वेध माझा ऑनलाइन। सातारा लोकसभा निवडणूक २०२४ साठी महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातून आमदार शशिकांत शिंदे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी स्वत: शरद पवार यांच्यासह ‘मविआ’तील नेत्यांनी देखील साताऱ्यात उपस्थिती लावली. महारॅलीच्या माध्यमातून जोरदार शक्तिप्रदर्शन करत आमदार शशिकांत शिंदे यांचा अर्ज भरल्यानंतर शरद पवारांनी “आपलं नाणं खणखणीत, चिंता करण्याची गरज नाही,” अस सांगत आपला विश्वास व्यक्त केला.
साताऱ्यात आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत आमदार शशिकांत शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काढण्यात आलेल्या महारॅलीत खासदार श्रीनिवास पाटील, आमदार पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब पाटील यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व पक्षांचे वरिष्ठ नेते व पदाधिकारी उपस्थित राहिले. यानंतर शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, स्वातंत्र्याच्या चळवळीत अत्यंत मोलाचे योगदान देणारा आणि स्वातंत्र्यां नंतर सातारा जिल्ह्यातील अनेकांनी आपले योगदान दिले आहे.
यशवंतराव चव्हानांसारखी कर्तृत्वान लोक या जिल्ह्यात होऊन गेली. आणि त्यांच्या विचाराचा पगडा अजूनही या जिल्ह्यातील सामान्य लोकांमध्ये आहे. त्यामुळे साहजिकच आज देशात जे काही घडतंय त्याला पर्याय देण्याच्या दृष्टीने जे काही आमच्या इंडिया आघाडीच्या तर्फे प्रयत्न सुरु आहेत. याला प्रतिसाद देण्यात सातारा जिल्हा हा अग्रभागी आहे.
साताऱ्यात लोकांचा प्रतिसाद हा शशिकांत शिंदे यांना चांगला मिळत आहे. विरोधकांकडून शिंदे याच्यावर जे काही आरोप करण्यात आलेले आहेत. त्याबद्दल मी शिंदेंना सुचवले आहे कि तुम्ही पत्रकार परिषद घ्या. जे काही असेल ते सर्व लोकांसमोर ठेवा. तसेच आपलं नाणं खणखणीत आहे त्यामुळे आपल्याला आता याबाबत चिंता करण्याची काही कारण नाही. सातारचे लोक हे पुरोगामी विचारणा नेहमी पाठिंबा देतात. मागील वेळेस जी निवडणूक झाली त्यावेळी महाविकास आघाडी नव्हती सर्व लोकांचा, पक्षांनी पाठींबा दिला होता. मात्र, महाविकास आघाडी आहे. आणि सर्व ताकदीनिशी निवडणुकीच्या रिंगणात उतरली असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले.
सातारा जिल्ह्यात यशवंतराव चव्हाणांपासून अनेक कर्तृत्त्वान लोकांची फळी निर्माण झाली आहे. त्यांच्या विचारांचा पगडा आजही लोकांच्या मनावर आहे. हजारोंच्या संख्येने आज शशिकांत शिंदेंचा अर्ज भरण्यासाठी आले. देशातील लोकांना परिवर्तन हवं आहे. त्याचे पहिले पाऊल साताऱ्यातून टाकण्यात आले आहे. आमच्या लोकांचा आत्मविश्वास वाढवण्याचे काम सातारकारांनी केले असून सध्या मोदींची शक्ती कमी करणे देशाची गरज आहे, असे देखील शरद पवार यांनी यावेळी म्हंटले.
No comments:
Post a Comment