सातारा लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून शशिकांत शिंदे यांचा जोरदार शक्ती प्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्यानंतर आता आज महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले हे सुद्धा आज विराट शक्ती प्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उदयनराजे यांच्या शक्ती प्रदर्शनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती राहणार आहे. त्यामुळे शक्तिप्रदर्शन जोरदार होण्यासाठी उदयनराजे यांनी खास करून बैठक आयोजित केली होती. यामध्ये जिल्ह्यातील भाजपचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक, प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. आज सकाळी 11 वाजता साताऱ्यातील गांधी मैदानावरून रॅलीला सुरुवात होणार आहे.
रॅली राजपथ मार्गे शेटे चौक, खालचा रस्ता, शिवतिर्थ या ठिकाणी जाणार आहे. तिथं छत्रपती शिवरायांच्या आणि यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला हार घालून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणार आहे. या रॅलीसाठी पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला आहे.
No comments:
Post a Comment