Thursday, October 7, 2021

लसीकरणासाठी पुढाकार घेणाऱ्या कराडातील सर्वच पुढार्यांचे होतय कौतुक..नगरसेवक गुंड्याभाऊ वाटेगावकरांनी लायन्सच्या मदतीने राबवली आणखी एक लसीकरण मोहीम ; पालिकेचे सहकार्य...

वेध माझा ऑनलाइन
कराड
नगरसेवक गुंड्याभाऊ वाटेगावकर  यांच्या पुढाकाराने व लायन्स क्लब ऑफ कराड यांच्या सहकार्याने १८ वर्षे पूर्ण असलेल्या सर्व नागरिकांसाठी मोफत कोविड लसीकरण मोहीम नुकतीच राबवण्यात आली यासाठी येथील पालिकेचे सहकार्य लाभले येथील सोमवार पेठ, लायन्स आय हॉस्पिटल याठिकाणी ही मोहीम राबववण्यात आली दरम्यान शहरांतील ज्या ज्या नेत्यांनी पुढाकार घेत लसीकरण मोहीम राबऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत लस पोचवली त्यां सर्वांचे शहरातून कौतुक होताना दिसतंय. 

काही दिवसांपूर्वी शहरात लसीचा तुटवडा जाणवत होता त्याबद्दल अनेक तक्रारी येत होत्या नागरी आरोग्य केंद्रात यामुळे अनेक वाद पहायला मिळत होते आणि लस घेण्यासाठी असणारी ऑनलाइन प्रक्रिया लोकांना फारशी रुचत नव्हती पण पर्याय नव्हता आता मात्र मुबलक लस उपलबघ आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ती लस पोचली पाहिजे असे सरकारचे म्हणणे आहे जेणेकरून समाज कोरोनामुक्त होऊन समाजजीवन सुकर होईल आणि त्याच पार्शवभूमीवर कराडातील काही नगरसेवक आपल्या पुढाकाराने व पालिकेच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणात लसीकरण करून घेत आहेत त्यानिमित्ताने शहर कोरोनामुक्त होण्यासाठी मदत होणार आहे  या विषयाचे शहरातून लोक कौतुक करताना दिसत आहेत पालिकेनेही या लसीकरणास सर्वतोपरी सहकार्य केल्याने पालिकेचेही लोकांकडून अभिनंदन होतंय

दरम्यान मेहेरबान वाटेगावकर यांनी लायन्स क्लबच्या साथीने शहरात कोबीड लसीकरण मोहीम दुसऱ्यांदा राबवली शहरात होणाऱ्या प्रत्येक सामाजिक उपक्रमामधून आपला सहभाग वाटेगावकर नोंदवत असतात त्यांनी येथील लायन्स क्लबच्या साथीने शहरात दुसऱ्यांदा लसीकरण मोहीम राबवली आहे यानिमित्ताने त्यांची समाजाप्रती असणारी  बांधिलकीला पुन्हा लोकांसमोर आली आहे कराड लायन्स क्लबचे देखील सामाजिक कार्यात मोठे योगदान नेहमी पहावयास मिळते आज या लसीकरण मोहिमेला पालिकेच्या सहकार्याने व वाटेगावकर मेहेरबान यांच्या पुढाकाराने येथील लायन्स क्लबने ही मोहीम यशस्वी करत सामाजिक कार्यात आपला आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे या लसीकरण मोहिमेस आरोग्य सभापती गुंड्याभाऊ वाटेगावकर नगरसेवक सुहास जगताप कराड लायन्स क्लबचे अध्यक्ष खंडू इंगळे यांच्यासह लायन्सचे विविध पदाधिकारि कार्यकर्ते  उपस्थित होते



No comments:

Post a Comment