मनी लाँड्रिंग प्रकरणांमध्ये ईडीने बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि पती राज कुंद्रा याची मुंबई पुण्यातील फ्लॅटसह एकूण 98 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. ही कारवाई गुरूवारी सकाळी ईडीकडून करण्यात आली आहे. त्यामुळे याचा शिल्पा शेट्टी आणि पती राज कुंद्रा याला मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेत जुहूमधील निवासी फ्लॅट, पुण्यातील निवासी बंगला आणि राज कुंद्रा यांच्या इक्विटी शेअर्सचा समावेश आहे. या मालमत्तेचा एकूण आकडा 97.79 कोटी रूपये इतका आहे.
काय आहे प्रकरण?
राज कुंद्रावर लोकांना गुंतवणुकीच्या बदल्यात 10 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून बिटकॉइन घोटाळा केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. या बिटकॉइन प्रकरणांमध्ये राज कुंद्रा यांनी 150 कोटी रुपयांचा फायदा करून घेतला असल्याचा आरोप ईडीने लावला आहे. त्यामुळेच राज कुंद्रा यांच्या मालकीची 97.79 कोटी रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता ईडीने तात्पुरती जप्त गेली आहे. या प्रकरणांमध्ये राज कुंद्रा निर्दोष आढळल्यास त्यांनाही मालमत्ता पुन्हा देण्यात येईल.
दरम्यान, बिटकॉईन घोटाळ्यामध्ये शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा याचे नाव समोर आले आहे. यात राज कुंद्राने 2 हजार कोटींचा घोटाळा केला असल्याचे ईडीचे म्हणणे आहे. या प्रकरणामुळे 2018 साली देखील शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांना ईडीने समन्स बजावले होते. त्यानंतर त्यांची चौकशी करण्यात आली होती. त्यावेळी या प्रकरणातील मुख्य आरोपी अमित भारद्वाज याला अटक करण्यात आली होती. हा घोटाळा मनी लॉन्ड्रिंगशी जोडला असल्याचे सांगण्यात येत होते. आता पुन्हा एकदा ईडीने याच प्रकरणामुळे राज कुंद्रा याची मालमत्ता जप्त केली आहे. यात शिल्पा शेट्टीच्या नावावर असलेल्या काही फ्लॅटचा समावेश ही आहे.
No comments:
Post a Comment