कराड
सध्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक होऊ घातली आहे या निवडणुकीत सोसायटी मतदार संघात ऍड उदयसिह पाटील विरुद्ध ना बाळासाहेब पाटील यांची लढत होत आहे पालकमंत्री हे आम्हाला माननीय आहेत... तर उदयसिह पाटील हेही आमचे मित्र होते... असे म्हणत भाजपाचे युवा नेते अतुल भोसले यांनी आहेत... आणि होते... यातील फरक पत्रकारांना आवर्जून दाखवून देत या निवडणुकीतील आपली भूमिका आज स्पष्ट केली... पार्टी किंवा पक्ष बघण्यापेक्षा योग्य व्यक्तीच्या पाठीशी आपण उभे राहणार असल्याचे सूतोवाचदेखीव त्यांनी येथील भाजपा च्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत आज केले आणि आपल्या गटाचे मतदान कोणाला होणार हे अप्रत्यक्ष सांगूनही टाकले...आमचे मतदान ज्यांना होईल तेच याठिकाणी विजयी होतील असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखवला...
भाजपा च्या वतीने आज पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते यावेळी ते बोलत होते
यावेळी सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर राज्याचे चिटणीस डॉ अतुलबाबा भोसले शहराध्यक्ष एकनाथ बागडी नगराध्यक्षा सौ रोहिणी शिंदे तसेच भाजपचे सर्व नगरसेवक तसेच शहर व तालुक्याचे सर्वच पदाधिकारी यावेळी उपस्थित होते
सध्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे सोसायटी गटात यापूर्वी दिवंगत काँग्रेस नेते माजी आमदार विलासकाका पाटील यांनी यापूर्वी प्रतिनिधित्व केले आहे सध्याच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत काकांचे चिरंजीव ऍड उदयदादा पाटील यांनी आपली उमेदवारी दिली आहे त्यांच्या विरोधात जिल्ह्याचे पालकमंत्री ना बाळासाहेब पाटील आहेत या गटात डॉ अतुलबाबा भोसले यांचेही मतदान आहे त्याविषयी पत्रकारांनी प्रश्न विचारला असता अतुलबाबा यांनी आपण पार्टी किंवा गट तट न बघता योग्य माणसाच्या पाठीशी असल्याचे सांगितले बाळासाहेब पाटील हे आमच्यासाठी माननीय आहेत...उदयदादा मित्र होते...असे सांगत त्यांनी या निवडणूकीतील आपली भूमिका स्पष्ट केली...
दरम्यान पालिकेच्या निवडणुकीदरम्यान केवळ आपण शहराच्या राजकारणात सक्रिय होता नंतर पुढच्या निवडणुकीतच दिसता पार्टीला पाठबळ देण्याकरीता किंवा नगराध्यक्षाना अडचणीत असताना पाठिंबा दयायला तुम्ही कुठेच दिसला नाहीत... इतर पार्त्यांच्या नेत्यांशी तुमचे हितसंबंध जपण्यासाठी तुम्ही असे करता का?असे विचारले असता...ते म्हणाले आम्ही पूर्ण पणे आमच्या कार्यकर्त्याला पाठिंबा देण्याची भूमिका घेत असतो..यापुढेही घेऊ...इतर पार्टीशी हितसंबंधाबाबतच्या आरोपाचे उत्तर न देता त्यांनी या प्रश्नाला बगल दिली...
दरम्यान यावेळी सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर या पत्रकार परिषदेस उशिरा आले त्यांनाही तुम्ही केवळ निवडणुकीपुरतेच पक्ष्याच्या व्यासपीठावर दिसता...निवडणूक झाली की परत शहराच्या राजकारणात तुमचा सहभाग दिसत नाही?असे विचारले असता आम्ही आहोतच तुम्हाला आम्ही दिसत नाही त्याला काय करायचे...असे वेळ मारून नेणारे उत्तर देण्याचा त्यांनी प्रयत्न केला...तिथेच उपस्थित असलेल्या डॉ अतुलबाबनी तो हाणून पाडत पत्रकारांचे आपल्यावर बारीक लक्ष आहे त्यामुळे इथून पुढे आम्ही याबाबत दक्षता घेऊ असे सांगत चरेगावकर याना आणखी काही बोलण्यापासून गप्प केले ...
No comments:
Post a Comment