Monday, October 4, 2021

एम आय एम मुस्लिमांसाठी "यम' - काँग्रेस नेते झाकीर पठाण यांचा घणाघात...

वेध माझा ऑनलाइन
कराड
मागील आठ वर्षापासून संपूर्ण देशामध्ये मुस्लिमांच्या विरोधात वातावरण करण्याची चाल आत्ताच्या केंद्रातील सत्ताधारी गटाच्या समर्थकांच्या कडून सुरू होती आणि त्यामध्ये ते यशस्वीही झाले आहेत परंतु त्यांच्या यशाचा पाया हा एम आय एम पक्ष आहे हे आता मुस्लिमांना कळून चुकलेले आहे व एम आय एम नव्हे हे तर मुस्लिमांच्या साठी यम आहेत अशा शब्दात राष्ट्रीय काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे सातारा जिल्हाध्यक्ष जाकिर पठाण यांनी एम आय एय आवर निशाणा साधला आहे.

निवडणुका आल्या की मुस्लिम समाजाचा पुळका घेऊन बॅरिस्टर साहेब निवडणूक असलेल्या राज्यात जातात व त्यांचे समर्थक जाणून बुजून असे शब्द वापरतात ज्याच्यामुळे हिंदू मुस्लीम जातीवाद वाढेल त्याचबरोबर मुस्लिम समाजाला भावनिक करून सत्तर वर्षात आपल्याला काय मिळाले असा विषारी प्रचार करून भाजप विरोधात असलेल्या पक्षांच्या विरोधात मुस्लिम समाजाला एकवटण्याचा प्रयत्न करतात हा एम आय एम चा डिवाइड अँड रुल हा फॉर्म्युला  असुन आता समाजाला त्यांची ही भूल बंगाल पासून कळाली आहे .
सत्तर वर्षांमध्ये काँग्रेसने काय दिले व पुरोगामी विचारांची काँग्रेस नाही असा अपप्रचार करणारे ओवेसी यांनी त्यांच्या बापजाद्यांनी कॉंग्रेस बरोबर सत्ता का भोगली याचा उत्तर द्यावं तुम्ही 2013 पर्यंत याच काँग्रेस बरोबर नैतिक संबंध जोपासत सत्ता का भोगली ? याचं उत्तर द्यावं. सत्ता बदलली की बाबा बदलतो असे नसून सत्तेसाठी काहीही करणाऱ्या ,भाजपच्या इशाऱ्यावर नाचत त्यांच्याशी अनैतिक सबंध बनवणाऱ्या व मुस्लिमांच्या खऱ्या शत्रुंच्या विरोधात न लढता त्यांच्या पायात लोटांगण घालणाऱ्या  ओवेसीची नीती आता पश्चिम बंगालच्या मुस्लिमांनी भारत देशातील मुस्लिमांच्या समोर उघड केलेली आहे. त्यामुळे आपल्या भाषणात 70 टक्के काँग्रेससह भाजपाचे विरोधक असणाऱ्या पक्षाच्या विरोधात बोलण्यात वेळ घालवणाऱ्या ओवेसींची ही कूटनीती आता मुस्लिम समाजाने ओळखलेली आहे त्यामुळे एमआयएम समर्थकांनो तुमच्या दिशाभूल करणाऱ्या प्रचाराला मुस्लिम समाज बळी पडणार नाही .मुस्लिम समाज हा भावनिक आहे भोळा आहे त्याच्या भावनेशी खेळ करण्याचा थांबवा नाहीतर मुस्लिम समाज भारतीय जनता पार्टीची बी टीम असलेल्या तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही अशा शब्दात जाकिर पठाण यांनी काँग्रेस विरोधात होत असणाऱ्या एमआयएमच्या अपप्रचार करणाऱ्यां नेत्यांना इशारा दिलेला आहे.
भोळ्याभाबड्या मुस्लिम समाजाला भावनिक करून दिशाभूल करणाऱ्या बॅरिस्टर असदुद्दिन ओवेसी साहेबांनी या गोष्टीची जाणीव ठेवावी की काँग्रेसच्या राजवटीमध्ये ट्रिपल तलाक साठी आजचा ज्या रस्त्यावर लाखोच्या संख्येने महिला उतरल्या अशा कधी उतरल्या नाहीत. एन आर सी साठी महिलांना शाहीन बाग आंदोलन करावं लागलं नाही मुस्लिम बांधवांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बसवणारा पक्ष काँग्रेस पक्ष आहे देशाच्या राजकारणामध्ये मुस्लिम समाजाला योग्य वाटा देणारा पक्ष हा काँग्रेस पक्ष आहे. जे पाच टक्के आरक्षण सुप्रीम कोर्टाने ग्राह्य धरलं ते मुस्लिम समाजाला दिलेले पाच टक्के आरक्षण हे काँग्रेसनेच आणि माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे ज्यांचे नेतृत्व माणून मी काँग्रेसमध्ये कार्यरत आहे त्या माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी दिलेले आहे. बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेब हे बॅरिस्टर जीना पार्ट2 आहेत हे आता मुस्लिम समाजाने ओळखायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे समाजा समाजामध्ये द्वेष निर्माण करून ज्याच्या पायात लोटांगण घालत आहेत या सत्ताधारी भाजपाचा फायदा करून देणे हे ओवैसीने थांबवावे अन्यथा जशास तसे उत्तर मिळेल असा हल्ला जाकिर पठाण यांनी ओवेसी यांच्यावर चढवला आहे.

No comments:

Post a Comment