नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील शौचालय घोटाळा प्रकरणी सातारा लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप विरोधकांनी केलेत. याप्रकरणी फळ मार्केटचे माजी संचालक संजय पानसरे यांना अटक करण्यात आली असून शशिकांत शिंदे यांनाही अटक होईल कि काय अशी चर्चा जिल्ह्यात सुरु असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विधानाने खळबळ उडाली आहे. शशिकांत शिंदे याना अटक झाली तर आम्ही लोकशाही मार्गाने लढा उभारू असं विधान शरद पवारांनी जाहीर सभेतच केल्याने चर्चाना उधाण आलं आहे.
एका जाहीर सभेत बोलतांना शरद पवार म्हणाले, शशिकांत शिंदे बाजार समितीमध्ये चांगलं काम करत आहेत. काहीही करून शशिकांत शिंदे यांना शशिकांत शिंदे यांना अडवायचं कसं ? त्यांना थांबवण्यासाठी विरोधकांकडून प्रयत्न सुरू आहेत. जर त्यांनी शशिकांत शिंदे यांना अटक केली तर संपूर्ण सातारा जिल्हा आणि महाराष्ट्रात संयमाने आणि लोकशाही मार्गाने आम्ही लढा उभारू हा अन्याय महाराष्ट्र सहन करत नाही हे उदाहरण या ठिकाणी दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही असं शरद पवार यांनी म्हंटल. शरद पवार यांनी जाहीर सभेतच हे भाष्य केल्यानंतर शशिकांत शिंदे याना अटक होणार का? अशा चर्चाना उधाण आलं आहे.
कोरेगावमधील आमदार महेश शिंदे यांनी मुंबई बाजार समिती घोटाळा प्रकरणी शशिकांत शिंदे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. मुंबई बाजार समितीत २०१४ साली चार हजार कोटींचा घोटाळा झाला आहे. यात तत्कालीन संचालक शशिकांत शिंदे यांचा सहभाग असल्याचा आरोप आमदार महेश शिंदेंनी केला आहे. दुसरीकडे महायुतीचे उमेदवार त्यात उदयनराजे भोसले सुद्धा याच मुद्द्यावरून शशिकांत शिंदे आणि शरद पवार यांच्यावर यांच्याविरोधात भ्रष्टाचारावरून रान उठवत आहेत. तर दुसरीकडे शशिकांत शिंदे यांनी यापूर्वी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
No comments:
Post a Comment