Saturday, October 9, 2021

कराडात साबीरमिया मुल्ला मित्रपरिवाराच्या वतीने मोफत कोवीड लसीकरण ; 100 जणांनी घेतला लाभ

वेध माझा ऑनलाइन
कराड
येथील सामाजिक कार्यकर्ते साबीरमिया मुल्ला मित्र परिवाराच्यावतीने शहरातील भाजी मंडई परिसरात आज मोफत कोविड लसीकरण मोहीम राबविण्यात आली या मोहिमेस येथील पालिकेचे सर्वतोपरी सहकार्य मिळाले सुमारे 100 लोकांनी या मोहिमेचा लाभ घेतल्याचे साबीरमिया म्हणाले

साबीरमिया मुल्ला यांचे कोविड काळात केलेले काम कोणीच विसरू शकत नाही त्यांनी मुस्लिम समाजातील कोविडने मृत्युमुखी पडलेल्या सुमारे दीडशे हुन अधिक लोकांचा दफनविधी करण्यासाठी स्वतः पुढाकार घेतला आहे त्यांनी सॅनिटायझर आणि मास्कचे वाटप केले आहे  गरजूंना धान्य आणि किराणा मालाचे वाटपदेखील त्यांनी कोविड काळात केले आहे मधल्या काळात मोठा पाऊस झाल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली असता कोयना चिपळूणसह पूरग्रस्त परिस्थिती झालेल्या बहुतांशी भागात जाऊन त्यांनी पूरग्रस्तांना आवश्यक ती मदत केली आहे
आज त्यांच्या पुढाकाराने मोफत कोविड लसीकरण मोहीम राबविण्यात आली सुमारे 100 लोकांनी यामधून लाभ घेतल्याचे स्वतः साबीरमिया मुल्ला म्हणाले 
दरम्यान आज त्यांनी घेतलेल्या कोविड लसीकरण मोहिमेस गटनेते सौरभ पाटील सभापती गुंड्याभाऊ वाटेगावकर माजी नगरसेवक अशोकराव पाटील इसाक सवार काँग्रेस नेते इंद्रजित चव्हाण काँग्रेस मुस्लिम अल्पसंख्यांक नेते झाकीर पठाण यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते

No comments:

Post a Comment