माझ्यावर भ्रष्टाचाराची खोटी केस टाकली आहे असं माझ्यावर आरोप करणारे नरेंद्र पाटीलच यापूर्वी म्हणत होते...आता ते दुसरंच बोलतायत...असो... त्यांना आता कोणीतरी तसे बोलायला सांगितलेलं दिसतय... पण जर मी माझ्यावर केलेल्या या केसबद्दल जामीन घेतला नसता तर...मला ईडी सारख्या केसमध्ये भाजपने अडकवले असते... मी महाविकास आघाडीचा कट्टर प्रचारक आहे, मी लोकसभेला उभे राहू नये म्हणूनच माझ्यावर केस केल्याची खेळी केली असल्याचे सूतोवाच सातारा लोकसभेचे शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी कराडात संगम हॉटेल याठिकाणी माध्यमांशी बोलताना केले
काँग्रेसचे दोन वेगवेगळे मेळावे होत आहेत का ? याचा अर्थ महाविकास आघाडीत एकवाक्यता नाही का?या पत्रकारांच्या प्रश्नावर शिंदे म्हणाले...एक रयत संघटनेचा तर दुसरा काँग्रेसचा कार्यक्रम होत आहे...याठिकाणी माझा परिचय व्हावा म्हणून हे कार्यक्रम होत आहेत...यामध्ये महाविकास आघाडीमध्ये दुफळी आहे असे म्हणणे योग्य नाही ... ठाकरेंच्या शिवसेनेने देखील याठिकाणी मेळावा घेत आमची एकसंघता दाखवली आहे...
मी सातारचा पालकमंत्री असताना याठिकाणी मला काम करण्याकरिता फक्त 9 महिनेच मिळाले यादरम्यान मी कराडात लोक दरबार घेतला त्याचप्रमाणे याठिकाणी आवश्यक असणारी सगळी कामे केली... विरोधात असणाऱ्या उमेदवारांनी कराडमध्ये किती कामे केली असा सवाल देखील शिंदे यांनी उदयनराजे यांचे नाव न घेता उपस्थित केला...
कराडमध्ये लोकांचा प्रचंड प्रतिसाद मला मिळतोय विरोधकांना पराभव समोर दिसत असल्याने माझ्याबाबत खोटे आरोप ते करत आहेत त्यांनी असले उदयोग न करता लोकांच्या दरबारात येऊन ही निवडणूक लोकशाही मार्गाने लढावी मग कळेल इथला खासदार आता कोण होणार ते...
उदयनराजे यांनी शरद पवारांवर आरोप करताना हे लक्षात घेतलं पाहिजे की शरद पवारांमुळेच ते आतापर्यंत खासदार झाले आहेत...अर्थात ते राजे आहेत...मी सामान्य कार्यकर्ता आहे...त्यामुळे लोक ठरवतील की आता जिल्ह्यातील लोकांना कोण खासदार पाहिजे ते...
दरम्यान, सातारा लोकसभा मतदार संघाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी आज दुपारी भर उन्हात कराडचे नगरसेवक इंद्रजीत गुजर यांच्या निवासस्थानी भेट दिली त्यावेळी नगरसेवक गुजर यांनी त्यांची ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूक काढत त्यांचे कराडात स्वागत केले यावेळी शेकडो युवकांनी उपस्थिती लावली होती
No comments:
Post a Comment