आपल्या मतदारसंघात इंडिया आघाडीकडून उमेदवारी देण्यात आलेले आमदार शशिकांत शिंदे हे यशवंत विचार जपणारे, कामगारांसाठीचे लढवय्या नेतृत्व आहे असे सांगत कराड ही यशवंत विचाराची भूमी आहे. त्यामुळे आपल्यावर मोठी जबाबदारी आहे. ती ओळखून या निवडणुकीत इंडिया आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचे चिन्ह घराघरापर्यंत पोहोचवून त्यांना विजयी करूया.असे आवाहन आ बाळासाहेब पाटील यांनी केले
45 सातारा लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांच्या निवडणूक प्रचारार्थ आमदार बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली कराड शहरातील यशवंत विचारांच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत आमदार बाळासाहेब पाटील बोलत होते.
आमदार बाळासाहेब पाटील म्हणाले,
सातारा लोकसभा मतदारसंघात इंडिया आघाडीच्यावतीने उमेदवारीसाठी सर्वे घेण्यात आला. त्यानंतर मला इथल्या उमेदवारीबद्दल विचारण्यात आले होते मात्र सह्याद्री साखर कारखान्याचा विस्तार आणि सहप्रकल्पाची कामे आपण हाती घेतली असल्याने मी उमेदवारीसाठी इच्छुक नसल्याचे सांगितले. त्यानंतर आ. शशिकांत शिंदे यांचे नाव पुढे आले आणि त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. शशिकांत शिंदे यांनी पूर्वीच्या जावली मतदारसंघाचे आणि त्यानंतर कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी मंत्री म्हणून ही काम केले आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना चांगला अनुभव आहे. त्यांचा मुंबईत राहणाऱ्या सातारकरांशी चांगला संपर्क आहे, हा कामगारासाठी लढणारा लढवय्या नेता असून यशवंत विचार जोपासणारे नेतृत्व आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघात कराड उत्तर मधून मी स्वतः आणि दक्षिण मधून पृथ्वीराज चव्हाण बाबा असे आम्ही दोघे इंडिया आघाडीचे आमदार आहोत, तर इतर मतदारसंघात विरोधी आमदार आहेत तरीही भाजप विरोधात त्याठिकाणी मतदारांमध्ये सुप्त लाट आहे आपल्या उमेदवाराला जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी कार्यकर्त्यांनी तत्पर रहावे, असे आवाहन आमदार बाळासाहेब पाटील यांनी यावेळी केले.
सौरभ पाटील म्हणाले
ही निवडणूक सत्ताधारी विरुद्ध भारतीय लोक अशी होत आहे शशिकांत शिंदे यांचा परिचय हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवत त्यांचे चिन्ह देखील सर्व मतदारांपर्यत पोहोचवणे आपली जबाबदारी आहे त्यासाठी आपण स्वतःच उमेदवार आहोत या भावनेने आपल्याला या निवडणुकीला सामोरे जायचं आहे आपला विजय निश्चित आहे याबद्दल खात्री बाळगा
नंदकुमार बटाणे यांनी प्रास्ताविक केले तर माजी नगरसेवक शिवाजी पवार यांनी आभार मानले.
यावेळी माजी नगराध्यक्ष जयवंत पाटील, माजी नगराध्यक्षा ऍड विद्याराणी साळुंखे, ऍड सतीश पाटील,माजी उपनगराध्यक्ष सुभाषराव डुबल, सुभाषराव पाटील, माजी नगरसेवक अरुण जाधव, कांतीलाल शेठ, मझहरभाई कागदी, जयंतकाका पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment