Saturday, April 13, 2024

दहावी, 12 वी चा निकाल कधी लागणार ? वाचा बातमी...

वेध माझा ऑनलाईन।यावर्षी दहावी आणि बारावीची परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी सगळ्या परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे लावणे बंधनकारक केलेले होते. आता याच पार्श्वभूमीवर जुलै महिन्यामध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळकडून दहावी बारावीच्या प्रत्येक परीक्षा केंद्राची तपासणी केली जाणार आहे.

त्या परीक्षा केंद्रावरचे सगळे सीसीटीव्ही कॅमेरे चालू आहे का? त्याला बॅकअप आहे का? याची पडताळणी देखील होणार आहे. ज्या परीक्षा केंद्र बोर्डाच्या आदेशानुसार सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार नाहीत. तेथील केंद्राची मान्यता देखील रद्द केली जाणार आहे.

यावर्षी सीबीएससी बोर्डाने देखील दहावीच्या परीक्षेसाठी बेस्ट ऑफ फाईव्हची पद्धत सुरू केलेली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने हा फॉर्मुला अवलंबला आहे. आता ओपनबुक परीक्षा पद्धती अंमल अवलंबण्याची सीबीएससी बोर्डाची तयारी आहे.

या नवीन पद्धतीमुळे कॉपी करण्याच्या प्रकाराला कायमस्वरूपीचा आळा बसणार आहे. असा विश्वास या निर्णया मागे असणार आहे. त्याचप्रमाणे परीक्षांचे स्वरूप देखील बदलणार आहे. सेमिस्टर पद्धतीने ही परीक्षा होऊ शकते, असे शिक्षक तज्ञांनी सांगितलेले आहे.

इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा संपल्यानंतर त्यांच्या उत्तर पत्रिकांची तपासणी चालली आहे. आतापर्यंत या दोन्ही वर्गाच्या 85 टक्के उत्तरपत्रिका तपासून पूर्ण झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण शाळांनी ऑनलाईन पद्धतीने बोर्डाला देखील पाठवलेले आहे. दरवर्षी आपण पाहिले तर बारावीचा बोर्डाचा निकाल हा जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होतो. तर दहावीच्या बोर्डाचा निकाल हा दुसऱ्या आठवड्यात जाहीर होतो. परंतु आता यावर्षी दहावी आणि बारावीचे निकाल हे 5 जून पूर्वीच लागणार आहे.

No comments:

Post a Comment