राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरदचंद्र पवार हे आज शनिवार दिनांक २७ एप्रिल २०२४ रोजी सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. सातारा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची आज शनिवारी दुपारी ३ वा. पाटण येथील जुन्या ग्रामपंचायत मैदानावर जाहीर सभा होणार आहे अशी माहिती पाटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष राजाभाऊ शेलार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
प्रसिद्धी पत्रकात पुढे दिलेल्या माहितीनुसार या सभेला राज्याचे माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण, माजी खासदार श्री. श्रीनिवास पाटील, पक्षाचे जेष्ठ नेते व माजी मंत्री श्री.विक्रमसिंह पाटणकर, माजी मंत्री आ.श्री.बाळासाहेब पाटील, उ.बा.ठा.शिवसेना उपनेते नितीन बानुगडे, सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्री.आ.शशिकांत शिंदे, सातारा जिल्हा मध्य. सह. बँकेचे संचालक श्री.सत्यजितसिंह पाटणकर (दादा),श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ.भारत पाटणकर, रयत सहकारी साखर कारखाने चेअरमन श्री.उदयसिंह पाटील -उंडाळकर, उ.बा.ठा.शिवसेना सातारा जिल्हा अध्यक्ष श्री.हर्षद उर्फ भानुप्रताप कदम, राष्ट्रीय काँग्रेसचे प्रांतिक प्रतिनिधी श्री.हिंदुराव पाटील त्याचबरोबर महाविकास आघाडीतील मित्रपक्षांचे सर्व जिल्हा अध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्ष, राष्ट्रीय कॉंग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, श्रमिक मुक्ती दल, शेकाप आणि महाविकास आघाडीतील घटक मित्र पक्षांच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहनही या पत्रकात केले आहे.
No comments:
Post a Comment