Thursday, April 11, 2024

मी कोणाचेही आव्हान मानत नाही ; शशिकांत शिंदेंनी उदयनराजे यांचे नाव न घेता फोडली डरकाळी ;

वेध माझा ऑनलाईन।
खासदार श्रीनिवास पाटील व त्यांचे चिरंजीव सारंग पाटील यांना राष्ट्रवादी ने लोकसभा उमेदवार म्हणून साताऱ्यातून नाकारले त्यानंतर बऱ्याच गॅपने शशिकांत शिंदे यांची उमेदवारी याठिकाणी जाहीर झाली ... अशातच त्यांच्यासमोर उदयनराजे यांचे या निवडणुकीत आव्हान असणार आहे याबाबत शशिकांत शिंदे यांना विचारले असता... शशिकांत शिंदे म्हणाले... माझ्या समोर कोणाचेही आव्हान आहे असे मी मानत नाही... माझी उमेदवारी कोणत्या उमेदवाराशी किंवा व्यक्ती विरोधात नाही, तर तत्वाशी आहे... मी 24 तास काम करणारा कार्यकर्ता आहे...श्रीनिवास पाटील यांची उमेदवारी रद्द झाल्यानंतर मला पक्षाने लढायला सांगितले...पक्ष आणि नेता अडचणीत असताना मी लढायला उतरलो आहे... ही निवडणूक लोकांनी हातात घेतली आहे...आता जिल्हाच ठरवेल की इथल्या लोकांना खासदार म्हणून कोण पाहिजे ते...

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षाची सातारा लोकसभेसाठीची उमेदवारी आमदार शशिकांत शिंदे यांना नुकतीच जाहीर झाली आहे त्यानंतर आज ते कराड येथील स्व यशवन्तराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते 

आमदार बाळासाहेब पाटील, पाटण राष्ट्रवादीचे नेते सत्यजित पाटणकर, काँग्रेस नेते ऍड उदयसिंह पाटील, शिवराज मोरे , शिवसेना जिल्हाप्रमुख हर्षद कदम समनवयक इंद्रजित गुजर राष्ट्रवादी युवकचे पोपटराव साळुंखे ,प्रशांत यादव जयंत बेडेकर तसेच लोकशाही आघाडी चे आजी माजी नगरसेवक महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

यावेळी बोलताना शशिकांत शिंदे पुढे म्हणाले...हा जिल्हा यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा  आहे याठिकाणी कधीही जातीयवादाची बीजे येथील जनतेने पेरून दिलेली नाहीत याहीवेळी इथली जनता जातीयवादी प्रवृत्तीला थारा देणार नाही पवार साहेबांना हा जिल्हा मानतो... जनतेचा प्रतिनिधी म्हणून मला उमेदवारी मिळाली आहे... मला कोणाचेही आव्हान नाही... मी लढवैय्या नेते शरद पवार यांचा कार्यकर्ता आहे मी जनतेसाठी 24 तास काम करणारा कार्यकर्ता आहे विरोधकांनी खोट्या केसेस घालून विनाकारण त्रास देण्याचे राजकारण करून रडीचा डाव खेळू नये...विरोधकांनी लोकशाही मार्गाने निवडणुकीला सामोरे जावे...लोकांच्या मध्ये महायुतीच्या विरोधात सुप्त लाट आहे...त्यांच्या हुकूमशाही पद्धतीला जनता थारा देणार नाही...

रेंद्र पाटील माथाडी नेते आहेत त्यांची पक्षाची भूमिका व माझी भूमिका वेगळी आहे यापूर्वी  आम्ही कोणत्याही व्यासपीठावर असलो तरी  माथाडी म्हणून एकत्र असायचो...पण भाजपने राजकीय पक्षाप्रमाणे आता आमच्यातही फाटाफूट केली आहे...माथाडी लोकांचा शरद पवारांवर विश्वास आहे... आणि मीही त्यांच्याबाबत चांगले काम केले आहे, त्यामुळे माथाडी मतदार माझ्या पाठीशी ठाम राहील याचा मला विश्वास वाटतो...आमदार महेश शिंदे यांच्या डोक्यात या अडीच वर्षात हवा गेली आहे लवकरच ती हवा लोकं त्यांच्या डोक्यातून काढतील... त्यांच्या कार्यपद्धतीवर जनतेची खूप नाराजी आहे असेही ते यावेळी म्हणाले

दरम्यान शशिकांत शिंदे यांची आज भर दुपारच्या उन्हात कराडच्या कोल्हापूर नाक्यावर गाड्यांच्या ताफ्यासह एन्ट्री झाली... यावेळी आमदार बाळासाहेब पाटील व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी त्यांचे फटाक्यांची आतिषबाजी करत जोरदार स्वागत केलं तसेच याठिकाणी घोषणाबाजी देखील करण्यात आली महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला त्याठिकाणी अभिवादन करण्यात आलं

No comments:

Post a Comment