कराड
येथील नगरसेवक फारुख पटवेकर व नगरसेविका सौ.मिनाज फारूक पटवेकर यांच्या वतीने व पालिकेच्या सहकार्याने १८ वर्षे पूर्ण असलेल्या सर्व नागरिकांसाठी कोविड लसीकरणाची मोहीम राबवण्यात येत आहे. पहिला डोस तसेच दुसरा डोस घेणा-या सर्व नागरिकांसाठी हि सोय करण्यात आलेली आहे. मंगळवार दि.५ ऑक्टोबर, बुधवार 6 आणि गुरुवार दिनांक ७ असे ३ दिवस हि मोहीम रविवारपेठ, मौलाना अब्दुल अजीज हॉल मोमीन मस्जिद, मोमीन मोहल्ला याठिकाणी सुरू राहणार आहे सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत ही मोहीम चालेल अशी माहिती देण्यात आली आहे
पूरपरिस्थिती असो... कोविड चे संकट आसो...कुपोषित बालकांना मदतीचा विषय असो...येथील नगरसेवक फारुख पटवेकर हे नेहमीच जनतेच्या मदतीसाठी धावून आले आहेत झालेल्या मोठ्या पावसामुळे नुकसानग्रस्त चिपळूनमधील नागरिकांसाठी मदत देण्यासाठी येथील नगरसेवक पटवेकर तसेच समस्त मुस्लिम समाज मोमीन मोहल्ला बैतुलमाल कमिटी यांच्यावतीने त्याठिकाणी लाखो रुपयांची मदत देण्यात आली अन्नधान्य अंथरूण पांघरून औषधे कपडे अशा अनेक प्रकारची मदत घेऊन मुस्लिम समाजातील युवक चिपळूणला त्यावेळी रवाना झाले होते येथील नगरसेवक फारुख पटवेकर बरकत पटवेकर याकूब वाईकर शेरु कुरेशी मुसद्दीक वाईकर अब्राहम मुल्ला यांच्यासह नगरसेवक पटवेकर यांच्या अनेक सहकाऱ्यांनी पुढे येऊन ही मदत पोच करण्यासाठी प्रयत्न केले
पटवेकर यांनी केलेल्या कार्याचे नेहमीच गावात कौतुक होत असते कोविड च्या संकटात देखील त्यानी मोठे काम केले आहे
दरम्यान आज तीन दिवस चालू असणाऱ्या या लसीकरण मोहिमेचा शेवटचा दिवस आहे नागरिकांनी जास्तीजास्त या लसीकरणाचा लाभ घ्यावा असे आवाहन नगरसेवक फारुख पटवेकर यांनी केले आहे
No comments:
Post a Comment