वेध माझा ऑनलाइन
आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची कोरोना टास्कफोर्ससोबत बैठक झाली यावेळी येत्या 22 ऑक्टोबरपासून राज्यातील चित्रपट गृहं, नाट्यगृहांसोबत अम्यूझमेंट पार्कही सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले.
यावेळी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले सध्या रुग्ण संख्या कमी होतांना दिसतेय त्यामुळे. येत्या 22 ऑक्टोबरपासून आपण चित्रपटगृहे, नाट्यगृहे सुरू करणार आहोत. उपाहारगृहे दुकानांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना तयार करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले आहेत.
No comments:
Post a Comment