वेध माझा ऑनलाइन
सातारा
दीपावली सणाच्या पार्शवभूमीवर जिल्ह्यात दि. 27 ऑक्टोबर पासून 5 नोव्हेंबर पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदीचे आदेश दिले आहेत. तसेच जिल्ह्यातील उपहारगृहे, भोजनगृहे व इतर सर्व आस्थापनांच्या वेळेत सुधारणा करण्यात आल्या आहेत याबाबतचे जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी नुकतेच आदेश जारी केले आहेत
राज्य शासनाचे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने उपहारगृहे, भोजनगृहे तसेच इतर आस्थापना बाबींमध्ये सुधारणा केल्याचे नुकतेच सांगण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दि. 13 ऑगस्ट रोजीच्या आदेशात सुधारणा करुन सातारा जिल्ह्यातील सर्व उपहारगृहे व भोजनगृहे रात्री 12 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची मुभा दिली आहे. जिल्ह्यातील इतर सर्व आस्थापना रात्री 11 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगीही देण्यात आली आहे असे जिल्हाधिकारी सिंग यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.
No comments:
Post a Comment