कराड
सोमवार पेठ पाण्याच्या टाकीखालील मोकळय़ा जागेत बाग साकारली आहे. ही बाग माझी वसुंधरा अभियानांतर्गत नगरपालिकेच्या सहकार्याने व लोकवर्गणीतून साकारली असल्याची माहिती ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर यांनी दिली.दरम्यान,त्याच परिसरातील नगरसेवक सुहास जगताप या बागेकडे फिरकतही नाहीत अशी माहितीही अण्णा पावसकर यांनी दिली आहे
ते म्हणाले की, तीन वर्षापूर्वी सोमवार पेठ पाण्याच्या टाकीखालील जागेचा चांगला वापर करण्यासाठी येथे बागेचे अंदाजपत्रक बनवले होते. ते 33 लाखांचे होते. मात्र हे काम पुढे सरकलेले नव्हते. माझी वसुंधरा अभियान नगरपालिकेने हाती घेतल्यानंतर येथे प्रथम कारंजाची निर्मिती केली. वॉकिंग ट्रक बनवला. प्रत्यक्ष झाडे लावता येणार नसल्याने पिलरवर झाडे रंगवून घेतली. लहान मुलांसाठी खेळणी बसवली. यासाठी येथील लोकांना आर्थिक सहभाग देण्याचे आवाहन केले. त्यानुसार लोकांनी दिलेल्या व माझ्या वर्गणीतून 65 हजार जमले. त्यानंतर मुलांसाठी खेळणी बसवण्याचा निर्णय घेतला. या खेळण्यांची ऑर्डर देऊन 40 हजार रूपये ऍडव्हान्सही दिला आहे. या सर्व काळात नगरसेवक सुहास जगताप हे तिकडे फिरकलेले नव्हते. त्यांना जागा विकसित करण्यासाठी आणखी एक ठिकाण सुचवले होते. मात्र ते त्यांनी केले नाही. त्यांनी कोणत्या ट्रस्टचा निधी आणल्याचे सांगितले असले तरी तो अद्याप पालिकेकडे जमा झालेला नाही. या बागेची निर्मिती लोकसहभाग, पालिकेच्या सहकार्याने तसेच आपल्या व नगरसेविका विद्या पावसकर यांच्या संकल्पनेतून झाले आहे. बागेच्या उभारणीसाठी काही लोकांनी आमच्याकडे लोकवर्गणी जमा केली होती. त्यांचा गैरसमज होऊ नये, यासाठी हा खुलासा करत असल्याचे पावसकर यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment