Tuesday, October 5, 2021

कराडातील प्रभाग क्रमांक 12 मध्ये मोफत कोविड लसीकरण ; 200 जणांनी घेतला लाभ...

वेध माझा ऑनलाइन
कराड
येथील नगरसेवक वैभव हिंगमीरे व नगरसेविका सौ पल्लवी पवार यांच्या पुढाकाराने व येथील पालिकेच्या सहकार्याने प्रभाग क्रमांक 12 मध्ये मोफत कोविड लसीकरण मोहीम नुकतीच पार पडली सुमारे 200 जणांनी याठिकणी लसीकरणाचा लाभ घेतला

यावेळी पालिकेतील लोकशाही गटाचे नेते सौरभ पाटील नगरसेविका सौ पल्लवी पवार  युवा नेते शिवाजी पवार नगरसेवक वैभव हिंगमीरे बाळासाहेब पवार उदय हिंगमीरे तसेच लोकशाही गटाचे नगरसेवक कार्यकर्ते आदी उपस्थित होते
यावेळी बोलताना सौरभ पाटील म्हणाले युवा नेते शिवाजी पवार व नगरसेवक वैभव हिंगमीरे यांच्या प्रयत्नातून नगरपालिकेच्या सहकाऱ्याने प्रभाग क्रमांक 12 मध्ये लसीकरण होत आहे पवार व हिंगमीरे यांनी प्रबोधन करून व लसीकरणाचे महत्व सांगून जास्तीत जास्त लोकांना या ठिकाणी लसीकरणासाठी आणले याबाबत त्यांचे कौतुक आहे 200 जणांनी याठिकाणी लसीकरणाचा लाभ घेतला आहे अधिकाधिक लोकांनी शहरात सुरू असलेल्या लसीकरणाचा लाभ घेण्याबाबत सौरभ तात्यांनी सर्व जनतेला यावेळी आवाहनही केले 

 
 

No comments:

Post a Comment