्हा यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा  आहे याठिकाणी कधीही जातीयवादाची बीजे येथील जनतेने पेरून दिलेली नाहीत याहीवेळी इथली जनता जातीयवादी प्रवृत्तीला थारा देणार नाही पवार साहेबांना हा जिल्हा मानतो... जनतेचा प्रतिनिधी म्हणून मला उमेदवारी मिळाली आहे... मला कोणाचेही आव्हान नाही... मी लढवैय्या नेते शरद पवार यांचा कार्यकर्ता आहे मी जनतेसाठी 24 तास काम करणारा कार्यकर्ता आहे विरोधकांनी खोट्या केसेस घालून विनाकारण त्रास देण्याचे राजकारण करून रडीचा डाव खेळू नये...विरोधकांनी लोकशाही मार्गाने निवडणुकीला सामोरे जावे...लोकांच्या मध्ये महायुतीच्या विरोधात सुप्त लाट आहे...त्यांच्या हुकूमशाही पद्धतीला जनता थारा देणार नाही...

रेंद्र पाटील माथाडी नेते आहेत त्यांची पक्षाची भूमिका व माझी भूमिका वेगळी आहे यापूर्वी  आम्ही कोणत्याही व्यासपीठावर असलो तरी  माथाडी म्हणून एकत्र असायचो...पण भाजपने राजकीय पक्षाप्रमाणे आता आमच्यातही फाटाफूट केली आहे...माथाडी लोकांचा शरद पवारांवर विश्वास आहे... आणि मीही त्यांच्याबाबत चांगले काम केले आहे, त्यामुळे माथाडी मतदार माझ्या पाठीशी ठाम राहील याचा मला विश्वास वाटतो...आमदार महेश शिंदे यांच्या डोक्यात या अडीच वर्षात हवा गेली आहे लवकरच ती हवा लोकं त्यांच्या डोक्यातून काढतील... त्यांच्या कार्यपद्धतीवर जनतेची खूप नाराजी आहे असेही ते यावेळी म्हणाले

दरम्यान शशिकांत शिंदे यांची आज भर दुपारच्या उन्हात कराडच्या कोल्हापूर नाक्यावर गाड्यांच्या ताफ्यासह एन्ट्री झाली... यावेळी आमदार बाळासाहेब पाटील व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी त्यांचे फटाक्यांची आतिषबाजी करत जोरदार स्वागत केलं तसेच याठिकाणी घोषणाबाजी देखील करण्यात आली महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला त्याठिकाणी अभिवादन करण्यात आलं

Wednesday, April 10, 2024

भाजपची 10 वी उमेदवार यादी जाहीर ; उदयनराजे यांचे यादीत नाव नाही...जिल्ह्यात चर्चेला उधाण ;

वेध माझा ऑनलाइन। बुधवारी भाजपकडून लोकसभा उमेदवारांची दहावी यादी जाहीर करण्यात आली आहे. परंतु या यादीमध्ये सुद्धा साताऱ्यातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले उदयनराजे यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे आता पुढील यादीत उदयनराजे भोसले यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात येईल की नाही? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या भाजपकडून आज जाहीर झालेल्या यादीत नाव उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये नेमक्या कोणत्या नेत्यांचा समावेश आहे हे पाहुयात.

भाजपची दहावी यादी...
चंदीगड – संजय टंडन

मैनपुरी – जयवीर सिंह ठाकूर


कौशांबी – विनोद सोनकर

फुलपूर – प्रवीण पटेल


इलाहाबाद – नीरज त्रिपाठी

बलिया– नीरज शेखर


मछलीशहर – बी.पी.सरोज

गाजीपूर – पारस नाथ राय

आसनसोल – एस. एस. अहलुवालिया

यादीत उदयनराजेंचे नाव नाही
भाजपने आज उमेदवारांची दहावी यादी जाहीर केली असली तरी या यादीत सातारा मतदारसंघाचा सस्पेन्स कायम ठेवला आहे. विशेष म्हणजे, सातारा मतदारसंघासाठी भाजपकडून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्यात येईल, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. परंतु आज दहावी यादी जाहीर करून देखील उदयनराजे यांचे नाव समोर आलेले नाही. त्यामुळे भाजप नेमकी काय खेळी खेळत आहे, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.