Thursday, October 28, 2021

कराड पालिका निवडणूक पक्षचिन्हावरच लढणार ; भाजपा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर

वेध माझा ऑनलाइन
कराड
मागील वेळी आम्ही भाजप म्हणून काही जागांवर लढलो व इतर ठिकाणी युती केली यावेळी आम्ही सर्वच्या सर्व जागा पक्षचिन्हावरच लढवणार असल्याचे भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले
भाजपा च्या वतीने आज पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते यावेळी सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर राज्याचे चिटणीस डॉ अतुलबाबा भोसले शहराध्यक्ष एकनाथ बागडी नगराध्यक्षा सौ रोहिणी शिंदे तसेच भाजपचे सर्व नगरसेवक तसेच शहर व तालुक्याचे सर्वच पदाधिकारी यावेळी उपस्थित होते

पावसकर पुढे म्हणाले उमेदवार निवडताना कोणत्या वार्डात कोण चालेल यांची शहानिशा करण्यात येईल समाजात त्या व्यक्तीचे स्थानही पाहिले जाईल तसेच सतत संपर्कात असणाऱ्या उमेदवाराला या निवडणुकीत भाजपा उमेदवारी देईल असेही जिल्ह्याध्यक्ष विक्रम पावसकर यांनी यावेळी स्पष्ट केलं मागच्या वेळी आम्ही कमी जागांवर लढलो हे आमची चूक झाली सर्वच्या सर्व जागेवर लढलो असतो तर आज बहुमत ही आमचेच असते असेही ते यावेळी म्हणाले

No comments:

Post a Comment