माझ्यासह बाळासाहेब पाटील यांनाही पक्षातून फोडण्याचा प्रयत्न झाला. मात्र आमच्यावर यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार असून आम्ही शरद पवारांची साथ सोडणार नाही सातारा जिल्हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा जिल्हा आहे. सातारा जिल्ह्यातील माथाडी कामगाराचा मुलगा व सर्वसामान्य कुटुंबातील नेतृत्व म्हणून जिल्ह्यातील जनतेने मला एक संधी द्यावी. या संधीचे सोने करू, अशी ग्वाही शशिकांत शिंदे यांनी दिली.
सातारा लोकसभा निवडणुकीतील इंडिया आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांच्या प्रचाराचा शुभारंभ कराड उत्तरमधील पाल येथे श्री खंडोबा मंदिरात झाला. त्यावेळी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी श्रीनिवास पाटील होते. आमदार बाळासाहेब पाटील, सत्यजितसिंह पाटणकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, सारंग पाटील, डॉ. भारत पाटणकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हर्षद कदम, एड. रवींद्र पवार, मानसिंगराव जगदाळे कराडचे नगरसेवक जयवंत पाटील, संगीता साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती.
लोकसभेच्या निवडणुकीत जिल्ह्यात सर्वत्र फिरत असताना जनतेतून असे जाणवत आहे की लोकसभेला आपला विजय निश्चित आहे. त्यामुळेच भाजपने जिल्ह्यात उमेदवार जाहीर करायला विलंब केला. कोण विरोधात बोलायला लागल की त्याला आत टाकायचे हा ट्रेंड सध्या देशात सुरू आहे. माझ्यासह बाळासाहेब पाटील यांनाही पक्षातून फोडण्याचा प्रयत्न झाला. मात्र आमच्यावर यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार असून माझ्यावर कितीही दबाव टाकला तरी पवारांची साथ मी सोडणार नाही.
आपली उमेदवारी लोकांपर्यंत गेली असल्याने सत्ताधारी पक्षाकडून षड्यंत्र रचण्यात आले आहे.
सातारा जिल्ह्याचे वातावरण गेल्या वर्षभरात बिघडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, धनगर आरक्षण या सगळ्या प्रश्नावर केंद्र सरकार व राज्य सरकारने जनतेची फसवणूक केली आहे.
सातारा मतदारसंघ जातीयवादी शक्तींच्या ताब्यात जाऊ नये, यासाठी लोकसभा निवडणूक लढवत आहे, असे सांगत सर्वसामान्य जनतेच्या पाठबळावर सातारची तुतारी निश्चितपणे दिल्लीत जाईल, असा विश्वास आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला.
आमदार बाळासाहेब पाटील म्हणाले की, भाजप सरकारने नोटबंदी, जीएसटी, शेतकरी विरोधी कायदे असे अनेक चुकीचे निर्णय घेतले असून त्याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसला आहे. लोकसभा निवडणुकीत देशातील वातावरण बदलत चालले असून निश्चितपणे इंडिया आघाडीचा विजय होणार आहे. शशिकांत शिंदे हे एखादा मुद्दा हातात घेतला तर तो सोडवण्यासाठी शेवटपर्यंत लढणारे नेतृत्व आहे. त्यांची उमेदवारी सर्वसामान्य जनतेपर्यंत गेली असल्याने त्यांच्याविरुद्ध सत्ताधारी षड्यंत्र रचत आहेत.
यावेळी अजितराव पाटील चिखलीकर, डॉ. भारत पाटणकर, एड. रवींद्र पवार यांनीही यांची भाषणे झाली. माजी सभापती देवराज पाटील यांनी प्रास्ताविक केले तर आभार सर्जेराव खंडाईत यांनी आभार मानले. यावेळी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.
No comments:
Post a Comment