वेध माझा ऑनलाइन। बुधवारी भाजपकडून लोकसभा उमेदवारांची दहावी यादी जाहीर करण्यात आली आहे. परंतु या यादीमध्ये सुद्धा साताऱ्यातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले उदयनराजे यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे आता पुढील यादीत उदयनराजे भोसले यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात येईल की नाही? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या भाजपकडून आज जाहीर झालेल्या यादीत नाव उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये नेमक्या कोणत्या नेत्यांचा समावेश आहे हे पाहुयात.
भाजपची दहावी यादी...
चंदीगड – संजय टंडन
मैनपुरी – जयवीर सिंह ठाकूर
कौशांबी – विनोद सोनकर
फुलपूर – प्रवीण पटेल
इलाहाबाद – नीरज त्रिपाठी
बलिया– नीरज शेखर
मछलीशहर – बी.पी.सरोज
गाजीपूर – पारस नाथ राय
आसनसोल – एस. एस. अहलुवालिया
यादीत उदयनराजेंचे नाव नाही
भाजपने आज उमेदवारांची दहावी यादी जाहीर केली असली तरी या यादीत सातारा मतदारसंघाचा सस्पेन्स कायम ठेवला आहे. विशेष म्हणजे, सातारा मतदारसंघासाठी भाजपकडून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्यात येईल, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. परंतु आज दहावी यादी जाहीर करून देखील उदयनराजे यांचे नाव समोर आलेले नाही. त्यामुळे भाजप नेमकी काय खेळी खेळत आहे, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
No comments:
Post a Comment