शरद पवार आज आमदार निलेश लंके यांच्या घरी गेले नगर जिल्ह्यातील विविध कामाच्या उदघाटन कार्यक्रमानंतर ते आज लंके यांच्या घरी गेले लोकप्रतिनिधीचे घर म्हटलं तर मोठा बंगला, बंगल्यासमोर नोकरचाकर, अलिशान गाड्या असं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. पण आमदार निलेश लंके यांचं घर अत्यंत साधं आहे. एक रुम, त्यातच छोटं किचन आणि बाजूला बाथरुम अशी निलेश लंके यांच्या घराची रचना. आमदार लंके यांच्या या छोट्या घरात देशातील बडा नेता असलेले शरद पवार यांनी भेट दिल्यामुळे लंके कुटुंबीय भारावून गेलं.
शरद पवार हे लंकेच्या घरी दाखल झाले. त्यांना बसण्यासाठी प्लॅस्टिकची खुर्ची ठेवण्यात आली होती. लाकडी कपाटाला टेकून ही खुर्ची ठेवली. मागच्या भिंतीला गुलाबी रंग होता. गुळगुळीत आणि चकचकीत बंगल्याच्या भिंती जशा असतात तसं चित्र अजिबात नव्हतं. पवारांच्या बाजूला दोन खुर्च्या ठेवल्या होत्या. तिथे निलेश लंके यांचे आई-वडील बसले होते.
लोकप्रतिनिधीचे घर म्हंटलं तर मोठा बंगला, बंगल्यासमोर नोकरचाकर, अलिशान गाड्या असं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. पण निलेश लंके यांचं घर पाहून हे आकराशे बेड चे कोविड सेंटर उभं करणाऱ्या आमदाराचं घर आहे यावर विश्वास बसणार नाही.सामान्य कुटुंबात जन्म घेतलेल्या निलेश लंके हे आज आमदार असले तरी आजही त्याचं कुटूंब एक छोट्याशा घरात राहतं.. एक छोटंस किचन आणि एक रूम, त्यातच बाथरूम असं लंके यांचं घर आहे. अनेकांना याचं नवल वाटतं. विशेष म्हणजे लंके यांचं एकत्रित कुटुंब आहे
No comments:
Post a Comment