वेध माझा ऑनलाइन। कराड येथील शिवाजीनगर हौसिंग सोसायटी येथे चोरी करणाऱ्या दोघा चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखा सातारा व कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने सातारा येथून ताब्यात घेतले. निलेश शामराव गाढवे ,रमेश महादेव कुंभार अशी पोलिसांनी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार
कराडातील शिवाजीनगर हौसिंग सोसायटी येथे चोरट्यांनी घराची खिडकी उचकटून 38 लाख रूपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून काही दिवसांपूर्वी नेले होते. याबाबत कराड शहर पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली होती. त्यानंतर पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, डीवायएसपी अमोल ठाकूर यांनी घटनास्थळी भेट देऊन या गुन्ह्यातील आरोपीबांबत माहिती प्राप्त करून गुन्हा उघड करण्याच्या सूचना दिल्या होत्या
त्याप्रमाणे तपास केला तेव्हा सदरचे वाहन पोलीस रेकार्डवरील रमेश कुंभार याचे असल्याचे निष्पन्न झाले रमेशच्या घराच्या आजूबाजूच्या परिसरात वेषांतर करून पोलीस चार दिवस पाळत ठेवून होते.
त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रमेश कुंभार व त्याचे सोबत असणारा निलेश गाढवे या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून तपास केला असता त्यांनी चोरी केल्याचे कबूल केले. पोलिसांनी चोरीस गेलेले 52 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, चोरीसाठी वापरलेली गाडी असा एकूण 42 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
No comments:
Post a Comment